राजश्री शाहु महाराज यांच्या विचारांचा आदर्श घेऊन व्यक्तिमत्व घडवावे जिल्हाधिकारी अमोल येडगे गुणवत्ता पुरस्काराचे वितरण सामाजिक न्याय दिन साजरा

यवतमाळ,दि.२६ जून (जिमाका)राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचे अधिष्ठान लाभलेले महाराष्ट्र राज्य आपल्या भारत देशातील एक पुरोगामी राज्य आहे.याच महाराष्ट्राच्या भूमीतील कर्ते समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती संपूर्ण भारतभर सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी होत आहे. त्यांनी विकसित राज्य निर्माण केले. त्यांचा आदर्श व त्यांच्या विचारांची प्रेरणा घेवून विद्यार्थांनी व्यक्तीमत्वाचा विकास साधावा व यश प्राप्त करावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,साहयक आयुक्त समाज कल्याण कार्यालय,समाजिक न्याय भवन येथे समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती.“सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी,डॉ.श्रीकृष्ण पाचांळ, समाज कल्याणचे सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी पियुष चव्हाण, संशोधन अधिकारी, जिल्हा जात पडताळणी मंगला मून उपस्थित होत्या. यावेळी सर्वप्रधम राजश्री शाहु महाराज गुणवता पुरस्कारचे निवासी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शिल्ड देऊन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.तसेच विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यीं/विद्यार्थ्यींनी यांना प्रमाणपत्र,शिल्ड,धनादेश व विविध जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,शाहू महाराजांनी ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी शाहू राजांनी प्रयत्न केले. सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली. सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी सामाजिक समता, शिक्षण आणि कल्याण यांना चालना देण्यासाठी प्रगतीशील धोरणे आणि सुधारणा राबवल्या. दरम्यान सकाळी ७ वाजता "रन फॉर सोशल जस्टिस" दौड घेण्यात आली.सदर दौड पोलीस स्टेशन, बस स्टॅंड चौक-अमरावती रोड या मार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे विर्सजित झाली.. तसेच यावेळी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन निमित्त उपस्थितीतांना शपथ देण्यात आली.यावेळी प्रास्ताविक समाज कल्याणचे सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले तर संचालन व आभार प्रा.डॉ.कमल राठोड यांनी मानले. यावेळी अधिक्षक श्री.नंदूरकर,तसेच शिक्षक,शिक्षेतर कर्मचारी,विद्यार्थीं व पालक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी