Posts

Showing posts from June, 2023

अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेचा लाभ घ्या १० ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि, २७ (जिमाका):-सामाजिक व आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणा-या मातंग समाजाला सक्षम करण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळाकडून समाजातील नागरिकांना उद्योग उभारण्यासाठी थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी १० ऑगस्ट २०२३ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत. आर्थीक वर्ष २०२३-२४ करिता थेट कर्ज योजनेसाठी ४० लाभार्थी लक्षांक देण्यात आला आहे.थेट कर्ज योजनेची प्रकल्प मर्यादा १ लक्ष रुपये आहे. या योजनेसाठी अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षापर्यंत असावे. शहरी व ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षीक उत्पन्न मर्यादा ३ लाख रुपये असावे.तसेच अर्जदाराने यापुर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. कर्ज प्रकरणासाठी आवश्यक कागदपत्रे अर्जदाराचे सिबील क्रेडीट स्कोअर ५०० असावा जातीचा दाखला,आधार कार्ड, शैक्षणिक दाखला रेशनकार्ड, पॅन कार्ड, अनुदान किंवा कर्जाचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या ठिकाणचीभाडेपावती, करारपत्रक किं

विधी सेवा तर्फे जागतिक बाल कामगार विरोधी दिवस साजरा

यवतमाळ, दि २७ जून, (जिमाका):-जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सरकारी कामगार अधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने १२ जुन २०२३ रोजी “जागतिक बाल कामगार विरोधी दिवस”प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही.हांडे यांचे मार्गदर्शनात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव के.ए.नहार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन सरकारी कामगार अधिकारी रा.रा.काळे,जिल्हा बाल संरक्षण कक्ष प्रकाश नानजी चाहणकर,दुकाने निरीक्षक विजय गुल्हाणे उपस्थित होते. याप्रसंगी सरकारी कामगार अधिकारी रा.रा.काळे यांनी उपस्थीतांना बाल कामगार विरोधी दिवसाबाबत विस्तृत माहिती दिली.तसेच १ ते १४ वर्षाच्या मुलांना व मुलींना कामावर ठेवता येत नाही तसेच त्यांना ठेवल्यास आस्थापना मालकास २० ते ५० हजार रुपयांचा दंड व २ ते ३ वर्षाची शिक्षा किंवा यापैकी दोन्ही होवू शकते याबाबत विस्तृत अशी माहिती दिली.तसेच १४ वर्षावरील मुलांना शाळेच्या वेळेवर सुट्टी देणे,दोन ते तिन तासांनी त्याला ब्रेक देणे यासह इतर सर्व सोयी सुविधा पुरविणे हे आस्थापना मालकाला बंधनकारक असून त्यांना धोक

राजश्री शाहु महाराज यांच्या विचारांचा आदर्श घेऊन व्यक्तिमत्व घडवावे जिल्हाधिकारी अमोल येडगे गुणवत्ता पुरस्काराचे वितरण सामाजिक न्याय दिन साजरा

Image
यवतमाळ,दि.२६ जून (जिमाका)राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचे अधिष्ठान लाभलेले महाराष्ट्र राज्य आपल्या भारत देशातील एक पुरोगामी राज्य आहे.याच महाराष्ट्राच्या भूमीतील कर्ते समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती संपूर्ण भारतभर सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी होत आहे. त्यांनी विकसित राज्य निर्माण केले. त्यांचा आदर्श व त्यांच्या विचारांची प्रेरणा घेवून विद्यार्थांनी व्यक्तीमत्वाचा विकास साधावा व यश प्राप्त करावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,साहयक आयुक्त समाज कल्याण कार्यालय,समाजिक न्याय भवन येथे समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती.“सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी,डॉ.श्रीकृष्ण पाचांळ, समाज कल्याणचे सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी पियुष चव्हाण, संशोधन अधिकारी, जिल्हा जात पडताळणी मंगला मून उपस्थित होत्या. यावेळी सर्वप्रधम राजश्री शाहु मह

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी संजीवनी मोहिमेचा लाभ घ्यावा

यवतमाळ,दि.२० (जिमाका),स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात कृषी संजीवनी मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत विविध उपक्रमाने विविध दिन साजरे करण्यात करण्यात येणार असून 25 जून ते 1 जुलै 2023 दरम्यान, जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या मोहिमे अंतर्गत गाव बैठका,शिवार भेटी व शेती शाळांचे आयोजन करण्यात येणार असून शेतकऱ्यांसोबत गावात कृषी विषयक राबविल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना भेटी देण्यात येणार आहेत. तसेच दिवस निहाय उपक्रम राबविण्यात येणार असून दि.25 जूनला कृषी पीक तंत्रज्ञान प्रसार दिन, 26 जूनला पौष्टिक आहार प्रसार दिन, 27जूनला कृषी महिला शेतकरी सन्मान दिन, 28 जूनला जमीन सुपीकता जागृती दिन, 29 जूनला कृषी क्षेत्राची भावी दिशा दिन, 30 जूनला कृषी प्रक्रिया तंत्रज्ञान प्रचार दिन तसेच १जुलैला कृषी दिन साजरा केला जाणार आहे. हा कालावधी खरीप पिकाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने या मोहिमेद्वारे कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नवीन तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करून शेतकऱ्यांनी तंत्

उमरखेड येथील रोजगार मेळाव्यात १९७ उमेदवारांची प्राथमिक निवड

३२ उमेदवारांना जाग्यावरच ऑफर लेटर यवतमाळ,दि.२० जून (जिमाका):-जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,तसेच शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,उमरखेड यांचे संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १३ जूनला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,उमरखेड येथे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यामध्ये १९७ उमेदवारांची प्राथमिक निवड झाली असून ३२ उमेदवारांना जाग्यावरच ऑफर लेटर वितरित करण्यात आले. मारुती सुझुकी मोटर्स प्रा.लि,उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यवतमाळ,व्हेरॉक इंजिनिअरिंग,औरंगाबाद,क्वेस कॉर्प लि.पुणे,सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी,यवतमाळ इत्यादी नामांकित कंपन्या तसेच बँक यांनी या रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदविला. सदर कंपन्यात १७४७ रिक्त पदाकरिता उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तसेच या रोजगार मेळाव्या करिता जिल्ह्यातील ३९४ उमेदवारांनी सहभाग घेतला,असून त्यामधील १९७ उमेदवारांची प्राथमिक निवड झाली आहे तर ३२ उमेदवारांना जाग्यावरच ऑफर लेटर वितरित करण्यात आले. यावेळी रोजगार मेळाव्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांन

बालकामगार कृतीदलाच्या धाडीत एका बालकामगाराची मुक्तता

यवतमाळ,दि.२० जून (जिमाका):- जिल्हा कामगार कृतीदलाने १५ जूनला टाकलेल्या धाडीत मदिना टायर वर्क्स ,पिंपरी रोड,पांढरकवडा इथे १८ वर्षाखालील एक बालक काम करताना आढळून आले होते. कृतिदलाने बालकास मुक्त करून बालकल्याण समिती, यवतमाळ यांना सपूर्द केले. बालकामगार ही अनिष्ट प्रथा बंद व्हावी व जिल्हा बालकामगार मुक्त व्हावा याकरिता जिल्हाधिकारी अमोल येडगे, सरकारी कामगार अधिकारी रा.रा.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पांढरकवडा येथे १५ जून रोजी धाड टाकण्यात आली. मदिना टायर वर्क्सचे मालक मोहम्मद सज्जात अन्सारी यांच्याविरुद्ध मुलाची काळजी व संरक्षण कायदा २०१५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध व नियमन अंतर्गत कलम ३ मध्ये स्वतंत्र खटला दाखल करण्याची कारवाई सुद्धा यावेळी करण्यात आली. सदर धाडीमध्ये दुकाने निरीक्षक विजय गुल्हाने,रवींद्र जतकर,विनोद कुमार चोपकर,महात्मा ज्योतिबा फुले समाज कार्य महाविद्यालयाचे निरंजन मलकापुरे,जिल्हा समादेशक सतीश दिघळे,आकाश बुरेवार,महिला बाल विकास विभाग,जिल्हा बाल संरक्षण कक्ष प्रकाश नानाजी चहाणकर,चाईल्ड लाईनचे श्री.दाभाडकर,तसेच पोलीस कॉन्स्टेबल आ

अनधिकृत व बोगस बियाण्यांची विक्री करणा-यांवर गुन्हे दाखल करा जिल्हाधिकारी यांचे आदेश

यवतमाळ, दि 20 जून जिमाका:- कृषि निविष्ठांचा काळाबाजार करणा-यांवर तसेच अनधिकृत व बोगस बियाण्यांची विक्री करणा-यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देतानाच बोगस बियाणे तयार करणा-यांची गोदामे शोधून पुढील दहा दिवसात अनधिकृत बियाणे जप्त करण्याची कारवाई करावी. शेतकऱ्यांना यापुढे बोगस बियाणे मिळणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी, असे सक्त आदेश आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत. खरीप हंगाम २०२३ मध्ये कृषि निवीष्ठांच्या नियोजनासाठी आज जिल्हास्तरीय कृषि निवीष्ठा सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेमध्ये जिल्ह्याला आवश्यक बियाणे व खते याबाबत महिनानिहाय नियोजनाबाबत चर्चा झाली. शेतकऱ्यांना पुरवठा होणाऱ्या कृषि निवीष्ठांच्या गुणवत्तेसाठी जिल्ह्यामध्ये स्थापन केलेल्या १७ भरारी पथकामार्फत प्रत्येक तालुक्यात तपासणी करावी व अनधिकृत बियाणे व खते विक्री व साठा करणा-यांवर कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. अवैधरित्या अनधिकृत कापुस बियाण्यांची (HTBT) वाहतुक, वितरण, विक्री व साठवणुक होवु नये याकरीता भरारी

शेतीपिक उत्पादन वाढीसाठी मधुमक्षिका पालन योजना इच्छुक व्यक्ती व संस्थाकडून अर्ज आमंत्रित

यवतमाळ,दि.२० जून (जिमाका):- मधमाशा द्वारे शेतीपिके व फळ बागायतीच्या पिकाचे पर-परागीभवन होऊन पिकाच्या उत्पादनात पिकाच्या प्रकारानुसार पाच ते ८० टक्केपर्यंत वाढ होण्यास मदत होते. यामुळे मधमाशांचे संरक्षण, संवर्धन व मधमाशांमुळे होणारे फायदे याबाबत जनजागृती होण्यासोबतच शेतकऱ्यांना जोडधंदा आणि त्यांच्या शेती उत्पादनात वाढ होण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकरी व संस्थांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे. या योजनेची वैशिष्टे:- मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण,साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुतंवणूक,शासनाच्या हमी भावने मध खरेदी,विशेष/छंद प्रशिक्षणाची सुविधा,मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती करणे. योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता वैयक्तिक मधपाळ:- हा साक्षर असावा,तसेच स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य राहील. वय १८ पेक्षा जास्त असावे. केंद्रचालक प्रगतीशील मधपाळ:- हा किमान १० वी पास असावा, वय २१ पेक्षा जास्त असावे,अशा व्यक्तिच्या नावे किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबात

दुध, मास, अंडी आणि मासे यांचे जिल्ह्यातील उत्पादन वाढवा रोजगार निर्मितीसोबतच दरडोई वापर वाढवा जिल्ह्याचा पुढील २५ वर्षाचा आराखडा तयार करण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सूचना

यवतमाळ, दि १९ जून, जिमाका:- पुढील २५ वर्षाचे म्हणजे सन २०४७ पर्यंतचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन जिल्हयातील रोजगार, दरडोई उत्पन्न आणि दुध, मांस, अंडी आणि मासे यांचा दरडोई वापर वाढविण्यासाठी जिल्ह्यात दुग्धउत्पादन, मत्स्य उत्पादन, मांस उत्पादन आणि अंडीउत्पादन वाढविण्यासाठी संबंधित विभागांनी पुढील आठवड्यात संपूर्ण आराखडा सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिल्यात. शासनाचे सन २०४७ चे उद्दिष्ट ठेऊन जिल्ह्याचा विकास आरखडा तयार करण्याचे निर्देश आहेत. त्यानुशंगाने जिल्हाधिकारी यांनी आज पशुसंवर्धन, मत्स्य विकास विभाग, कृषी,वनविभाग आणि सहकार विभागासोबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकिला उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद दुबे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. क्रांती काटोले, जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लवाडे,जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, पशुसंवर्धन उपायुक्त श्री. अलोणे उपस्थित होते. पशुसंवर्धन विभागाने आजची जनावरांची

इसदा तारकर्ली येथे जीव रक्षक प्रणालीचे प्रशिक्षण ईच्छुकांनी आजच ऑनलाईन अर्ज भरावा जिल्ह्यातील ५ युवकांना मिळणार संधी

यवतमाळ, दि १९ जुन, जिमाका:- महाराष्ट्रामध्ये जल पर्यटन विकासासाठी मोठी संधी आहे. जलपर्यटन उच्च दर्जाचे आणि सुरक्षित बनविण्यासाठी जलपर्यटन क्षेत्रात प्रशिक्षित कुशल मनुष्यबळाचा विकास करणे गरजेचे आहे. स्थानिक युवकांना प्रशिक्षित केल्यास त्यांना रोजगार निर्माण होईल. तसेच सुरक्षीत जल पर्यटन विकसित होण्यास वाव मिळेल. यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने जून ते सप्टेंबर २०२३ या काळात प्रत्येक जिल्ह्यातील ५ युवकांना जीव रक्षक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ईच्छुक युवक, युवतीनी २० जुन पर्यंत website:www.mtdc.चो या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा असे आवाहन जिल्हा प्रशसनाच्या वतीने करण्यात आले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने महाराष्ट्रामध्ये जल पर्यटन विकसित करण्याच्या दृष्टीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड ॲक्वाटिक स्पोर्टस (इसदा),तारकर्ली ता.मालवण जि.सिंधुदुर्ग येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जल पर्यटन प्रशिक्षण संस्था वर्ष २०१५ मध्ये निर्माण आणि विकसित केली आहे. इसदा जल पर्यटन प्रशिक्षण केंद्र भारतातील पहिले आणि आशिया पॅसिफिक क्षेत्रा

बालसंस्कार केंद्रासाठी स्वयंसेवी संस्थांकडुन प्रस्ताव आमंत्रित

यवतमाळ, दि १९ जून जिमाका:- जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेंतर्गत नाविन्यपुर्ण योजना सन 2022 -23 मधुन कोलाम पोडावर बालसंस्कार केंद्र सुरु करण्याची योजना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. अनुसूचित जामातीच्या 3 ते 12 वर्षे वयाच्या (कोलाम) मुलांकरीता कोलाम पोडवर 40 बालसंस्कार केंद्र सुरु करण्यासाठी नोंदणीकृत स्वंयसेवी संस्थांकडुन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. योजना राबविण्याचा कालावधी 10 महीने आहे. या योजनेकरीता अर्जदाराने प्रस्तावासोबत संस्थेची घटना, संस्था नोंदणी प्रमाणपत्र, 3 वर्षाचे लेखापरिक्षण अहवाल, कामाचा अनुभव कागदपत्रे, 5 लक्ष बँक सॉलवन्सी, प्रशिक्षण शुल्क दरपत्रक, कर्मचारी यादी, नाश्ता व निवास दरपत्रक ई. कागदपत्रे जोडावित. विहीत नमुन्यातील परिपुर्ण भरलेला अर्ज २७ जून पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रकल्प कार्यालयास सादर करावा. नंतर प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाही. अधिक माहितीसाठी कार्यालया दूरध्वनी 07235-227436 वर संपर्क साधावा असे आवाहन सहायक जिल्हाधिकार तथा प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा याशनी नाग

रात्री दीडपर्यंत पालकमंत्र्यांनी घेतला जनतेच्या तक्रारींचा आढावा ५३६ तक्रारी निकाली, ३१९ नवीन प्राप्त. नेरमध्ये भरला जनता दरबार

यवतमाळ, दि १६ जिमाका:- नेर मध्ये झालेल्या जनता दरबारमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी रात्री दीड वाजेपर्यंत जनतेच्या तक्रारी ऐकुन त्यांचे निराकरण केले. यावेळी आजंती गावातील पारधी समाजाच्या नागरिकांना घरकुलासाठी जागा देण्याचा प्रलंबित प्रश्न तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिलेत. या जनता दरबार मध्ये जुन्या ५३६ तक्रारी निकाली काढण्यात आल्या तर नव्याने ३१९ तक्रारी प्राप्त झाल्यात. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक डॉ. पवन बनसोड,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले, तहसिलदार शिवाजी मगर, गटविकास अधिकारी राजीव शिंदे उपस्थित होते. यावेळी जनतेशी संवाद साधताना पालकमंत्री म्हणाले, कि जनतेच्या आशिर्वादाने तिनदा मंत्री म्हणुन काम करण्याची संधी मिळाली. पालकमंत्री म्हणुन समाधान शिबिराच्या माध्यमातुन जनतेच्या तक्रारी निकाली काढण्याचा प्रयत्न मी पूर्वीही केला होता. त्यावेळी वणी पासुन उमरखेड पर्यंत तक्रारी प्राप्त झाल्यात आणि प्रशासनाने त्या निक

पोलीस दलातील २९ गस्ती वाहनांचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण पोलिस दलाच्या बळकटीकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही -पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ,दि.१६ (जिमाका) :- जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चांगल्या वाहनांची गरज लागते या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने माझ्या जिल्ह्याच्या पोलीस दलाचे बळकटीकरण करणे माझे प्रथम कर्तव्य आहे. म्हणुनच जिल्हा नियोजन समितीमधून आज पोलिस दलाला २९ वाहने उपलब्ध करून दिली आहे. आपल्या जिल्ह्याच्या पोलीस दलाचे बळकटी करणासाठी आवश्यक ती सर्व मदत करायला तयार असल्याची ग्वाही अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. आज पोलीस मुख्यालयात यवतमाळ जिल्हा पोलीस विभागासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या नऊ चार चाकी वाहने,दहा टी.व्ही.एस.मोपेड तर दहा हिरो मोटर सायकल अशा एकोणतीस गस्ती वाहनांचे हस्तांतरण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी आमदार मदन येयेरावर,जिल्हा पोलीस अधिक्षक पवनकुमार बनसोड,अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप,तसेच पोलीस विभागातील पोलीस अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री यांनी वाहनांचे पूजन करून वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी बोलताना मंत्री श्री राठोड

मीनाबाजार ,क्राप्ट बाजार, सर्कस याकरीता आझाद मैदान जाहीर लीलावाने देणार

यवतमाळ दि. १३ जून (जिमाका) :- मीनाबाजार, प्रदर्शनी ,क्राप्ट बाजार, सर्कस इत्यादी प्रयोजनाकरीता आझाद मैदान भाडयाने देण्यांच्या कार्यपध्दतीमध्ये अधिकाधिक पारदर्शकता राखण्यासाठी तसेच प्रकियेमध्ये सहभागी होण्याची पुरेशी संधी संबधीतांना मिळावी व शासनास तसेच मैदानांच्या देखभालीसाठी योग्य प्रमाणात महसूल प्राप्त व्हावा याअनुषंगाने जाहीर लिलाव पध्दतीने प्रकिया राबविण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिलेली आहे. आझाद मैदान सदरचे प्रयोजनाकरीता भाडयाने घेण्यास लिलावात भाग घेण्याकरीता अर्ज फी २००० रुपये सह www.sdoyavatmal.in या संकेतस्थळावर आधारकार्ड, फोटो, चारित्र्य प्रमाणपत्रासह ऑनलाईन अर्ज १३ जून ते १९ जून या कालावधीत करता येईल. इतर सर्व विस्तृत माहिती व अटी व शर्ती बाबत उपविभागीय अधिकारी कार्यालय यवतमाळ, तहसिलदार कार्यालय यवतमाळ, मुख्याधिकारी न.प. यवतमाळ, यांचे सुचना फलकावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिनी राबवले जनजागृती अभियान सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन

यवतमाळ,दि.१३ जून, (जिमाका) :- 12 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिन म्हणून संपूर्ण जगात पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,चाईल्ड लाईन,तसेच जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात जनजागृती सप्ताहाचे अयोजन करण्यात आले होते.या दिवशी शहराच्या मुख्य बाजारपेठेत ७३ आस्थ्यापनांना भेटी देण्यात आल्या व आस्थापनेच्या दर्शनी भागात “आमच्या येथे बाल कामगार काम करीत नाही” असे स्टिकर्स लावण्यात आले. यावेळी सरकारी कामगार अधिकारी रा.रा.काळे,सचिव जिल्हा विधी सेवा श्री नहार,जिल्हा चाईल्ड लाईनचे श्री.दाभाडकर निरीक्षक वि.पा.गुल्हाने यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले. १४ वर्षाखालील बालकास कामावर ठेवण्यांस बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन),अधिनियम,१९८६ या कायद्यान्वये प्रतिबंध करण्यात आलेला आहे. १४ ते १८ वर्ष वयोगटातील किशोरवयीन बालक यांना धोकादायक उद्योगांमध्ये काम करण्यास प्रतिबंध आहे. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठकांचे आयोजन करून त्यामध्ये जिल्ह्यातील दुकाने, हॉटेल्स, व्यापारी संस्था व इतर आस्थापनांच्

नगरपरिषद, नगरपंचायतमधील अनुकंपा उमेदवारांची प्रतीक्षासूची जाहीर

यवतमाळ, दि. १२ जून (जिमाका):- यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद , नगरपंचायत मधील गट क व गट-ड संवर्गातील अनुकंपा उमेदवारांची १ जानेवारी २०२३ या दिनांकावर आधारित सन २०२२ या वर्षातील पात्र उमेदवारांची अंतिम प्रतीक्षासूची जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे कार्यालयातील सूचना फलकावर, yavatmal.nic.in या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद /नगरपंचायत कार्यालयाचे सूचना फलकावर अनुकंपा उमेदवारांच्या माहितीसाठी आज १२ जून २०२३ रोजी प्रसिध्दी करण्यात आलेली आहे.याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कळविले आहे.

खड्डेमुक्त योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी शासनाव्दारे पीसीआरएस ॲप नागरिक ॲपच्या माध्यमातून रस्त्यावरील खड्याची करु शकतात तक्रार टोल फ्री क्रमांक 91-22-26201604 वर करा तक्रार

यवतमाळ, दि १२, (जिमाका):- राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या खड्डेमुक्त योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाव्दारे पीसीआरएस ॲप सुरू करण्यात आले आहे. या अँपच्या माध्यमातुन सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यांवरील खड्यांची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागास कळवून त्या माहितीच्या सहाय्याने खड्डेमुक्त योजनेच्या माध्यमातून शहरासह जिल्ह्याला खड्डेमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने येणाऱ्या या योजनेसंदर्भात सामान्य माणसांमध्ये जनजागृती व्हावी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरिकांना, "पीसीआरएस" हा नवीन ॲप आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करून घ्यावा लागणार आहे. कोणत्याही नागरिकाची खड्यांविषयी तक्रार असल्यास त्यांना या ॲपच्या माध्यमातून त्याची थेट माहिती सार्वजनिक बांधकाम विभागास देता येणार आहे. त्यासाठी तक्रार करणाऱ्यांना आधी खड्यांचा फोटो काढावा लागणार आहे. त्यानंतर पीसीआरएस या ॲपमध्ये हा फोटो अपलोड करावा लागणार आहे. या ॲपमध्ये तक्रार केलेल्या फोटोवरून रस्त्यावर पड

तंत्रशिक्षण पदविका व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

यवतमाळ, दि ९ जून, (जिमाका):-येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला ऑनलाईन पद्धतीने सुरुवात झाली आहे. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना २१ जून २०२३ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करताना कागदपत्रांच्या छायांकित प्रतीही स्कॅन करून अपलोड कराव्या लागणारआहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या सविस्तर माहितीसाठी http://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी,तसेच पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक ऑनलाईन नोंदणी मुदत १ जून ते २१ जून २०२३,तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिध्द दि.२३ जून २०२३,आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत २४ जून ते २७ जून २०२३,अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द दि.२९ जून २०२३ असून दहावीनंतरच्या प्रथम वर्ष व थेट व्दितीय वर्षाच्या अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी व त्यांना प्रवेश अर्ज भरणे,त्यांचे समुपदेशन करणे व प्रवेश प्

जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा

यवतमाळ,दि.9 जून (जिमाका):-महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र तसेच जिल्हा उद्योग केंद्र व्दारा सर्व साधारण प्रवर्गातील युवती,महिला व पुरूषांकरिता फॅशन डिझाईनिंग व संगणक डीटीपी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून या प्रशिक्षण कार्यक्रमात तांत्रिक प्रशिक्षणासह विविध शासकीय योजनांची माहिती व उद्योगाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणासाठी उमेदवाराची निवड मुलाखातीव्दारे करण्यात येणार असून प्रशिक्षणार्थीचे वय १८ ते ४५ असावे,शिक्षण किमान सातवा वर्ग पास असणे आवश्यक आहे.सदर प्रशिक्षण नोंदणीकरिता १४ जून २०२३ पर्यंत नोंदणी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,दारव्हा रोड यवतमाळ येथे करावी. तसेच अधिक माहितीसाठी कार्यक्रम आयोजक अश्विनी बुटे यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,यवतमाळ यांनी केले आहे.

डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना प्रस्ताव सादर करण्याची मुदत ३० जून

यवतमाळ,दि.९ जून,(जिमाका):-राज्यातील नोंदणीकृत मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना ११ ऑक्टोबर २०१३ च्या शासन निर्णयानुसार कार्यान्वीत करण्यात आली आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी मदरसा चालविणाऱ्या संस्था धर्मादाय आयुक्त अथवा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.या योजने अंतर्गत विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू हे विषय शिकविण्या करीता शिक्षकांना मानधन,पायाभूत सुविधा व ग्रंथालयासाठी अनुदान देण्यात येते.इच्छुक मदरसांनी परिपुर्ण प्रस्ताव ३० जून पूर्वी जिल्हा नियोजन समिती, यवतमाळ येथे सादर करावा. शासन निर्णयातील तरतुदीनुसार जास्तीत जास्त ३ डी.एड/बी.एड शिक्षकांना मानधन अनुज्ञेय आहे. ग्रंथालयासाठी तसेच शैक्षणिक साहित्यासाठी फक्त प्रथम वर्षी रु.५० हजार व तद्नंतर प्रति वर्षी रु.5 हजार अनुदान देय आहे.तसेच पायाभूत सुविधांसाठी जास्तीतजास्त रु. 2 लाख अनुदान देय आहे.पायाभूत सुविधांपैकी ज्या प्रयोजनांसाठी यापूर्वी अनुदान देण्यात आले आहे,त्या प्रयोजनासाठी पुन्हा अनुदान देण्यात येणार नाही. स्किम फॉर प्रोव्हायडींग क

उमरखेड येथे १३ जूनला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा १५२७ जगांसाठी होणार निवड

यवतमाळ, दि 8 जून (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरखेड यांचे संयुक्त विद्यमाने १३ जून सकाळी १० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरखेड येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रोजगार मेळाव्याकरीता एकूण १५२७ रिक्तपदे विविध नामांकित कंपन्या सुझुकी मोटर्स, गुजरात, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, यवतमाळ, व्हेरॉक इंजिनिअरींग, वाळुज, औरंगाबाद, धुत ट्रान्समिशन, औरंगाबाद, मेगाफिड बायोटेक, नागपूर, सहयोग मल्टीस्टेट क्रेडि को ऑप सोसा. नागपूर / यवतमाळ, क्वेस कॉर्प लि-टाटा मोटर्स पूणे यांच्याकडून उपलब्ध झालेली आहे. सदर मेळाव्यामध्ये १० वी, १२ वी, आय.टि.आय, पदविकाधारक, पदवीधर तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहुन या संधीचा लाभ घेता येणार आहे. सदर मेळाव्यास उद्योजकांकडून उमेदवारांशी प्रत्यक्ष थेट मुलाखतीव्दारे रिक्तपदांकरीता निवड करण्यात येणार आहे. तरी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्य

डॉ.भालचंद्र स्मृती दृष्टीदिन १० जूनला

यवतमाळ,दि.८ जून,(जिमाका):- डॉ.भालचंद्र हे प्रख्यात नेत्रशल्य चिकित्सक होते.त्यांच्या जीवन कालावधीत कुठलीही आधुनिक सोयीसुविधा नसतांना अंधत्व निर्मुलन कार्य करून त्यांनी हजारो यशस्वी मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या. त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता कार्यक्रमांतर्गत १० जून ते १६ जून हा सप्ताह जिल्ह्यात विविध ठिकाणी नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करून डोळ्यांच्या आजाराबाबत व नेत्रदान बाबत जनजागृती केली जाणार आहे. नेत्रदान श्रेष्ठदान,नेत्रदान हे अंध व्यक्तीच्या जीवनात प्रकाश आणतो.नेत्रदान करून अंधाना जीवन जगण्यासाठी नेत्र उपगोगी ठरतात. त्यामुळे प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प करणे गरजेचे आहे.१ वर्षावरील कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते.एखाद्या व्यक्तीला चष्मा लागला असेल,डोळ्यांचे ऑपरेशन झाले असेल,मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेली असेल,तसेच उच्च रक्तदाब व मधुमेह असणारे व्यक्ती सुध्दा नेत्रदान करू शकतात.अशी माहिती नेत्र शल्यचिकित्सक डॉ.मनोज तगडपल्लेवार यांनी दिली आहे.

कौशल्य विकास विभागातर्फे १७० जागांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा

यवतमाळ दि. 8 जून ,(जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचेमार्फत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा ८ जून ते १४ जून दरम्यान होणार आहे. स्थानिक पातळीवर तसेच बाहेरील ठिकाणी औद्योगिक संस्थांना मनुष्यबळाची मागणी या कार्यालयाकडे नोंदविण्यातआलेली आहे. सदर मागणीच्या अनुसरुन जिल्ह्यातील तसेच इतर ठिकाणच्या कंपनीशी संपर्क साधून धुत ट्रान्समिशनऔंरगाबाद व टॅलेन सेतू प्रा.लि. पूणे या कंपनी मार्फत एकूण १७० रिक्त पदांकरिता ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजनकरण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना rojgar.mahaswayam.gov.inया वेब पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी होता येणार आहे. सदर मेळाव्यामध्ये किमान १२ वी.उत्तीर्ण झालेले इंजिनियरींग पदवी, पदविका, नर्सिंग पदवी, पदविका धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवारांना त्यांच्याकडील सेवायोजना कार्डचा (एम्प्लॉयमेंट कार्ड) युजरनेम व पासवर्ड लॉगिन करून सदर मेळाव्यामध्ये सहभागी होता येईल. सदर ऑनलाईन मेळाव्या करिता उमेदवारांकडे सेवायोजन कार्ड (एम्प्लॉ

गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास २ लक्ष रुपये आर्थिक सहाय्य

यवतमळ, दि ८ जुन :- पूर्वी राज्य शासन राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता विमा कंपन्यांकडे भरायचे आणि विमा कंपनी शेतक-यांचे प्रस्ताव तपासून ते मान्य करायचे. हा विलंब टाळण्यासाठी आणि अपघातग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्याच्या उद्देशाने शासनाने नवीन गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह योजना मंजूर केली आहे. अपघातात आता बाळंतपणातील मृत्यूचा देखील समावेश करण्यात आला आहे तसेच वारसाच्या खात्यात डीबीटीद्वारे रक्कम जमा होणार आहे. राज्यात यापूर्वी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कार्यान्वित होती. मात्र विमा कंपन्यांच्या असमाधानकारक अनुभवामुळे आता शासनाने शेतक-यांना स्वत:च आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेऊन त्याची घोषणा यावर्षीचे अंदाजपत्रक सादर करताना केली आहे.तसेच या संदर्भात शासन निर्णय सुद्धा जारी करण्यात आला आहे. योजनेत समाविष्ट अपघात राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, रस्ता/ रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश, विंचूद

'शासन आपल्या दारी' शिबिरात दोन दिवसात ४० हजार प्रमाणपत्रांचे वितरण विविध विभागांच्या योजनांसाठी लाभार्थ्यांची नोंदणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उद्या ९ जूनला सुद्धा आयोजन नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

यवतमाळ दि 8 जून जिमाका :- जनतेला गावातच आवश्यक सेवा आणि योजनांची माहिती मिळून योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या 'शासन आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत यवतमाळ जिल्ह्यात ५ व ७ जुन या दोन दिवसात घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये एकूण ४० हजार ३७६ लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरित करण्यात आली आहे, तसेच योजनांचा लाभ देण्यात आला आहे. नागरिकांच्या आवश्यक प्रमाणपत्रे आणि दाखल्यांसाठी सरकारी कार्यालयाच्या फे-या थांबविण्यासाठी शासनाने गावातच एका छताखाली नागरिकांना सर्व योजना आणि महत्वाचे प्रमाणपत्र व दाखले देण्याचा निर्णय घेतला. यासाठी 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम १५ मे पासुन राबविण्यात येत असुन याला १५ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात ५ व ७ जुन रोजी ९० गावांमध्ये शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर, डोमिसाईल, दुय्यम शिधापत्रिका, शिधापत्रिका, आधार कार्ड, सातबारा व ८ अ, एस टी कार्ड, प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड, पी एम किसान नोंदणी, स्तनदा मातांना बालकांसाठी बेबी केयर किट, तसेच विविध विविध विभगांच्या ल

गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीसाठी मदत निधी वितरित शासन निर्णय जारी मार्च व एप्रील २०२३ आणि ऑक्टोबर २०२१ कालावधीतील नुकसानीसाठी मदत पालकमंत्री संजय राठोड यांच्या पाठपुराव्याला यश

यवतमाळ, दि ८ जुन जिमाका:- सन २०२१ या कालावधीत तसेच मार्च व एप्रिल २०२३ या कालावधीत जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या कालावधीत झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याचा शासन निर्णय ५ जुनला जारी करण्यात आला आहे. यावतमाळ जिल्ह्यातील एकुण ३९ हजार ३६३ शेतकऱ्यांना ३२ कोटी ५४ लक्ष १४ हजार रुपये नुकसानीसाठी मदत निधी मंजुर झाला आहे. सन ऑक्टोबर २०२१ चा निधी प्रलंबित होता यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळून शासनाने मदत निधीचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. सन ऑक्टोबर २०२१ या कालावधीत गारपिट व अवेळी पावसामुळे शेतीचे व बहुवार्षिक पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यासाठी पालकमंत्री यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली आहे. यात ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान मदत देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा, पुसद, उमरखेड, आणि पांढरकवडा या चार तालुक्यात २६ हजार ८३३ शेतक-यांचे २२,७८२.१० हेक्टर शेतपिकाचे नुकसान झाले होत

जिल्हाधिकारी यांची "शासन आपल्या दारी शिबिराला" भेट आकपुरी, लोणबेहळ, मुडाना, विडुळ गावातील शिबिराला भेट नागरिकांना प्रमाणपत्राचे वाटप

यवतमाळ, दि ७ जून जिमाका:- नागरिकांना सर्व विभागाच्या योजनांची माहिती आणि त्यासाठीचे अर्ज गावातच उपलब्ध व्हावे,तसेच दैनंदिन कामासाठी लागणारे महत्वाचे दाखले, आधार कार्ड, रेशन कार्ड, सातबारा तसेच विद्यार्थ्यांसाठी असलेले विविध दाखले गावातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने "शासन आपल्या दारी" हा उपक्रम सुरू केला आहे. शासन आपल्या दारी शिबिराच्या माध्यमातुन नागरिकांनी जीवन सुकर करण्यासाठी आवश्यक योजनांसाठी नोंदणी करावी तसेच दाखले व प्रमाणपत्रे उपलब्ध करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. "शासन आपल्या दारी" उपक्रमांतर्गत आज यवतमाळ तालुक्यातील आकपुरी, आर्णी तालुक्यातील लोणबेहळ, कवठा बाजार सुकळी, महागाव तालुक्यातील मुडाणा, भोसा गावांमध्ये शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी यवतमाळ तालुक्यातील आकपुरी येथील शिबिराला भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी तहसिलदार योगेश देशमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, गावातील नागरिकांना अगदी छोट्या कारणांसाठी तालुक्याच्या ठिकाणी फेऱ्या माराव्या लागतात. नागरि

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी अर्ज आंमत्रित

यवतमाळ,दि. 5 जून.(जिमाका):-महाराष्ट्र राज्य इतरमागासवर्गीय वित्त विकास महामंडळ यांचे मार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते. जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. करिता शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनांचे उद्देश,स्वरूप व पात्रतेचे निकष याबाबत सविस्तर माहिती करिता महामंडळाच्या www.msobcfdc.org या वेबसाईट वर अर्ज करावे, अथवा ०७२३२-२४३०५२ या कार्यालयाच्या दूरध्वनी वर संपर्क साधावा,असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.के.बेझलवार यांनी केले आहे.

ग्रामपंचायत स्तरावरील तक्रारी प्राधान्याने निकाली काढा -जिल्हाधिकारी अमोल येडगे लोकशाही दिनात २०६ तक्रारी

Image
यवतमाळ,दि.५जून (जिमाका):-लोकशाही दिनात ग्रामसेवकांच्या स्तरावरील प्रकरणे व अतिक्रमण याबाबत खूप तक्रारी येत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत बैठक लावून पुढील लोकशाही दिनाच्या पूर्वी ग्रामपंचायत स्तरावरील तक्रारी प्राधान्याने निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात. बळीराजा चेतना भवन येथे आज जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर लोकशाही दिनात निवासी उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, तसेच इतर सर्व विभाग प्रमुख बैठकीस हजर होते. आज लोकशाही दिनात एकुण -२०६ तक्रारी प्राप्त झाल्यात (स्वीकृत २ व अस्वीकृत-२०४). लोकशाही दिनातील सर्व प्रकरणाचा जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला.तसेच शासन आपल्या दारी या योजनेचा कालावधी शासनस्तरावरून ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आला असून मुख्यमंत्री कार्यालयाकडून तसा आराखडा प्राप्त झाला आहे. त्या फॉरमॅटनुसार तीन दिवसाचे कॅम्प मोठ्या गावांमध्ये घेण्याच्या सूचना सर्व तालुक्यांना दिलेल्या आहेत. तसेच संबंधित विभागांनी शिबीर घेवून शासन आपल्या दारी हा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम जिल्ह्यात यशस्वी करावा अश्या सूचना जिल्हा

सुशिक्षित बेरोजगार अभियंतांची काम वाटप सभा १२ जूनला

यवतमाळ, दि. ५ जून (जिमाका):- सार्वजनिक बांधकाम मंडळ, यवतमाळ अंतर्गत सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांची काम वाटप सभा १२ जून २०२३ रोजी दुपारी ३ वाजता सार्वजनिक बांधकाम मंडळ सभागृह, यवतमाळ येथे आयोजीत केली आहे. तरी सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनी ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रासह उपस्थित रहावे. असे आवाहन अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, यवतमाळ यांनी केले आहे.

दिव्यांगांना एकाच ठिकाणी सर्व दाखले व प्रमाणपत्र उपलब्ध करून द्या -जिल्हाधिकारी अमोल येडगे

"दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी" अभियान 6 जूनपासून जिल्ह्यात राबवणार यवतमाळ, दि ५ जुन:- दिव्यांगांना दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी सुद्धा त्यांना त्रास होतो. दिव्यांगांना आवश्यक असणारी सर्व प्रमाणपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी" हे अभियान 6 जून पासून राज्यभर राबविण्यास सुरुवात होत आहे. जिल्ह्यात हे अभियान राबवताना दिव्यांगांना एकाच ठिकाणी सर्व दाखले आणि प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. हे अभियान राबवण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकिला जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी पियुष चव्हाण, डॉ. तरंगपल्लिवार, नगर परिषद प्रतिनिधी तसेच दिव्यांग सदस्य उपस्थित होते. या अभियानामध्ये दिव्यांगांना विविध दाखले उपलब्ध करुन देण्यासाठी शिबिर

तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरुपातील शिक्षकांची नियुक्तीची कार्यवाही रद्द

यवतमाळ, दि. २ जून (जिमाका):- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडातर्फे सुरु असलेल्या १८ शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील सन २०२३-२४ मध्ये तात्पुरती व्यवस्था म्हणुन कायम स्वरुपी शिक्षक नियुक्ती होईपर्यंत तासिका पध्दतीने उच्च माध्यमिक शिक्षक/ माध्यमिक शिक्षक/ प्राथमिक शिक्षक या पदासाठी होणारी नियुक्ती प्रक्रिया थांबविण्यात आलेली आहे. आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहामध्ये सन २०२३-२४ च्या शैक्षणिक सत्रापासून एकही कर्मचारी रोजंदारी तासिका तत्वावर घेण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश दिलेले आहे. त्यानुसार या प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या १८ शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील सन २०२३-२४ मधील तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरुपातील शिक्षकांची नियुक्तीची कार्यवाही रद्द करण्यात येत असल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन यांनी कळविले आहे.

प्रोत्साहनपर लाभ योजना: शेतकऱ्यांनी ५ जून पर्यंत आधार प्रमाणिकरण करावे.

यवतमाळ, दि. २ जून (जिमाका):- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेची अंमलबजावणी सुरु असुन या योजनेंतर्गत विशिष्ठ क्रमांकाचे यादीत नाव समाविष्ठ असलेल्या परंतू आधार प्रमाणिकरण न झालेल्या मयत / वारस लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणिकरणाची सुविधा दिनांक ५ जुन,२०२३ पर्यंत उपलब्ध राहणार आहे. विशिष्ठ क्रमांकाचे यादीमधील ज्या लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत आधार प्रमाणिकरण केलेले नाही त्यांना प्रोत्साहनपर रक्कमेचा लाभ मिळू शकणार नाही. विशिष्ठ क्रमांकांचे यादीत नाव असलेल्या व अजुनही आधार प्रमाणिकरण न केलेल्या सर्व लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी जवळचे सेतू सुविधा केंद्रावर जाऊन दिनांक ५ जून पर्यंत प्रमाणिकरण करुन घ्यावे. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

दिव्यांग व्यक्तींनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा

यवतमाळ, दि. २ जून (जिमाका):- महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या कर्ज योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये कर्ज मागणी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. व्यवसायासाठी २०० दिव्यांग व्यक्तींना कर्ज वितरित करण्यात येणार आहे. महामंडळाच्या दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजनेअंतर्गत १०० तसेच वैयक्तिक थेट कर्ज योजनेमध्ये १०० असे एकुण २०० अर्ज कार्यालयास उपलब्ध आहे. पात्र इच्छुक व्यक्तींनी कर्ज मागणी संदर्भात महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, यवतमाळ येथे संपर्क साधावा,असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एम. ए. अवघाते यांनी केले आहे

सोयाबीनच्या नवीन वाणाचे बियाणे रास्त दरात उपलब्ध होईल -महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांची ग्वाही

खरीप हंगाम २०२३ महाबीज विक्रेत्यांचे संमेलन संपन्न यवतमाळ,दि.२ जून.(जिमाका):- सोयाबीनचे नवीन वाण फुले संगम, फुले किमया, एमएयूएस-६१२, एमएयूएस-१६२, येलो गोल्ड इत्यादी वाणाचे उच्चतम गुणवत्तेचे प्रमाणित बियाणे रास्त दरात उपलब्ध होईल अशी ग्वाही महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांनी दिली. कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून महाबीज विक्रेते व व्यवस्थापन यांच्या मध्ये प्रत्यक्ष संवाद न झाल्यामुळे प्रत्यक्ष चर्चा व विक्रेत्यांचे समस्यांचे निवारण करण्याकरिता जिल्ह्यामध्ये संमेलनाचे आयोजन हॉटेल व्हेनेशियन सेलेब्रेशन यवतमाळ येथे करण्यात आले होते. यात व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांनी विक्रेत्याशी प्रत्यक्ष चर्चा करून तसेच हिरवळीचे खत पिकाचे विक्री करून जमिनीचे आरोग्य सुधारण्याकरिता शेतकऱ्याना मार्गदर्शन करण्यास सांगितले. उत्पादकता वाढवण्याकरीता सर्व शेतकऱ्यांना महाबीज चे जैविक खताचे बिज प्रक्रिया करावी असेही त्यांनी सांगितले. महाव्यवस्थापक विपणन प्रकाश टाटर यांनी येणाऱ्या खरीप हंगामामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन व तूर पिकाचे दहा पेक्षा जास्त

लोकशाही दिन ५ जूनला

यवतमाळ, दि. १ जून (जिमाका):- जिल्हा स्तरीय लोकशाही दिन सोमवार ५ जून २०२३ रोजी बळीराजा चेतना भवन, (बचत भवन) जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांना प्रत्यक्ष लोकशाही दिनात उपस्थित राहणे शक्य होत नसल्यास त्यांनी लोकशाही दिनाच्या दिवशी म्हणजेच ५ जूनला सकाळी १० वाजेपर्यंत आपला तक्रार अर्ज rdc_yavatmal@rediffmail.com या ई मेल वर सादर करावा. सदर ई मेलवर पाठविलेला तक्रार अर्ज सुध्दा लोकशाही दिनात समाविष्ट करुन घेण्यात येईल, परंतु ५ जून २०२३ ला सकाळी १० नंतर ई मेलवर प्राप्त झालेला तक्रार अर्ज लोकशाही दिनात ग्राहय धरल्या जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी कळविले आहे.

मान्सून पूर्व कामे एक आठवड्यात पूर्ण करण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना पाचही जिल्ह्यांचा घेतला आढावा

यवतमाळ, दि १ जुन :- नाले साफसफाई, इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिटचे काम एका आठवड्यात पूर्ण करण्यासोबतच, 24 तास नियंत्रण कक्षाची स्थापना, पुरबाधित गावात अन्न, पाणी व पुरेसा औषध साठा याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी दिल्यात विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी विभागातील पाचही जिल्ह्यांचा मान्सूनपूर्व तयारीचा आढावा दूरदृष्य प्रणालीद्वारे घेतला. यात त्यांनी सदर सूचना केल्यात. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी माहिती देतांना सांगितले, जिल्ह्यातील 15 गावांचा चार ते पाच दिवसांसाठी संपर्क तुटतो. त्यामुळे यावर्षी यादृष्टीने जास्त तयारी करण्यात येत आहे. जिल्ह्यात 169 गावे पूरबाधित होतात. त्यापैकी 116 गावे संवेदनशील आहे, तर 53 गावे अतिसंवेदनशील आहेत. त्यामुळे पूर येणाऱ्या गावात औषध,अन्न व पाणी यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. अशा गावांमध्ये पाणीपुरवठा आणि जलजीवन मिशनची कामे मान्सुन सुरु होण्यापुर्वी करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शहरी भागात इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट एक आठवड्यात पूर्ण होईल. त्याचबरोबर नियंत्रण कक्ष सु

शेतीला जोड दुग्धव्यवसायाची गाई व म्हशीच्या अनुदान किंमतीत यावर्षी वाढ

यवतमाळ , दि १ जुन,जिमाका :- निसर्गाच्या लहरीपणामुळे प्रत्येकवर्षी चांगले पिक होईलच याची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीसोबतच इतर उत्पन्नाचे साधन म्हणून जोड व्यवसाय करणे आवश्यक झाले आहे. दुग्धव्यवसाय, शेळी पालन व कुक्कुटपालन हे शेतीशी निगडीत चांगले व्यवसाय असुन शासानाच्या यासाठी अनेक योजनाही आहेत. २ देशी, संकरीत गाई व म्हशीचा गट वाटप या योजनेंतर्गत २ देशी किंवा संकरीत गाई, म्हशींचे वाटप करण्यात येते. यात खरेदी करावयाच्या जनावरांची किंमत यावर्षी वाढवण्यात आली असुन प्रती गाय 40 हजार रुपयांच्या एवजी 70 हजार व म्हैस 50 हजार रुपयांऐवजी 80 हजार इतकी करण्यात आली आहे. यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50 टक्के तर अनुसूचित जाती व जमातीसाठी 75 टक्के अनुदान देण्यात येते. तसेच जनावराच्या किमतीस अनुसरून कमाल 10.20 टक्के दराने तीन वर्षाचा विमा असा 8425 रुपये विमा देण्यात येतो. एकूण खरेदी किंमत सर्वसाधारण प्रवर्ग गाय गटासाठी 78 हजार 425, म्हैस गटासाठी 89 हजार 629 रुपये, तर अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी गाय गटासाठी 1 लाख 17 हजार 638 रुपये तर म्हैस गटासाठी 1 लाख 34 हजार

स्त्री शक्ती समाधान शिबिर महिलांचे प्रश्न सोडविण्याचे व्यासपीठ पालकमंत्री संजय राठोड ३८ तक्रारीचे जागेवरच निराकरण

यवतमाळ, दि १ जून, जिमाका:- महिलांच्या समस्या आणि तक्रारी सोडविण्यासाठी तसेच विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी उपलब्ध करुन दिलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे हे व्यासपीठ अतिशय महत्वाचे असुन सर्व स्तरातील महिलांनी याचा लाभ घेऊन विविध क्षेत्रात उन्नती साधावी असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. नेर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर समाधान शिबिराचे उद्घाटन संजयभाऊ राठोड यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांना मागदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार डॉ.शिवाजी मगर , नायब तहसीलदार श्री. थोटे, गटविकास अधिकारी राजीव शिंदे , मुख्याधिकारी नगरपरिषद श्री. जाधव, गटशिक्षण अधिकारी देशपांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मानिक घोडसरे,बाल विकास प्रकल्प अधिकारीराजेश घोडे, उपस्थित होते. अहिल्यादेवी होळकर ह्या छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच कर्तव्य कठोर राज्यकर्त्या होत्या. त्यांच

प्रोत्साहनपर लाभ योजनेतील शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करावे

यवतमाळ, दि. ३१ मे (जिमाका):- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेची अंमलबजावणी सुरु असुन या योजनेंतर्गत ७४,९६१ लाभार्थ्यांच्या विशिष्ठ क्रमांकाची यादी पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आली आहे. या यादीमधील ४,११३ लाभार्थ्यांनी अजुनही आधार प्रमाणिकरण केलेले नाही. यादीमधील ज्या लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत आधार प्रमाणिकरण केलेले नाही त्यांना प्रोत्साहनपर रक्कमेचा लाभ मिळू शकणार नाही. योजनेचे पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या विशिष्ठ क्रमांकांचे यादीत नाव असलेल्या व अजुनही आधार प्रमाणिकरण न केलेल्या सर्व लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी जवळचे सेतू सुविधा केंद्रावर जाऊन त्वरीत आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

वर्षभर उत्पन्न देणारी रेशीम शेती मनरेगातून व पोकरामधुन अनुदान

यवतमाळ, दि३१मे:- शेतीतुन वर्षभर उत्पादन घ्यायचे तर रेशीम शेती कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती आहे. या शेतीतून वर्षभरात सहा ते सात वेळा रेशीम कोषाचे उत्पन्न मिळते. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीसोबतच रेशीम शेतीकडे वळून शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करता येतो. रेशीम विकास विभागाच्यावतीने वेगवेगळ्या योजना यासाठी राबविण्यात येत आहे. मनरेगातून राबविण्यात येत असलेल्या योजनेतून शेतकऱ्यांना 2 लाख 36 हजारापर्यंत अनुदान दिले जाते तर पोकरा योजनेतून ९० टक्के अनुदान देण्यात येते. कृषीवर आधारीत रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला रेशीम हा शेतीपुरक उद्योग आहे. विविध योजनेंतर्गत तुती लागवड करण्यासाठी नवीन शेतकरी लाभार्थीची निवड केली जाते. तुती लागवडीसाठी कलमांचा पुरवठा केले जातो व तांत्रिक मार्गदर्शन देऊन तुती लागवड केली जाते. नवीन लाभार्थ्यांना रेशीम शेती उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात येते. नवीन तुती लागवड केलेल्या शेतकऱ्यांचा राज्याबाहेर अथवा राज्यांतर्गत अभ्यास दौरा आयोजित केला जातो. नवीन निवड केलेल्या लाभार्थ्यांना तुती लागवड करण्यासाठी जुन्या लाभार्थ्यांकड