विधानपरिषद पोटनिवडणुकीत 100 टक्के मतदान







v 489 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
यवतमाळ दि. 31: यवतमाळ विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत आज 100 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील सात मतदान केंद्रावर 245 पुरूष मतदार व 244 स्त्री मतदार असे एकूण 489 मतदारांनी शांततेत मतदान केले.
यावेळी दारव्हा येथील मतदान केंद्रावर 44 मतदार (पुरुष – 23, स्त्री - 21), यवतमाळ मतदान केंद्रावर 180 (पुरुष – 87, स्त्री - 93), पुसद मतदान केंद्रावर 57 (पुरुष – 29, स्त्री - 28), राळेगाव मतदान केंद्र 37 (पुरुष – 19, स्त्री - 18), उमरखेड मतदान केंद्र 62 (पुरुष – 32, स्त्री - 30), केळापूर मतदान केंद्र 60 (पुरुष – 29, स्त्री - 31), तर वणी येथील मतदान केंद्रावर 49 (पुरुष – 26, स्त्री - 23),मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  
मतमोजणी दिनांक 4 फेब्रुवारी रोजी बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे होणार आहे.
००००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी