3 जानेवारी रोजी ‘सायबर सेफ वुमेन’ आणि महिला सुरक्षाबाबत कार्यशाळा



यवतमाळ दि. 02 : जिल्हा माहिती कार्यालय आणि पोलिस अधिक्षक कार्यालय सायबर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 3 जानेवारी 2020 रोजी दुपारी 1 वाजता ‘सायबर सेफ वुमेन’ आणि महिला सुरक्षा व कायदे या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
यवतमाळ शहरातील दारव्हा रोडवरील डॉ. एपीजे अब्दूल कलाम अभ्यासिकेत या कार्यशाळेला पोलिस अधिक्षक मेघनादन राजकुमार हे प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतील. तसेच ‘सायबर सेफ वुमेन’ या विषयावर सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पुरी आणि ‘महिला सुरक्षा व कायदे’या विषयावर महिला कक्षाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीमती पंधरे मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक, महाविद्यालयीन युवक-युवती, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आदींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी