महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कर्ज, अनुदान योजनेंतर्गत यंदाच्या आर्थिक वर्षाकरीता एकुण 140 कर्ज प्रकरणांचे भौतिक व आर्थिक उद्दिष्ट प्राप्त झाले असून अनुसूचित जाती किंवा नवबोध्द संवर्गातील पात्र उमेदवारांनी कर्ज, अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्जासह जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, आधारकार्ड, रेशनकार्ड, दरपत्रक, पॅनकार्ड इत्यादी कागदपत्रे तसेच महामंडळाच्या mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. तसेच अर्जाची प्रत कागदपत्रासह महामंडळाचे जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दक्षता हॉलच्या मागे, पळसवाडी कॅम्प, दारव्हा रोड यवतमाळ येथे सादर करावे, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक माधुरी अवघाते यांनी केले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी