‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत जिल्ह्यात 1200 शिलाफलकांची उभारणी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत देशभरात ‘माझी माती माझा देश’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सेनानी आणि शहीद जवानांच्या स्मृती निमित्त जिल्ह्यातील ग्रामपंचायती, शाळा व स्मरणीय ठिकाणी आतापर्यंत 1200 शिलाफलकांची उभारणी करण्यात आली आहे. या शिलाफलकांचे अनावरण पालकमंत्री संजय राठोड जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्यासह प्रतिष्ठीत नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.
माझी माती माझा देश हे अभियान जिल्हा परिषद यंत्रणेमार्फतही राबविण्यात येत आहे. या अभियानात जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांनी उत्फूर्तपणे सहभाग नोंदवून स्वतंत्र सेनानी व शहीद जवानांना अभिवादन केले. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावर शिलाफलकांची उभारणी करण्यात आली असून यवतमाळ तालुक्यात 88, वणी 77, बाभुळगाव 65, दारव्हा 86, दिग्रस 55,घाटंजी 71, कळंब 61, केळापुर 74, महागाव 76, मारेगाव 56, नेर 51, पुसद 120, राळेगाव 73, उमरखेड 92, वणी 101, आणि झरी जामणी तालुक्यात 54 अश्या एकूण 1200 शिलाफलकांची उभारणी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे.
या शिलाफलकांवर स्वातंत्र्य सेनानी व शहीद जवानांची नावे समाविष्ठ करण्यात आली आहे, त्यांना अभिवादन करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान राबविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार 9 ऑगस्ट पासून या अभियानाला देशभरात सुरुवात करण्यात आली होती. या अभियानांतर्गत दिल्लीत उभारण्यात येणाऱ्या अमृतवाटीकेसाठी विविध ठिकाणावरुन कलशामध्ये माती पाठविण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी