क्षयरुग्ण सेवेत यवतमाळ जिल्हा अग्रेसर



यवतमाळ दि. 10 : क्षयरोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. एके काळी दुर्धर समजला जाणारा हा आजार आजकाल नियमित डॉट्स औषधोपचाराने पूर्णपणे बरा होतो. क्षयरूग्णांना संजीवनी देण्याचे काम यवतमाळ जिल्हा क्षय रुग्णालयामार्फत उत्तमरित्या करण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकुण क्षयरुग्णांपैकी 90 टक्के क्षयरुग्णांनी यशस्वीरित्या औषधोपचार पुर्ण केला आहे. नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय आढावा सभेमध्ये 2019 या वर्षात यवतमाळ जिल्हा क्षयरुग्ण सेवेत राज्यातून दुसऱ्या क्रमांकवर असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.एस. ढोले यांनी दिली आहे.
       2019 या वर्षाकरिता शासकीय क्षेत्रातून 3440 व खाजगी क्षेत्रातून 1010 असे एकूण 4450 रुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले होते. त्यापैकी 3963 म्हणजे 90 टक्के रुग्ण शोधून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. रुग्णांना डीबीटी मधनू एकूण रुपये 1 कोटी 45 लक्ष रुपये अनुदान वितरीत करण्यात आले. जिल्ह्यात रुग्णसेवेकरिता 81 पी.एच.आय, 66 प्राथमिक आरोग्य केंद्र, 17 ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय, तसेच 2 आर.टी. सेंटर कार्यरत आहेत. त्यांचे माध्यमातून औषधोपचारासाठी आरोग्य कर्मचारी वारंवार रुग्णांच्या घरी भेटी देवून त्यांना औषधोपचाराचे महत्व पटवून देतात.
            क्षयरोगाला आळा घालण्याकरीता जिल्ह्यामध्ये आरोग्य खात्यामार्फत दरवर्षी कसोशीने प्रयत्न केले जातात. रुग्णांचे वेळीच निदान व्हावे, याकरीता जिल्ह्यामध्ये 36 सुक्ष्मदर्शी केंद्र अद्ययावत आहेत. या ठिकाणी रुग्णांच्या बेडक्यांची मोफत तपासणी केली जाते. यासाठी रुग्णांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
       सन 2025 पर्यंत संपुर्ण भारत क्षयरोगमुक्तीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातसुध्दा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट रुग्णसेवेतून पुर्ण करू, असा विश्वास डॉ. एस.एस. ढोले यांनी व्यक्त केला आहे.
००००००००



Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी