मतदान केंद्रावर होणार मतदारांची तपासणी



v आक्षेपार्ह वस्तु आतमध्ये नेण्यास मनाई
यवतमाळ दि. 30: यवतमाळ विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या पोटनिवडणुकीकरिता दिनांक 31 जानेवारी 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेदरम्यान कोणतीही आक्षेपार्ह वस्तु मतदान केंद्राच्या आतमध्ये नेण्यास मनाई करण्यात आली असून मतदान केंद्रावर मतदारांची तपासणी करण्यात येणार आहे.
कोणत्याही मतदाराला, उमेदवाराला, निवडणूक प्रतिनिधी अथवा मतदान प्रतिनिधी यांना मतदान केंद्राच्या आत भ्रमणध्वनी, कॅमेरा, व्हीडीओ कॅमेरा, कोणतीही ईलेक्ट्रॉनिक वस्तु, टॅब, तसेच कोणत्याही प्रकारचा पेन, डिजीटल घड्याळ, कोणत्याही प्रकारचा कागद मतदान केंद्राच्या आत नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
वरीलपैकी कोणतीही वस्तु मतदाराजवळ असल्यास त्यांनी ती मतदान केंद्राच्या बाहेर जमा करावी. सदर सुचनेचे उल्लंघन झाल्यास भारतीय दंड सहिंतेच्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.
सदर मतदान यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे, वणी येथे तहसील कार्यालय, पांढरकवडा येथे तहसील कार्यालय केळापूर, राळेगाव येथे तहसील कार्यालय, दारव्हा येथे तहसील कार्यालय, पुसद येथे तहसील कार्यालय, उमरखेड येथे तहसील कार्यालयात होणार आहे.
००००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी