जिल्हा विकास आराखड्यात नागरिकांच्या सूचनांचा समावेश होणार

जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनामार्फत विकास आराखडा तयार करण्यात येतो. या आराखड्यात नागरिकांच्या सूचनांचा देखील समावेश करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली असून गुगल फॉर्मव्दारे 5 सप्टेंबरपर्यंत नागरिकांच्या संकल्पना व सूचना मागविण्यात आल्या आहेत. नागरिकांनी जिल्ह्याचा सर्वंकष आराखडा तयार करण्यासाठी उद्योग, कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकास इत्यादी क्षेत्राबाबत सूचना किंवा संकल्पना https://forms.gle/5wXfYHNG27VS9j4V6 या लिंकवर नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रगती आणि समृद्धीच्या वाटेवरील निर्णायक टप्प्यावर उभा आहे. ही वाटचाल करताना सर्वसमावेशक दृष्टिकोन व निर्णय प्रक्रियेत सर्वांचा सहभाग आवश्यक ठरतो. हा दृष्टिकोन साध्य करण्यासाठी, नागरिकांनी जिल्हा विकास आराखडा निर्मितीमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आणि विविध क्षेत्रात त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे योगदान देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी