आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय क्षमता चाचणी परीक्षा

आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासून त्यात वृध्दि करण्याच्या उद्देशाने राज्यातील सर्व शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित व इंग्रजी या विषयाची क्षमता चाचणी परीक्षा दि. २९ ऑगस्ट रोजी होणार आहे. पुसद येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत पुसद, दिग्रस, दारव्हा, महागाव, उमरखेड, आर्णी व नेर या सात तालुक्यातील एकूण पाच हजार ३९७ विद्यार्थी ही क्षमता चाचणी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती प्रकल्प संचालक आत्माराम धाबे यांनी दिली.
नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तालयांतर्गत ही परीक्षा राबविण्यात येत आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, अपर मुख्य सचिव डॉ. प्रदिप व्यास, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे, अपर आयुक्त सुरेश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली या क्षमता चाचणी परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिक्षा निकोप वातावरणात घेण्यात येणार असून प्रकल्प कार्यालयाच्यावतीने दोन भरारी पथके, बैठे पथक, व्हिडीओ शूटिंग पथक असे एकूण ४६ अधिकारी व कर्मचारी या परिक्षेच्या नियंत्रणासाठी तैनात करण्यात आले आहेत. सर्व मुख्याध्यापक यांना याबाबत कळविण्यात आलेले असून परिक्षेची संपूर्ण तयारी झालेली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात तीन शैक्षणिक चाचण्या होणार आहेत. परिक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असून प्रश्नांकरिता बहुपर्यायी उत्तरे उपलब्ध असणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी