आर्णी, पुसदमध्ये महाराणी दुर्गावती नाट्यप्रयोगाचे उत्कृष्ट सादरीकरण

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पुसद यांच्यावतीने कलावैभव नाट्य व सांस्कृतिक संस्थेद्वारा निर्मित महाराणी दुर्गावती यांच्या जीवनसंघर्षावर आधारीत नाटयप्रयोगाचे आर्णी व पुसद येथे उत्कृष्टरित्या सादरीकरण करण्यात आले.
दि .29 ऑगस्ट रोजी आर्णी येथील श्री चित्तघनानंद भारती रंगमंदिर विद्यालय आणि दि.30 ऑगस्ट रोजी पुसद येथे बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविदयालय सुधाकर नाईक प्रेक्षागृहात या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण झाले. आर्णी येथील नाट्यप्रयोग कार्यक्रमाला आमदार डॉ. संदिप धुर्वे, प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, तहसिलदार परसराम भोसले, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विष्णु उकंडे, राहूल सोयाम तर पुसद येथे मोहिनीताई इंद्रनिल नाईक, आदिवासी सेवक नारायण क-हाळे, से.नि. समाजकल्याण सहआयुक्त माधवराव वैद्य, नाटकाचे लेखक दशरथ मडावी, दिग्दर्शक सुरेश बारसे तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती, आदिवासी बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी आपल्या प्रास्ताविकेत आदिवासी क्रांतिकारकांची व समाजसुधारकांच्या जीवनकार्याची माहिती 1 सप्टेंबर 2023 पासून प्रकल्पांतर्गत सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत परिपाठाचे वेळी विद्यार्थ्यांना देण्यात येईल. प्रकल्प कार्यालयाच्या वतीने क्रांतिकारक बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, शामादादा कोलाम, सोमा डोमा आंध अशा आदिवासी क्रांतिकारकांच्या नाटयप्रयोगाचे सादरीकरण भविष्यात केल्या जाईल, असे सांगितले. पुसद येथील नाट्यप्रयोगाचे फेसबुक व स्ट्रीमयार्ड च्या माध्यमातून ऑनलाईन प्रक्षेपण करुन प्रकल्पांतर्गत सर्व 19 शासकीय व अनुदानित आश्रमशाळा व 11 शासकीय मुला-मुलींच्या वसतीगृहांमधील विद्यार्थ्यांना नाट्यप्रयोग दाखविण्यात आले. या ऑनलाईन प्रक्षेपणाचे काम कार्यालयातील सहायक प्रकल्प अधिकारी केशव शेगोकार व आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सतिश सपकाळ यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी