जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा

यवतमाळ,दि.9 जून (जिमाका):-महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र तसेच जिल्हा उद्योग केंद्र व्दारा सर्व साधारण प्रवर्गातील युवती,महिला व पुरूषांकरिता फॅशन डिझाईनिंग व संगणक डीटीपी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून या प्रशिक्षण कार्यक्रमात तांत्रिक प्रशिक्षणासह विविध शासकीय योजनांची माहिती व उद्योगाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणासाठी उमेदवाराची निवड मुलाखातीव्दारे करण्यात येणार असून प्रशिक्षणार्थीचे वय १८ ते ४५ असावे,शिक्षण किमान सातवा वर्ग पास असणे आवश्यक आहे.सदर प्रशिक्षण नोंदणीकरिता १४ जून २०२३ पर्यंत नोंदणी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,दारव्हा रोड यवतमाळ येथे करावी. तसेच अधिक माहितीसाठी कार्यक्रम आयोजक अश्विनी बुटे यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,यवतमाळ यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस