'शासन आपल्या दारी' शिबिरात दोन दिवसात ४० हजार प्रमाणपत्रांचे वितरण विविध विभागांच्या योजनांसाठी लाभार्थ्यांची नोंदणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उद्या ९ जूनला सुद्धा आयोजन नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

यवतमाळ दि 8 जून जिमाका :- जनतेला गावातच आवश्यक सेवा आणि योजनांची माहिती मिळून योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या 'शासन आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत यवतमाळ जिल्ह्यात ५ व ७ जुन या दोन दिवसात घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये एकूण ४० हजार ३७६ लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरित करण्यात आली आहे, तसेच योजनांचा लाभ देण्यात आला आहे. नागरिकांच्या आवश्यक प्रमाणपत्रे आणि दाखल्यांसाठी सरकारी कार्यालयाच्या फे-या थांबविण्यासाठी शासनाने गावातच एका छताखाली नागरिकांना सर्व योजना आणि महत्वाचे प्रमाणपत्र व दाखले देण्याचा निर्णय घेतला. यासाठी 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम १५ मे पासुन राबविण्यात येत असुन याला १५ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात ५ व ७ जुन रोजी ९० गावांमध्ये शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर, डोमिसाईल, दुय्यम शिधापत्रिका, शिधापत्रिका, आधार कार्ड, सातबारा व ८ अ, एस टी कार्ड, प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड, पी एम किसान नोंदणी, स्तनदा मातांना बालकांसाठी बेबी केयर किट, तसेच विविध विविध विभगांच्या लाभार्थी निवड झाल्याचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या अभियानात एका मंडळातील तीन गावांचा समावेश करण्यात आला होता. तालुकानिहाय वितरित दाखले तालुका गावे प्रमाणपत्र पुसद. ६. ६६४९ पांढरकवडा ६. २९६७ दिग्रस. ६. ५०८१ मारेगाव ६. २६७८ झरीजामणी ६. १७२७ कळंब. ६. २६९४ यवतमाळ ६. २०९३ उमरखेड. ६. १२७९ वणी ६. १४२१ महागाव. ६. १४६१ राळेगाव. ६. १२५५ नेर ६. १८६१ दारव्हा ६. ३०७६ आर्णी ६. २९५८ बाभुळगाव. ३. १६५० घाटंजी ३. १५१७ एकूण ९०. ४०,३६७ उद्या ९ जुनला सुद्धा शासन आपल्या दारी हे शिबीर सर्व तालुक्यांमधील ४८ गावांमध्ये आयोजित करण्यात आलेले असून नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी