लोकशाही दिन ५ जूनला

यवतमाळ, दि. १ जून (जिमाका):- जिल्हा स्तरीय लोकशाही दिन सोमवार ५ जून २०२३ रोजी बळीराजा चेतना भवन, (बचत भवन) जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांना प्रत्यक्ष लोकशाही दिनात उपस्थित राहणे शक्य होत नसल्यास त्यांनी लोकशाही दिनाच्या दिवशी म्हणजेच ५ जूनला सकाळी १० वाजेपर्यंत आपला तक्रार अर्ज rdc_yavatmal@rediffmail.com या ई मेल वर सादर करावा. सदर ई मेलवर पाठविलेला तक्रार अर्ज सुध्दा लोकशाही दिनात समाविष्ट करुन घेण्यात येईल, परंतु ५ जून २०२३ ला सकाळी १० नंतर ई मेलवर प्राप्त झालेला तक्रार अर्ज लोकशाही दिनात ग्राहय धरल्या जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस