Posts

Showing posts from August, 2023

जिल्ह्यात चार महिने चालणार आयुष्मान भव: मोहीम

Image
आरोग्य विभागांतर्गत सर्व वयोगटांतील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून उपचार करण्यासाठी जिल्ह्यात आयुष्यमान भव: मोहिमेचा १ सप्टेंबरपासून शुभारंभ होत आहे. ही मोहीम चार महिने चालणार आहे. या मोहिमेची माहिती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक यांची बैठक घेण्यात आली. सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पी.एस.चव्हाण, डॉ प्रेमकुमार ठोंबरे, डॉ.रमा बाजोरिया, शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, आयुष्मान समनव्यक डॉ.दर्शन चांडक, सुरेंद्र इरपनवार उपस्थित होते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या आयुष्यमान भव: मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व वयोगटांतील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य विषयक तपासण्या करण्यात येणार आहे. आयुष्यमान आपल्या दारी ३.० या उपक्रमामध्ये जिल्ह्यांतील सर्व पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून आयुष्यमान कार्डाचे वितरण करण्यात येणार आहे. आयुष्यमान सभा उपक्रमामध्ये आरोग्यविषयक सेवा-सुविधांची जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने

आर्णी, पुसदमध्ये महाराणी दुर्गावती नाट्यप्रयोगाचे उत्कृष्ट सादरीकरण

Image
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पुसद यांच्यावतीने कलावैभव नाट्य व सांस्कृतिक संस्थेद्वारा निर्मित महाराणी दुर्गावती यांच्या जीवनसंघर्षावर आधारीत नाटयप्रयोगाचे आर्णी व पुसद येथे उत्कृष्टरित्या सादरीकरण करण्यात आले. दि .29 ऑगस्ट रोजी आर्णी येथील श्री चित्तघनानंद भारती रंगमंदिर विद्यालय आणि दि.30 ऑगस्ट रोजी पुसद येथे बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविदयालय सुधाकर नाईक प्रेक्षागृहात या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण झाले. आर्णी येथील नाट्यप्रयोग कार्यक्रमाला आमदार डॉ. संदिप धुर्वे, प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, तहसिलदार परसराम भोसले, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विष्णु उकंडे, राहूल सोयाम तर पुसद येथे मोहिनीताई इंद्रनिल नाईक, आदिवासी सेवक नारायण क-हाळे, से.नि. समाजकल्याण सहआयुक्त माधवराव वैद्य, नाटकाचे लेखक दशरथ मडावी, दिग्दर्शक सुरेश बारसे तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती, आदिवासी बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी आपल्या प्रास्ताविकेत आदिवासी क्रांतिकारकांची व समाजसुधारकांच्या जीवनकार्याची माहिती 1 सप्टेंबर

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवारी

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. 4 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन (बचत भवन) येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी लोकशाही दिनात प्रत्यक्ष उपस्थित राहावे किंवा लोकशाही दिनाच्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत तक्रार अर्ज rdc_yavatmal@rediffmail.com या ईमेलवर सादर करावा. या ईमेलवर पाठविलेला तक्रार अर्ज सुद्धा लोकशाही दिनात समाविष्ट करुन घेण्यात येईल, परंतु विहित वेळेनंतर ईमेलवर प्राप्त झालेले तक्रार अर्ज लोकशाही दिनात ग्राह्य धरल्या जाणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांनी कळविले आहे.

नेरमध्ये श्रद्धांजली भवन बांधकामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Image
पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नांना यश नेरमधील मुस्लीम कब्रस्थानात श्रद्धांजली भवनासाठी ९९ लाख रुपयाच्या कामांना राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुरी मिळाली असून टिनाच्या श्रद्धांजली भवन बांधकामाचे आणि सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेंतर्गत ९९ लाख ७२ हजार २०० रुपयांच्या या कामांना पालकमंत्री संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुरी मिळाली आहे. नगरपरिषदेमार्फत या श्रद्धांजली भवनाच्या बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी सौंदर्यीकरणाची कामे देखील केली जाणार आहे. नेर नगरपरिषद क्षेत्रात मुस्लीम बांधवांसाठी कब्रस्थानांत श्रद्धांजली भवन उभारण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली होती. नागरिकांच्या मागणीची दखल घेत पालकमंत्री संजय राठोड यांनी विशेष प्रयत्नातून जवळजवळ एक कोटी रुपयांचा निधी या भवनाच्या बांधकामासाठी उपलब्ध करुन दिला आहे. या श्रद्धांजली भवनाचे बांधकाम व सौंदर्यीकरणाच्या कामांचा दर्जा राखला जावा, अशा सूचना देखील पालकमंत्री संजय राठोड यां

दहावी-बारावी पुरवणी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डिप्लोमासाठी प्रवेश

दहावी व बारावीच्या पुरवणी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षण पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. दहावीनंतर प्रथम वर्ष अभियांत्रिकी डिप्लोमा व बारावी/आयटीआय नंतरच्या थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरीय जागांवर प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी व अर्जनिश्चितीसाठी प्रवेशप्रक्रिया ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रीया नोंदणी व अधिक माहितीसाठी https//dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन शासकीय तंत्रशिक्षणचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोगरे यांनी केले आहे.

गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी 15 सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावा ; सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

Image
राज्य शासनाने १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. या स्पर्धेसाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक या प्रमाणे उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येईल. या ४४ गणेशोत्सव मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास पाच लाख रुपयांचे, द्वितीय क्रमांकास अडीच लाख रुपयांचे, तर तृतीय क्रमांकास एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे वेळापत्रक उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांना 15 सप्टेंबर 2023 पर्यंत स्पर्धेत अर्ज करता येईल. mahotsav.plda.@gmail.com या ई - मेलव

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिकांना विशेष गौरव पुरस्कार मिळणार ; 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक व त्यांच्या पत्नी आणि पाल्यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी पात्र असणाऱ्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजक, सामाजिक क्षेत्रात विशिष्ट कार्य, योगदान दिल्याबद्दलचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पुर, जळीत, दरोडा अपघात आणि इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे माजी सैनिक, पत्नी आणि पाल्यांना या कार्याबद्दल एकरकमी १० हजार रुपये व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी २५ हजार रुपयांचा पुरस्कार सैनिक कल्याण विभागामार्फत दिला जाणार आहे. तसेच दहावी आणि बारावीच्या परिक्षेत ९० टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या माजी सैनिक, विधवांच्या पाच पाल्यांना विभागीय पातळीवर दहा हजार रुपयांचा विशेष गौरव पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. यासाठी पात्र असणाऱ्यांनी कागदपत्र

जिल्हा विकास आराखड्यात नागरिकांच्या सूचनांचा समावेश होणार

जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनामार्फत विकास आराखडा तयार करण्यात येतो. या आराखड्यात नागरिकांच्या सूचनांचा देखील समावेश करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली असून गुगल फॉर्मव्दारे 5 सप्टेंबरपर्यंत नागरिकांच्या संकल्पना व सूचना मागविण्यात आल्या आहेत. नागरिकांनी जिल्ह्याचा सर्वंकष आराखडा तयार करण्यासाठी उद्योग, कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकास इत्यादी क्षेत्राबाबत सूचना किंवा संकल्पना https://forms.gle/5wXfYHNG27VS9j4V6 या लिंकवर नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रगती आणि समृद्धीच्या वाटेवरील निर्णायक टप्प्यावर उभा आहे. ही वाटचाल करताना सर्वसमावेशक दृष्टिकोन व निर्णय प्रक्रियेत सर्वांचा सहभाग आवश्यक ठरतो. हा दृष्टिकोन साध्य करण्यासाठी, नागरिकांनी जिल्हा विकास आराखडा निर्मितीमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आणि विविध क्षेत्रात त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे योगदान देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पीक स्पर्धेसाठी अर्जाची मुदत 31 ऑगस्टपर्यंत

Image
यंदाच्या खरीप हंगामातील पिकांसाठी कृषी विभागामार्फत तालुकास्तरीय पीक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या स्पर्धेतील हंगाम निहाय पिकांसाठी 31 ऑगस्ट पूर्वी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी यांनी केले. खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, रागी, तूर, सोयाबीन, भुईमुग , सूर्यफुल इत्यादी पीक उत्पादक शेतकऱ्यांनी या पीकस्पधेत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जोडून विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा. यासह प्रवेश शुल्काचे चलन, सात बारा व नमुना आठ अ चा उतारा आणि आदिवासी शेतकऱ्यांनी जात प्रमाणपत्र सोबत जोडून अर्ज सादर करावा.स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी,पर्यवेक्षक व कृषी सहायक यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दुध भेसळविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात येणार

जिल्ह्यातील दुध भेसळ रोखण्यासाठी धडक मोहीम राबविण्याचे निर्देश दुध भेसळ प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी पी. के. दुबे यांनी प्रशासनाला दिले आहे. जिल्ह्यामध्ये दुध व दुग्धजन्य पदार्थात होत असलेली भेसळ आणि त्याचा जनतेवर होणाऱ्या परिणामाबाबत दुध भेसळ प्रतिबंधक समितीची नुकतीच बैठक झाली. यावेळी श्री. दुबे यांनी हे निर्देश दिले. राज्यात मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ होत असल्यामुळे या भेसळीला पायबंद करण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत दुध भेसळीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व दुध विक्रेते, दुग्धजन्य पदार्थ उत्पादकांनी उच्च प्रतिचे दुध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करावी, असे आवाहन समितीचे अध्यक्ष श्री. दुबे आणि सचिव डॉ. जया राऊत यांनी केले आहे. जिल्हास्तरीय दुध भेसळ प्रतिबंधक समितीचे गठन : दुध भेसळ रोखण्यासाठी अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीमध्ये जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक, अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त, जिल्ह

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

Image
मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण चेतना अंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी 484 शिक्षण स्वयंसेवकांची कंत्राटी तत्वावर 89 दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरुपात भरती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून या तात्पुरत्या स्वरुपातील भरतीसाठी जिल्हा परिषदेला अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिनस्त जिल्हा खनिकर्म योजनेअंतर्गत बाधित व अबाधित क्षेत्रांतील शाळेमध्ये प्राथमिक शिक्षकांची 414 तर माध्यमिक शिक्षकांची 70 अशी एकुण 484 पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही नियुक्ती देण्यात येणार आहे. या भरतीमध्ये निवड करण्यात आलेल्या शिक्षण स्वयंसेवकांना 7 हजार 500 रुपये प्रति महिना मानधन देण्यात येणार आहे. या पदांसाठीच्या शैक्षणिक पात्रतेनुसार इच्छुक उमेदवार हा टीईटी परिक्षा उत्तीर्ण असावा.टीईटी उमेदवार उपलब्ध न झाल्यास डिएड परिक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. डिएड उमेदवार उपलब्ध न झाल्यास मान्यता प्राप्त विद्यापीठाची बीए कि

वाहतूक नियमांविषयी उद्या बाईक रॅली ; जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार

वाहतुकीच्या नियमाविषयी जनजागृतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे उद्या २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या बाईक रॅलीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्षांच्या हस्ते होणार आहे. या बाईक रॅलीमध्ये जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायीक अधिकारी, सरकारी वकील, पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा वकील संघ अध्यक्ष व सर्व वकील आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत. या रॅलीचा मार्ग जिल्हा व सत्र न्यायालय येथून निघणार आहे. तेथून शहरातील एसबीआय चौक - अप्सरा टॉकीज - हनुमान आखाडा चौक - नगर परिषद - एलआयसी चौक बस स्टॅड- दत्त चौक- दाते कॉलेज- आर्णी रोड- नवीन बस स्टॅड -संविधान चौक नंतर पोलिस मुख्यालयापर्यंत येथे या बाईक रॅलीची सांगता होईल, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने दिली आहे.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय क्षमता चाचणी परीक्षा

Image
आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासून त्यात वृध्दि करण्याच्या उद्देशाने राज्यातील सर्व शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित व इंग्रजी या विषयाची क्षमता चाचणी परीक्षा दि. २९ ऑगस्ट रोजी होणार आहे. पुसद येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत पुसद, दिग्रस, दारव्हा, महागाव, उमरखेड, आर्णी व नेर या सात तालुक्यातील एकूण पाच हजार ३९७ विद्यार्थी ही क्षमता चाचणी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती प्रकल्प संचालक आत्माराम धाबे यांनी दिली. नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तालयांतर्गत ही परीक्षा राबविण्यात येत आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, अपर मुख्य सचिव डॉ. प्रदिप व्यास, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे, अपर आयुक्त सुरेश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली या क्षमता चाचणी परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिक्षा निकोप वातावरणात घेण्यात येणार असून प्रकल्प कार्यालयाच्यावतीने दोन भरारी पथके, बैठे पथक, व्हिडीओ शूटिंग पथक असे एकूण ४६ अधिकारी व कर्मचारी या परिक्षेच्या नियंत्रणासाठी तैनात करण्यात आले आहेत. सर्व मुख्याध्यापक यांना या

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Image
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कर्ज, अनुदान योजनेंतर्गत यंदाच्या आर्थिक वर्षाकरीता एकुण 140 कर्ज प्रकरणांचे भौतिक व आर्थिक उद्दिष्ट प्राप्त झाले असून अनुसूचित जाती किंवा नवबोध्द संवर्गातील पात्र उमेदवारांनी कर्ज, अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्जासह जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, आधारकार्ड, रेशनकार्ड, दरपत्रक, पॅनकार्ड इत्यादी कागदपत्रे तसेच महामंडळाच्या mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. तसेच अर्जाची प्रत कागदपत्रासह महामंडळाचे जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दक्षता हॉलच्या मागे, पळसवाडी कॅम्प, दारव्हा रोड यवतमाळ येथे सादर करावे, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक माधुरी अवघाते यांनी केले आहे. 000

जिल्हास्तरीय एचआयव्ही जनजागृती स्पर्धा ; राळेगावचे इंदिरा गांधी कला महाविद्यालय प्रथम

Image
आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय एचआयव्ही जनजागृती स्पर्धेत राळेगाव येथील इंदिरा गांधी कला महाविद्यालयाची पहिल्या क्रमांकावर निवड करण्यात आली. जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या पथनाट्य स्पर्धेत 11 रेड रिबन क्लब स्थापित महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी एचआयव्ही एड्स संक्रमणाचे मार्ग आणि एचआयव्ही एम बाबत समाजातील असणारा कलंक व भेदभाव कमी करणे. 1097 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करणे या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण केले. या स्पर्धेमध्ये यवतमाळ मधील महाजन नर्सिंग महाविद्यालयाची द्वितीय क्रमांकावर आणि आर्णी येथील म. द. भारती महाविद्यालयाची तृतीय क्रमांकावर निवड करण्यात आली. या पथनाट्य स्पर्धेला प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रमा बाजोरिया, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तगलपल्लेवार, एआरटी केंद्राचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश बोरीकर, परिक्षक प्रिती दिपक दास आणि घाटंजी येथील नवचैतन्या बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राऊत उपस्थित होते. या पथनाट्य स्पर्धेसाठी

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भाव नियंत्रणासाठी पिकांचे सर्वेक्षण करुन उपाययोजना करा - डॉ. डी. बी. उंदिरवाडे

Image
कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला असून पिकांचे सर्वेक्षण करुन वेळीच नियंत्रणाच्या उपाययोजना करण्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. बी. उंदिरवाडे यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिला आहे. डॉ. उंदिरवाडे यांनी त्यांच्या चमूसह अकोला जिल्ह्यातील काही परिसरात केलेल्या पाहणीत कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. म्हणुन ज्या शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली आहे त्यांनी निरीक्षण करावे. असा इतरही भागात फुले अवस्थेत असणाऱ्या कपाशी पिकावर प्रादुर्भावाची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी पिकाचे सर्वेक्षण करून वेळीच नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. या उपाययोजना करतांना नत्र खते व संजीविकांचा शिफारशीप्रमाणे वापर करावा. गुलाबी बोंडअळीवर पाळत ठेवण्यासाठी पिक उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसांनंतर फोरोमोन सापळयाचा वापर करावा. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमोन सापळे लावावे. सतत तीन दिवस या सापळयामधे आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावे तसेच मास ट्रैपिंगसाठी हेक्टरी १५ ते २

हर घर तिरंगा उपक्रमांत गावखेड्यातील चार लाख घरांवर फडकला तिरंगा

Image
देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘माझी माती, माझा देश’ अभियानांतर्गत जिल्ह्यात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील बाराशे ग्रामपंचायतींसह ग्रामीण भागातील सुमारे 4 लाख 27 हजार 793 घरांवर राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमांतर्गत हर घर तिरंगा उपक्रम जिल्हा परिषद प्रशासनामार्फत ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने जिल्हाभरातील बाराशे ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देण्यात आले. यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रातील गावांमधील 31 हजार 780, आर्णी 27 हजार 215, बाभुळगाव 20 हजार 662, दारव्हा 27 हजार 590, दिग्रस 44 हजार 780, घाटंजी 19 हजार 685, कळंब 21 हजार 785, केळापूर 30 हजार 464, महागाव 24 हजार 908, मारेगाव 17 हजार 891, नेर 23 हजार 560, पुसद 44 हजार 250, राळेगाव 24 हजार 188, उमरखेड 35 हजार 320, वणी 33 हजार 500 आणि झरी जामणी 20 हजार 215 घरांवर राष्ट्रध्वज फडकविण्

दारव्ह्यात उद्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

नामांकित कंपन्यांच्या 1448 रिक्त पदांसाठी थेट मुलाखती : दारव्हा येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दि. 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करियर सेंटर व शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दारव्हा यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याकरिता सारा स्पिंटेक्स, यवतमाळ, मॅक व्हेईकल, यवतमाळ, एसबीआय लाइफ इन्सुरन्स, यवतमाळ, विदर्भ बायोटेक लॅब यवतमाळ,फेरो इंडिया प्रा.लि.पुणे,परमस्किल इंडिया प्रा.लि. छ. संभाजीनगर, श्रीधर स्पिनर्स प्रा.लि. छ. संभाजी नगर, पिपल ट्रि व्हेन्चर्स प्रा.लि. अमरावती, ट्रु फोर्स सिक्युरीटी सर्व्हिसेस प्रा.लि.मुंबई आदी विविध नामांकित कंपन्यामार्फत एकूण 1448 रिक्तपदे भरली जाणार आहेत. या मेळाव्यामध्ये इयत्ता 10 वी, 12 वी, आयटीआय, पदवी आणि पदविकाधारक तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या इच्छुक उमेदवारांना रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी येवून या रोजगार संधीचा लाभ घेता येणार आहे. या मेळाव्यास उद्योजकां

‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत जिल्ह्यात 1200 शिलाफलकांची उभारणी

Image
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत देशभरात ‘माझी माती माझा देश’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सेनानी आणि शहीद जवानांच्या स्मृती निमित्त जिल्ह्यातील ग्रामपंचायती, शाळा व स्मरणीय ठिकाणी आतापर्यंत 1200 शिलाफलकांची उभारणी करण्यात आली आहे. या शिलाफलकांचे अनावरण पालकमंत्री संजय राठोड जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्यासह प्रतिष्ठीत नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. माझी माती माझा देश हे अभियान जिल्हा परिषद यंत्रणेमार्फतही राबविण्यात येत आहे. या अभियानात जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांनी उत्फूर्तपणे सहभाग नोंदवून स्वतंत्र सेनानी व शहीद जवानांना अभिवादन केले. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावर शिलाफलकांची उभारणी करण्यात आली असून यवतमाळ तालुक्यात 88, वणी 77, बाभुळगाव 65, दारव्हा 86, दिग्रस 55,घाटंजी 71, कळंब 61, केळापुर 74, महागाव 76, मारेगाव 56, नेर 51, पुसद 120, राळेगाव 73,

नगरपरिषदेचा अमृत कलश जिल्हा प्रशासनाच्या स्वाधीन

Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दिल्ली येथे साकारल्या जाणाऱ्या अमृतवाटीकेसाठी माती पाठविण्यात येत असून यवतमाळ नगरपरिषदेने शहरात ठिकठिकाणाहून जमा केलेल्या मातीचा कलश आज जिल्हा प्रशासनाच्या स्वाधीन केला. यवतमाळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर व नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी कलश सुपूर्द करतांना उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत दिल्लीत प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतून अमृतवाटीका साकारली जात आहे. त्यासाठी देशभरातून माती जमा केली जात आहे. प्रत्येक जिल्ह्यातील निवडलेला एक युवक ही माती दिल्लीत घेऊन जाईल. जिल्ह्यातून माती नेण्यासाठी युवकाची निवड करण्यात आली आहे. दिल्लीत साकार होत असलेल्या अमृतवाटीकेत एकरुप होण्यासाठी यवतमाळ नगरपरिषदेने शहरातील विविध प्रभागातील माती एकत्रित करुन तयार केलेला शहरस्तरीय मातीचा कलश कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी यांच्या कक्षात त्यांना सुपूर्द केला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात नगरपालिका प्रशासन विभागात