आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिनी राबवले जनजागृती अभियान सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन

यवतमाळ,दि.१३ जून, (जिमाका) :- 12 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिन म्हणून संपूर्ण जगात पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,चाईल्ड लाईन,तसेच जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात जनजागृती सप्ताहाचे अयोजन करण्यात आले होते.या दिवशी शहराच्या मुख्य बाजारपेठेत ७३ आस्थ्यापनांना भेटी देण्यात आल्या व आस्थापनेच्या दर्शनी भागात “आमच्या येथे बाल कामगार काम करीत नाही” असे स्टिकर्स लावण्यात आले. यावेळी सरकारी कामगार अधिकारी रा.रा.काळे,सचिव जिल्हा विधी सेवा श्री नहार,जिल्हा चाईल्ड लाईनचे श्री.दाभाडकर निरीक्षक वि.पा.गुल्हाने यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले. १४ वर्षाखालील बालकास कामावर ठेवण्यांस बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन),अधिनियम,१९८६ या कायद्यान्वये प्रतिबंध करण्यात आलेला आहे. १४ ते १८ वर्ष वयोगटातील किशोरवयीन बालक यांना धोकादायक उद्योगांमध्ये काम करण्यास प्रतिबंध आहे. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठकांचे आयोजन करून त्यामध्ये जिल्ह्यातील दुकाने, हॉटेल्स, व्यापारी संस्था व इतर आस्थापनांच्या व्यापारी बंधूंना बालकामगार या अनिष्ट प्रथे विरुद्ध यापुढेही जागृत करण्यात येईल. तसेच त्यांना बालमजुरी निर्मूलनाचे महत्त्व समजून सांगण्यात येऊन जनजागृती करण्यात येईल. आमच्याकडे बालकामगार काम करीत नाही यापुढेही बालकामगार ठेवणार नाही असे हमीपत्र व्यापारी वर्गाकडून भरून घेण्यात आले.लहान वयात काम केल्यामुळे बालकांच्या त्वचा,श्वसन मार्ग संस्था,मेंदू,जठर संस्था यावर विपरीत परिणाम होतो.त्यांची मानसिक शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटते.चांगले जीवन जगण्याचा त्यांना अधिकार आहे तो आपण सर्वांच्या प्रयत्नाने व मदतीने त्यांना मिळाला पाहिजे.त्या निमित्याने बालमजुरी मुक्त महाराष्ट्र या मोहिमे मध्ये सुद्धा जागरूक नागरिक म्हणून सर्वांनी सहभागी व्हावे,असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी रा.रा.काळे यवतमाळ यांच्या द्वारे करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी