Posts

Showing posts from January, 2020

विधानपरिषद पोटनिवडणुकीत 100 टक्के मतदान

Image
v 489 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क यवतमाळ दि. 31: यवतमाळ विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत आज 100 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील सात मतदान केंद्रावर 245 पुरूष मतदार व 244 स्त्री मतदार असे एकूण 489 मतदारांनी शांततेत मतदान केले. यावेळी दारव्हा येथील मतदान केंद्रावर 44 मतदार (पुरुष – 23, स्त्री - 21), यवतमाळ मतदान केंद्रावर 180 (पुरुष – 87, स्त्री - 93), पुसद मतदान केंद्रावर 57 (पुरुष – 29, स्त्री - 28), राळेगाव मतदान केंद्र 37 (पुरुष – 19, स्त्री - 18), उमरखेड मतदान केंद्र 62 (पुरुष – 32, स्त्री - 30), केळापूर मतदान केंद्र 60 (पुरुष – 29, स्त्री - 31), तर वणी येथील मतदान केंद्रावर 49 (पुरुष – 26, स्त्री - 23),मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.    मतमोजणी दिनांक 4 फेब्रुवारी रोजी बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे होणार आहे. ००००००००

मतदान केंद्रावर होणार मतदारांची तपासणी

v आक्षेपार्ह वस्तु आतमध्ये नेण्यास मनाई यवतमाळ दि. 30: यवतमाळ विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या पोटनिवडणुकीकरिता दिनांक 31 जानेवारी 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेदरम्यान कोणतीही आक्षेपार्ह वस्तु मतदान केंद्राच्या आतमध्ये नेण्यास मनाई करण्यात आली असून मतदान केंद्रावर मतदारांची तपासणी करण्यात येणार आहे. कोणत्याही मतदाराला, उमेदवाराला, निवडणूक प्रतिनिधी अथवा मतदान प्रतिनिधी यांना मतदान केंद्राच्या आत भ्रमणध्वनी, कॅमेरा, व्हीडीओ कॅमेरा, कोणतीही ईलेक्ट्रॉनिक वस्तु, टॅब, तसेच कोणत्याही प्रकारचा पेन, डिजीटल घड्याळ, कोणत्याही प्रकारचा कागद मतदान केंद्राच्या आत नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. वरीलपैकी कोणतीही वस्तु मतदाराजवळ असल्यास त्यांनी ती मतदान केंद्राच्या बाहेर जमा करावी. सदर सुचनेचे उल्लंघन झाल्यास भारतीय दंड सहिंतेच्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे. सदर मतदान यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे, वणी येथे तहसील क

मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Image
यवतमाळ, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) येथे पार पडला. यावेळी वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक मेघनादन राजकुमार आदी उपस्थित होते.             यावेळी उपस्थितांना शुभेच्छा संदेश देतांना पालकमंत्री संजय राठोड यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे महत्व, देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीकारक आणि शहिदांनी दिलेले बलिदान, घटना समितीने तयार केलेली राज्यघटना, त्यानुसार चालणारा कारभार आदी बाबींना उजाळा दिला. तसेच 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधी ‘लोकशाही निवडणूक व सुशासन’ पंधरवडा साजरा करायचा असून या अंतर्गत मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घ्यावी. शाळा-महाविद्यालयांनी या संदर्भात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि चर्चासत्र आदींचे आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.             देशाच्या सीमेवर लष

मतदार जनजागृतीमुळे जिल्ह्यात दोन लाख मतदारांची वाढ - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

Image
v राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रॅलीसह विविध स्पर्धांचे आयोजन यवतमाळ, दि. 25 : गतवर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या दोन्ही निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांनी निर्भिडपणे मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, याची जाणीव जिल्हा प्रशासन मतदारांना करून देत आहे. या जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यात जवळपास दोन लाख मतदारांची वाढ झाली, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.             जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विभागाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, जिल्हा पुरवठा अधिकारी शालीग्राम भराडी, उपजिल्हाधिकारी सविता चौधर, संगिता राठोड, पोलिस उपअधिक्षक (गृह) एम.एम.बागवान, तहसीलदार कुणाल झाल्टे, भाग्यश्री देशमुख आदी उपस्थित होते.             निवडणुका या लोकशाहीचा प्राण आहे, असे सांगून श्री. गुल्हाने म्हण

दहा रुपयाचे नाणे व्यवहारात वापरा – जिल्हाधिकारी गुल्हाने

Image
यवतमाळ दि.17 : दहा रुपयाच्या नाण्यावर कोणतीही बंदी आली नसून हे नाणे चलनात कायम आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील जनतेने दहा रुपयाच्या नाण्याबाबत कोणताही गैरसमज करून घेऊ नये. तसेच सामान्य नागरिकांसह, व्यापारी व दुकानदारांनी ही नाणी ग्राहकांकडून बिनधास्तपणे स्वीकारावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार दहा रुपयाचे नाणे चलन म्हणून सुरू आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांमध्ये याबाबत गैरसमज पसरविला जात आहे. त्यामुळे ही नाणी व्यवहारात स्वीकारल्या जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी ही नाणी बँकेत मोठ्या प्रमाणात जमा झाली असून त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बँकात इतर चलनी नोटा ठेवण्यास जागेची अडचण येत आहे. ही अडचण केवळ यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असल्याचे भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक पुरुषोत्तम बहिरसेठ यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार जिल्ह्यातील व्यापारी आस्थापना, किरकोळ दुकानदार, ठोक व चिल्लर आस्थापना यांनी दहा रुपयाचे नाणे स्वीकारावे. तसेच नागरिकांनीसुध्दा याबाबत अपप्रचाराला बळी पडू नये,

कर्जमुक्ती योजनेकरीता कालमर्यादेत आधार सिडींग करा

Image
v विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिले निर्देश v बँकर्ससोबत आढावा बैठक             यवतमाळ दि.15 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेकरीता जिल्ह्यातील पात्र शेतक-यांच्या बचत खात्यांचे आधारसिडींग मर्यादीत वेळेत होणे गरजेचे आहे. त्याकरीता बँकेच्या व्यवस्थापकांनी आपल्या संबंधित शाखांना सुचना द्याव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिले.             जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बँकर्सच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, अग्रणी बँक व्यवस्थापक विजयकुमार व-हाडे, सहाय्यक जिल्हा निबंधक अर्चना माळवे आदी उपस्थित होते.           या योजनेचा लाभ घेण्याकरीता पात्र शेतक-यांच्या खात्याचे आधार सिडींग हा महत्वाचा घटक आहे, असे सांगून श्री. पियुष सिंह म्हणाले, बँकेच्या अधिका-यांनी प्रत्यक्ष फिल्डवरून याबाबत दररोज माहिती घ्यावी. आधार सिडींगबाबत स्थानिक स्तरावर बँक

क्षयरुग्ण सेवेत यवतमाळ जिल्हा अग्रेसर

Image
यवतमाळ दि. 10 : क्षयरोग   हा एक   जिवाणुजन्य   आजार आहे. एके काळी दुर्धर समजला जाणारा हा आजार आजकाल नियमित डॉट्स औषधोपचाराने पूर्णपणे बरा होतो. क्षयरूग्णांना संजीवनी देण्याचे काम यवतमाळ जिल्हा क्षय रुग्णालयामार्फत उत्तमरित्या करण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकुण क्षयरुग्णांपैकी 90 टक्के क्षयरुग्णांनी यशस्वीरित्या औषधोपचार पुर्ण केला आहे. नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय आढावा सभेमध्ये 2019 या वर्षात यवतमाळ जिल्हा क्षयरुग्ण सेवेत राज्यातून दुसऱ्या क्रमांकवर असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.एस. ढोले यांनी दिली आहे.        2019 या वर्षाकरिता शासकीय क्षेत्रातून 3440 व खाजगी क्षेत्रातून 1010 असे एकूण 4450 रुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले होते. त्यापैकी 3963 म्हणजे 90 टक्के रुग्ण शोधून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. रुग्णांना डीबीटी मधनू एकूण रुपये 1 कोटी 45 लक्ष रुपये अनुदान वितरीत करण्यात आले. जिल्ह्यात रुग्णसेवेकरिता 81 पी.एच.आय, 66 प्राथमिक आरोग्य केंद्र, 17 ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय, तसेच 2 आर.टी. सेंटर कार्यरत आहेत. त्यांचे माध्यमातून औषधोप

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतक-यांप्रति संवेदनशील राहून काम करा – जिल्हाधिकारी गुल्हाने

Image
यवतमाळ दि. 10 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राज्य शासनाची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा आढावा राज्य शासनाकडून नियमित घेण्यात येत आहे. त्यामुळे वेळेत या योजनेची अंमलबजावणी करण्याकरीता बँकेच्या प्रतिनिधींनी शेतक-यांप्रति संवेदशनशील राहून गांभिर्याने कामे करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बँकर्सच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा सहनिबंधक अर्चना माळवे आदी उपस्थित होते. राज्य शासनाने शेतक-यांना दिलासा देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतक-यांचे बँक खाते आधारकार्डशी जोडणे अत्यावश्यक आहे. बँकांना या संदर्भात विहित नमुन्यातील याद्या त्वरीत पूर्ण करावयाच्या आहेत. त्यानुसार गांभिर्याने कारवाई करावी. शेतकरी सभासदांचे आधार सिंडींग लवकरात लवकर होईल, यासाठी बँकेच्या वरिष्ठ अधिका-यांनी संबंधित शाखेच्या व्यवस्थापकांना निर्देश द्यावेत

विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात 490 मतदार

Image
v जिल्हाधिका-यांनी घेतली आढावा बैठक यवतमाळ दि. 06 : जिल्ह्यात 31 जानेवारी 2020 रोजी होणा-या विधान परिषदेच्या (स्थानिक स्वराज्य संस्था) निवडणुकीत एकूण 490 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, नगर पालिका आणि नगर पंचायतीचे सदस्य यांचा समावेश राहील. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी म्हणाले, संबंधित यंत्रणेने शासकीय कार्यालय, इमारती तसेच सार्वजनिक जागेवरील पोस्टर्स, बॅनर्स, फलक त्वरीत हटवावे. तसेच नगर पालिकेनेसुध्दा खाजगी इमारतीवरील अनधिकृत राजकीय जाहिराती काढाव्यात. प्रचारात शासकीय वाहनांचा उपयोग होणार नाही, याची काळजी घ्यावी. आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत नवीन निविदा प्रक्रिया, कामाचे आदेश देता येणार नाही. व्हीडीओ टीम, फ्लाईंग स्कॉडचे गठन त्वरीत करावेत, अशा सुचना त्यांनी दिल्या. बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मेघनादन राजकुमार, सा.बा. विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, निवासी उपजिल्हाधि

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

Image
v 19 जानेवारीला बालकांना लस देण्याचे आवाहन यवतमाळ दि. 04 : संपूर्ण जिल्ह्यात 19 जानेवारी 2020 रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेऊन लसीकरण मोहीम 100 टक्के यशस्वी करण्याच्या सुचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात लसीकरण मोहिमेबाबत जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीला मुख्य कार्यपालन अधिकारी जलज शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.एस.ढोले, डॉ. प्रशांत पवार, लसीकरण मोहिमेचे समन्वयक डॉ. पियुष चव्हाण, आयएमए यवतमाळ शाखेचे अध्यक्ष डॉ. संजीव जोशी, बालरोग तज्ज्ञ डॉ. विरेंद्र राठोड आदी उपस्थित होते. 0 ते 5 वयोगटातील एकही बालक पल्स पोलिओ लसीकरणापासून वंचित राहता कामा नये, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, शासकीय यंत्रणेसोबतच इंडियन मेडीकल असोसिएशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब यासारख्या विविध सामाजिक संघटनांची मदत आरोग्य विभागाने घ्यावी. तसेच एका वर्षात जे नवीन बालके जन्माला आली आहेत, अशा कुटुंबावर लक्ष केंद्रीत करावे. आरोग्य विभागाने मोहिमेबाबत गांभि

सोशल मीडिया वापरतांना जबाबदारीचे भान ठेवा – एसपी राजकुमार

Image
v जिल्हा माहिती कार्यालय व पोलिस विभागातर्फे ‘सायबर सेफ वुमेन’ कार्यशाळा यवतमाळ दि. 03 : माहिती व तंत्रज्ञानाच्या या युगात युवक-युवतींमध्ये सोशल मीडियाचे प्रचंड आकर्षण आहे. या माध्यमातून प्रत्येक जण अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न करतो. अभिव्यक्त होणे हा अधिकार असला तरी आपल्या एखाद्या पोस्टमुळे समाजाला धोका निर्माण होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. जबाबदारीचे भान ठेवूनच नागरिकांनी सोशल मीडिया वापरावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक मेघनादन राजकुमार यांनी केले. शहरातील डॉ. एपीजे अब्दूल कलाम अभ्यासिकेत जिल्हा माहिती कार्यालय व पोलिस विभाग सायबर सेलच्या वतीने आयोजित ‘सायबर सेफ वुमेन’ या कार्यशाळेत ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर पोलिस निरीक्षक सर्वश्री धनंजय सायरे, अनिल किनगे, मार्गदर्शक रम्या कन्नन (राजकुमार), सायबर सेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पुरी, महिला सेलच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक विजया पंधरे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने आदी उपस्थित होते. सोशल मीडियावर आपण जे काही व्यक्त होतो किंवा अप

3 जानेवारी रोजी ‘सायबर सेफ वुमेन’ आणि महिला सुरक्षाबाबत कार्यशाळा

यवतमाळ दि. 02 : जिल्हा माहिती कार्यालय आणि पोलिस अधिक्षक कार्यालय सायबर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 3 जानेवारी 2020 रोजी दुपारी 1 वाजता ‘सायबर सेफ वुमेन’ आणि महिला सुरक्षा व कायदे या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यवतमाळ शहरातील दारव्हा रोडवरील डॉ. एपीजे अब्दूल कलाम अभ्यासिकेत या कार्यशाळेला पोलिस अधिक्षक मेघनादन राजकुमार हे प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतील. तसेच ‘सायबर सेफ वुमेन’ या विषयावर सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पुरी आणि ‘महिला सुरक्षा व कायदे’या विषयावर महिला कक्षाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीमती पंधरे मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक, महाविद्यालयीन युवक-युवती, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आदींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ००००००

एपीजे अब्दुल कलाम वाचनालयात प्रवेशासाठी 15 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

Image
v स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांकरीता सुवर्णसंधी यवतमाळ दि. 02 : जिल्हास्तरीय सेतू समिती अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांसाठी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचनालयाची स्थापना यवतमाळ येथे करण्यात आली आहे. वाचनालयात जिल्ह्यातील एकूण 150 विद्यार्थ्यांना योग्य ते मासिक शुल्क आकारून प्रवर्गनिहाय प्रवेश उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याकरीता विद्यार्थ्यांकडून 15 जानेवारी 2020 पर्यंत ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून या संधीचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा नमुना, अटी व शर्तीची माहिती www.yavatmal.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर नमुना अर्ज डाऊनलोड करून अर्जासोबत विद्यार्थ्यांनी पदवी पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र जोडून अर्ज 15 जानेवारी 2020 पर्यंत सकाळी 10   ते सायंकाळी 5.30 पर्यंत (शासकीय सुट्टी वगळून) सेतू विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे सादर करावा. या तारखेनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाही. यासंदर्भात जिल्हा प्रशास