ग्रामपंचायत स्तरावरील तक्रारी प्राधान्याने निकाली काढा -जिल्हाधिकारी अमोल येडगे लोकशाही दिनात २०६ तक्रारी

यवतमाळ,दि.५जून (जिमाका):-लोकशाही दिनात ग्रामसेवकांच्या स्तरावरील प्रकरणे व अतिक्रमण याबाबत खूप तक्रारी येत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत बैठक लावून पुढील लोकशाही दिनाच्या पूर्वी ग्रामपंचायत स्तरावरील तक्रारी प्राधान्याने निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात. बळीराजा चेतना भवन येथे आज जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर लोकशाही दिनात निवासी उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, तसेच इतर सर्व विभाग प्रमुख बैठकीस हजर होते. आज लोकशाही दिनात एकुण -२०६ तक्रारी प्राप्त झाल्यात (स्वीकृत २ व अस्वीकृत-२०४). लोकशाही दिनातील सर्व प्रकरणाचा जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला.तसेच शासन आपल्या दारी या योजनेचा कालावधी शासनस्तरावरून ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आला असून मुख्यमंत्री कार्यालयाकडून तसा आराखडा प्राप्त झाला आहे. त्या फॉरमॅटनुसार तीन दिवसाचे कॅम्प मोठ्या गावांमध्ये घेण्याच्या सूचना सर्व तालुक्यांना दिलेल्या आहेत. तसेच संबंधित विभागांनी शिबीर घेवून शासन आपल्या दारी हा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम जिल्ह्यात यशस्वी करावा अश्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद