शेतीला जोड दुग्धव्यवसायाची गाई व म्हशीच्या अनुदान किंमतीत यावर्षी वाढ

यवतमाळ , दि १ जुन,जिमाका :- निसर्गाच्या लहरीपणामुळे प्रत्येकवर्षी चांगले पिक होईलच याची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीसोबतच इतर उत्पन्नाचे साधन म्हणून जोड व्यवसाय करणे आवश्यक झाले आहे. दुग्धव्यवसाय, शेळी पालन व कुक्कुटपालन हे शेतीशी निगडीत चांगले व्यवसाय असुन शासानाच्या यासाठी अनेक योजनाही आहेत. २ देशी, संकरीत गाई व म्हशीचा गट वाटप या योजनेंतर्गत २ देशी किंवा संकरीत गाई, म्हशींचे वाटप करण्यात येते. यात खरेदी करावयाच्या जनावरांची किंमत यावर्षी वाढवण्यात आली असुन प्रती गाय 40 हजार रुपयांच्या एवजी 70 हजार व म्हैस 50 हजार रुपयांऐवजी 80 हजार इतकी करण्यात आली आहे. यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50 टक्के तर अनुसूचित जाती व जमातीसाठी 75 टक्के अनुदान देण्यात येते. तसेच जनावराच्या किमतीस अनुसरून कमाल 10.20 टक्के दराने तीन वर्षाचा विमा असा 8425 रुपये विमा देण्यात येतो. एकूण खरेदी किंमत सर्वसाधारण प्रवर्ग गाय गटासाठी 78 हजार 425, म्हैस गटासाठी 89 हजार 629 रुपये, तर अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी गाय गटासाठी 1 लाख 17 हजार 638 रुपये तर म्हैस गटासाठी 1 लाख 34 हजार 443 रुपये देण्यात येतात. याशिवाय जनावरांसाठी गोठा तयार करणे, चारा लागवड, स्वयंचलीत चारा कटाई यंत्र खरेदी करणे, खाद्य साठविण्यासाठी शेड व जनावरांचा विमा काढणे अशा विविध बाबीसाठी सुद्धा अनुदान देण्यात येते. 10 शेळी व 1 बोकड गट वाटप 10 शेळी व 1 बोकड गटासाठी अनुसूचित जाती व जमाती साठी 75 टक्के अनुदान कमाल मर्यादा 58 हजार 673 तर 25 टक्के लाभार्थी हिस्सा 19 हजार 558 भरायचा आहे. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदान 51 हजार 773 रुपये देण्यात येतात. तर 50 टक्के हिस्सा लाभार्थ्याला भरावा लागतो. शेळ्याचे व्यवस्थापन, चारा, खाद्य यावरील खर्च लाभार्थ्याला करावा लागतो. कुक्कुट पालन व्यवसाय योजना मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे व एकात्मिक कृषि विकास योजनेंतर्गत कुक्कुट पालन व्यवसाय करता येतो. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 1000 मासल कुक्कुट पक्षी पालन या योजनेकरिता गट वाटप करताना 50 टक्के अनुदान म्हणजेच १ लक्ष 12 हजार 500 रुपये तर अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदान म्हणजेच 1 लक्ष 68 हजार 750 रुपये देण्यात येतात. अर्ज कोठे करावा?:- शेतकरी, पशुपालक व शेतमजुरांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी उपायुक्त पशुसंवर्धन आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याशी संपर्क साधावा. तसेच या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज जुलै महिन्यात संकेतस्थळावर खुले होतात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://ahmahabms या संकेतस्थळाला भेट द्यावी. आवश्यक कागदपत्रे: .रहिवाशी दाखला, अनुसुचीत जाती ,जमातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, दारिद्र रेषेखालील असल्यास त्याचा दाखला, रेशन कार्ड, आपत्याचा दाखला, तसेच दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र व पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आवश्यक आहे. शेतीचा सात बारा व 8 अ उतारा आवश्यक आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी