दहा रुपयाचे नाणे व्यवहारात वापरा – जिल्हाधिकारी गुल्हाने


यवतमाळ दि.17 : दहा रुपयाच्या नाण्यावर कोणतीही बंदी आली नसून हे नाणे चलनात कायम आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील जनतेने दहा रुपयाच्या नाण्याबाबत कोणताही गैरसमज करून घेऊ नये. तसेच सामान्य नागरिकांसह, व्यापारी व दुकानदारांनी ही नाणी ग्राहकांकडून बिनधास्तपणे स्वीकारावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार दहा रुपयाचे नाणे चलन म्हणून सुरू आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांमध्ये याबाबत गैरसमज पसरविला जात आहे. त्यामुळे ही नाणी व्यवहारात स्वीकारल्या जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी ही नाणी बँकेत मोठ्या प्रमाणात जमा झाली असून त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बँकात इतर चलनी नोटा ठेवण्यास जागेची अडचण येत आहे. ही अडचण केवळ यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असल्याचे भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक पुरुषोत्तम बहिरसेठ यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार जिल्ह्यातील व्यापारी आस्थापना, किरकोळ दुकानदार, ठोक व चिल्लर आस्थापना यांनी दहा रुपयाचे नाणे स्वीकारावे. तसेच नागरिकांनीसुध्दा याबाबत अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी