जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी संजीवनी मोहिमेचा लाभ घ्यावा

यवतमाळ,दि.२० (जिमाका),स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात कृषी संजीवनी मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत विविध उपक्रमाने विविध दिन साजरे करण्यात करण्यात येणार असून 25 जून ते 1 जुलै 2023 दरम्यान, जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या मोहिमे अंतर्गत गाव बैठका,शिवार भेटी व शेती शाळांचे आयोजन करण्यात येणार असून शेतकऱ्यांसोबत गावात कृषी विषयक राबविल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना भेटी देण्यात येणार आहेत. तसेच दिवस निहाय उपक्रम राबविण्यात येणार असून दि.25 जूनला कृषी पीक तंत्रज्ञान प्रसार दिन, 26 जूनला पौष्टिक आहार प्रसार दिन, 27जूनला कृषी महिला शेतकरी सन्मान दिन, 28 जूनला जमीन सुपीकता जागृती दिन, 29 जूनला कृषी क्षेत्राची भावी दिशा दिन, 30 जूनला कृषी प्रक्रिया तंत्रज्ञान प्रचार दिन तसेच १जुलैला कृषी दिन साजरा केला जाणार आहे. हा कालावधी खरीप पिकाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने या मोहिमेद्वारे कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नवीन तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करून शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा,यासाठी प्रयत्न करणार आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन या मोहिमेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लवाडे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी