डॉ.भालचंद्र स्मृती दृष्टीदिन १० जूनला

यवतमाळ,दि.८ जून,(जिमाका):- डॉ.भालचंद्र हे प्रख्यात नेत्रशल्य चिकित्सक होते.त्यांच्या जीवन कालावधीत कुठलीही आधुनिक सोयीसुविधा नसतांना अंधत्व निर्मुलन कार्य करून त्यांनी हजारो यशस्वी मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या. त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता कार्यक्रमांतर्गत १० जून ते १६ जून हा सप्ताह जिल्ह्यात विविध ठिकाणी नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करून डोळ्यांच्या आजाराबाबत व नेत्रदान बाबत जनजागृती केली जाणार आहे. नेत्रदान श्रेष्ठदान,नेत्रदान हे अंध व्यक्तीच्या जीवनात प्रकाश आणतो.नेत्रदान करून अंधाना जीवन जगण्यासाठी नेत्र उपगोगी ठरतात. त्यामुळे प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प करणे गरजेचे आहे.१ वर्षावरील कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते.एखाद्या व्यक्तीला चष्मा लागला असेल,डोळ्यांचे ऑपरेशन झाले असेल,मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेली असेल,तसेच उच्च रक्तदाब व मधुमेह असणारे व्यक्ती सुध्दा नेत्रदान करू शकतात.अशी माहिती नेत्र शल्यचिकित्सक डॉ.मनोज तगडपल्लेवार यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद