एपीजे अब्दुल कलाम वाचनालयात प्रवेशासाठी 15 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित



v स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांकरीता सुवर्णसंधी
यवतमाळ दि. 02 : जिल्हास्तरीय सेतू समिती अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांसाठी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचनालयाची स्थापना यवतमाळ येथे करण्यात आली आहे. वाचनालयात जिल्ह्यातील एकूण 150 विद्यार्थ्यांना योग्य ते मासिक शुल्क आकारून प्रवर्गनिहाय प्रवेश उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याकरीता विद्यार्थ्यांकडून 15 जानेवारी 2020 पर्यंत ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून या संधीचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा नमुना, अटी व शर्तीची माहिती www.yavatmal.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर नमुना अर्ज डाऊनलोड करून अर्जासोबत विद्यार्थ्यांनी पदवी पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र जोडून अर्ज 15 जानेवारी 2020 पर्यंत सकाळी 10  ते सायंकाळी 5.30 पर्यंत (शासकीय सुट्टी वगळून) सेतू विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे सादर करावा. या तारखेनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाही.
यासंदर्भात जिल्हा प्रशासनातर्फे लेखी परीक्षा रविवार दिनांक 19 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11 ते 12 या कालावधीत यवतमाळ मुख्यालयी घेण्यात येईल. लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी परीक्षा क्रमांकासह www.yavatmal.nic.in या संकेतस्थळावर व कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात येईल. परीक्षेस बसण्यासाठी पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र दिनांक 17 जानेवारी 2020 रोजी www.yavatmal.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील. पात्र उमेदवारांनी सदर प्रवेशपत्र डाऊनलोड करावे. सदर प्रवेश पत्र भरून त्यासोबत परीक्षेला येतांना आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी पैकी एक ओळखपत्राची छायांकित सोबत आणणे अनिवार्य आहे.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी