दारव्ह्यात उद्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

नामांकित कंपन्यांच्या 1448 रिक्त पदांसाठी थेट मुलाखती : दारव्हा येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दि. 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करियर सेंटर व शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दारव्हा यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याकरिता सारा स्पिंटेक्स, यवतमाळ, मॅक व्हेईकल, यवतमाळ, एसबीआय लाइफ इन्सुरन्स, यवतमाळ, विदर्भ बायोटेक लॅब यवतमाळ,फेरो इंडिया प्रा.लि.पुणे,परमस्किल इंडिया प्रा.लि. छ. संभाजीनगर, श्रीधर स्पिनर्स प्रा.लि. छ. संभाजी नगर, पिपल ट्रि व्हेन्चर्स प्रा.लि. अमरावती, ट्रु फोर्स सिक्युरीटी सर्व्हिसेस प्रा.लि.मुंबई आदी विविध नामांकित कंपन्यामार्फत एकूण 1448 रिक्तपदे भरली जाणार आहेत. या मेळाव्यामध्ये इयत्ता 10 वी, 12 वी, आयटीआय, पदवी आणि पदविकाधारक तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या इच्छुक उमेदवारांना रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी येवून या रोजगार संधीचा लाभ घेता येणार आहे. या मेळाव्यास उद्योजकांकडून उमेदवारांशी प्रत्यक्ष थेट मुलाखतीद्वारे रिक्तपदांकरिता निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या सा.शितोळे आणि आयटीआयचे प्राचार्य आर.यु. राठोड यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी