कौशल्य विकास विभागातर्फे १७० जागांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा

यवतमाळ दि. 8 जून ,(जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचेमार्फत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा ८ जून ते १४ जून दरम्यान होणार आहे. स्थानिक पातळीवर तसेच बाहेरील ठिकाणी औद्योगिक संस्थांना मनुष्यबळाची मागणी या कार्यालयाकडे नोंदविण्यातआलेली आहे. सदर मागणीच्या अनुसरुन जिल्ह्यातील तसेच इतर ठिकाणच्या कंपनीशी संपर्क साधून धुत ट्रान्समिशनऔंरगाबाद व टॅलेन सेतू प्रा.लि. पूणे या कंपनी मार्फत एकूण १७० रिक्त पदांकरिता ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजनकरण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना rojgar.mahaswayam.gov.inया वेब पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी होता येणार आहे. सदर मेळाव्यामध्ये किमान १२ वी.उत्तीर्ण झालेले इंजिनियरींग पदवी, पदविका, नर्सिंग पदवी, पदविका धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवारांना त्यांच्याकडील सेवायोजना कार्डचा (एम्प्लॉयमेंट कार्ड) युजरनेम व पासवर्ड लॉगिन करून सदर मेळाव्यामध्ये सहभागी होता येईल. सदर ऑनलाईन मेळाव्या करिता उमेदवारांकडे सेवायोजन कार्ड (एम्प्लॉयमेंट कार्ड)चा युझरनेम व पासवर्ड असणे आवश्यकआहे.नसल्यास rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने कार्डची नोंदणी करता येईल. तसेच जॉब सिकर या टॅबमध्ये लॉगिन करून डाव्या बाजूला पं.दिनदयाल उपाध्याय जॉब फेयर यावर क्लिक करून यवतमाळ जिल्हा निवडून ८ जुन ते १४ जून,२०२३ पर्यंत रोजगार मेळाव्यामध्ये नोंदणीकृत केलेल्या रिक्त पदाच्या पसंतीक्रमानुसार सहभागी होता येणार आहे. सदर मेळाव्यास उद्योजकांकडूनऑनलाइन पद्धतीने मुलाखती,उमेदवाराशी प्रत्यक्ष संपर्क साधून रिक्त पदांकरिता निवड करण्यात येणार आहे. तरी यवतमाळ जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. तसेच मेळाव्याच्या अधिक माहितीकरिता ०७२३२-२४४३९५ या कार्यालयीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाकौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी