खड्डेमुक्त योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी शासनाव्दारे पीसीआरएस ॲप नागरिक ॲपच्या माध्यमातून रस्त्यावरील खड्याची करु शकतात तक्रार टोल फ्री क्रमांक 91-22-26201604 वर करा तक्रार

यवतमाळ, दि १२, (जिमाका):- राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या खड्डेमुक्त योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाव्दारे पीसीआरएस ॲप सुरू करण्यात आले आहे. या अँपच्या माध्यमातुन सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यांवरील खड्यांची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागास कळवून त्या माहितीच्या सहाय्याने खड्डेमुक्त योजनेच्या माध्यमातून शहरासह जिल्ह्याला खड्डेमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने येणाऱ्या या योजनेसंदर्भात सामान्य माणसांमध्ये जनजागृती व्हावी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरिकांना, "पीसीआरएस" हा नवीन ॲप आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करून घ्यावा लागणार आहे. कोणत्याही नागरिकाची खड्यांविषयी तक्रार असल्यास त्यांना या ॲपच्या माध्यमातून त्याची थेट माहिती सार्वजनिक बांधकाम विभागास देता येणार आहे. त्यासाठी तक्रार करणाऱ्यांना आधी खड्यांचा फोटो काढावा लागणार आहे. त्यानंतर पीसीआरएस या ॲपमध्ये हा फोटो अपलोड करावा लागणार आहे. या ॲपमध्ये तक्रार केलेल्या फोटोवरून रस्त्यावर पडलेला तो खड्डा तक्रारीनंतर 72 तासाच्या आत भरण्यात येणार आहे. तशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. त्यासाठी कोणत्याही नागरिकांनी रस्त्यावर खड्डा दिसल्यास त्याचा त्वरीत फोटो काढुन अपलोड करून संबंधीत विभागाच्या निदर्शनास आनुन द्यावा. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे त्वरीत भरल्या जाणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी होईल किंवा होणार नाही. तसेच या ॲपमध्ये अपलोड झालेल्या खड्यांचा फोटोवरून खड्डे त्वरीत भरण्याच्या सूचना मुख्य अभियंता गिरीष जोशी,श्री. संभाजी धोत्रे, यांनी दिल्या आहेत. नागरिकांनी आपल्या मोबईल मध्ये सदर ॲप डाऊनलोड करुन घेण्याचे तसेच टोल फ्री क्रमांक + 91-22-26201604 वर संपर्क करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता विशेष प्रकलप (सा.बां.) विभाग, यवतमाळ विजय अडचुले यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी