वाहतूक नियमांविषयी उद्या बाईक रॅली ; जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार

वाहतुकीच्या नियमाविषयी जनजागृतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे उद्या २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या बाईक रॅलीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्षांच्या हस्ते होणार आहे. या बाईक रॅलीमध्ये जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायीक अधिकारी, सरकारी वकील, पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा वकील संघ अध्यक्ष व सर्व वकील आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत. या रॅलीचा मार्ग जिल्हा व सत्र न्यायालय येथून निघणार आहे. तेथून शहरातील एसबीआय चौक - अप्सरा टॉकीज - हनुमान आखाडा चौक - नगर परिषद - एलआयसी चौक बस स्टॅड- दत्त चौक- दाते कॉलेज- आर्णी रोड- नवीन बस स्टॅड -संविधान चौक नंतर पोलिस मुख्यालयापर्यंत येथे या बाईक रॅलीची सांगता होईल, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती