इसदा तारकर्ली येथे जीव रक्षक प्रणालीचे प्रशिक्षण ईच्छुकांनी आजच ऑनलाईन अर्ज भरावा जिल्ह्यातील ५ युवकांना मिळणार संधी

यवतमाळ, दि १९ जुन, जिमाका:- महाराष्ट्रामध्ये जल पर्यटन विकासासाठी मोठी संधी आहे. जलपर्यटन उच्च दर्जाचे आणि सुरक्षित बनविण्यासाठी जलपर्यटन क्षेत्रात प्रशिक्षित कुशल मनुष्यबळाचा विकास करणे गरजेचे आहे. स्थानिक युवकांना प्रशिक्षित केल्यास त्यांना रोजगार निर्माण होईल. तसेच सुरक्षीत जल पर्यटन विकसित होण्यास वाव मिळेल. यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने जून ते सप्टेंबर २०२३ या काळात प्रत्येक जिल्ह्यातील ५ युवकांना जीव रक्षक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ईच्छुक युवक, युवतीनी २० जुन पर्यंत website:www.mtdc.चो या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा असे आवाहन जिल्हा प्रशसनाच्या वतीने करण्यात आले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने महाराष्ट्रामध्ये जल पर्यटन विकसित करण्याच्या दृष्टीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड ॲक्वाटिक स्पोर्टस (इसदा),तारकर्ली ता.मालवण जि.सिंधुदुर्ग येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जल पर्यटन प्रशिक्षण संस्था वर्ष २०१५ मध्ये निर्माण आणि विकसित केली आहे. इसदा जल पर्यटन प्रशिक्षण केंद्र भारतातील पहिले आणि आशिया पॅसिफिक क्षेत्रातील संस्थे पैकी एक मोठी संस्था आहे. इसदा या संस्थेने हजारो विद्यार्थी, पर्यटक, स्थानिक युवक, वन खात्याचे अधिकारी, भारतीय वायुदलाचे अधिकारी यांना स्नॅार्कलिंग, स्कुबा डायविंग,समुद्री संशोधन,लहान बोटी प्रचलन इत्यादीचे प्रशिक्षण दिले आहे. इसदामुळे सिंधुदुर्ग जिल्हा स्कुबा आणि जल पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आले. या उपक्रमामुळे सिंधदुर्गमध्ये हजारो स्थानिकांना शाश्वत रोजगार मिळाला आणि सागरी पर्यटनावर आधारित मोठी अर्थव्यवस्था नव्याने उभी राहिली आहे. महाराष्ट्रात समुद्र आणि गोड्या पाण्याच्या क्षेत्रात वर्षाला अनेक पर्यटक, स्थानिक बुडून मरण पावतात. हे टाळण्यासाठी जिल्ह्यात प्रशिक्षित जीवरक्षक असणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील स्थानिक युवकांना कालबद्ध कार्यक्रम अंतर्गत जलपर्यटन आणि जीवरक्षक प्रशिक्षण दिल्यास स्थानिक जिल्हा प्रशासनास तसेच मदत व पुनर्वसन विभागास आपत्कालीन परिस्थितीत मदत होईल. तसेच जलपर्यटन विकसित होण्यासाठी कुशल व सुरक्षित मनुष्यबळ निर्माण होईल. या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील निवडक युवकांना विविध टप्प्यांमध्ये जल पर्यटन आणि पाण्याशी संबंधित जीवरक्षक व बचाव व स्कूबा प्रशिक्षण दिल्यास महाराष्ट्र जलपर्यटन आणि पाण्याशी निगडित आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनास महत्त्वपूर्ण कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल. त्या अनुषंगाने पर्यटन विभागाच्या पुढाकाराने आपत्ती व पुनर्वसन विभागाने सदर प्रशिक्षणासाठी निधी मंजूर केलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व इसदाने जून ते ऑक्टोबर २०२३ या काळात प्रत्येक जिल्ह्यातील ५ युवकांना बोट चालविणे, स्कुबा डायव्हिंग, जीव सुरक्षा प्रणाली इत्यादीबाबत युवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. १ जुलै २०२३ ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत बोट चालविणे, २१ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत स्कुबा प्रशिक्षण, त्यातील एका स्कुबा चमूचे नेतृत्व करण्यासाठी डाइव्ह मास्टरचे प्रशिक्षण, १३ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर 2023 या कालावधीत जीव सुरक्षा इत्यादीचे मोफत प्रशिक्षण यवतमाळ जिल्ह्याकरिता आयोजित केले आहे. सदर प्रशिक्षण इसदा तारकर्ली ता.मालवण जि.सिंधुदुर्ग येथे देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणासाठी जिल्हासाठी निवड प्रक्रिया १जुलै २०२३ रोजी स्थळ-बेंबळा प्रकल्प ता.बाबभुळगाव येथे राबविण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणासाठी इच्छुक पात्र युवक/युवती हे,१८ ते २५ वयोगटातील असावेत. ,किमान शिक्षण १० वी.पास असावे,तर किमान वजन ५५ किलो असावे, प्रमाणित डॉक्टराचे स्वास्थ प्रमाणपत्र असावे,गेल्या सहा महिन्यात कोणतीही शस्त्रक्रिया झालेली नसावी,इच्छुक पात्र युवती गर्भवती नसावी, कमीत कमी ४०० मीटर पोहता येणे गरजेचे आहे. तसेच पाण्यात हाताचा वापर न करता किमान १० मिनिटासाठी तरगंता आले पाहीजे. पोहणे ३०, गुण,पाण्यात तरंगणे ३० गुण, शिक्षण १०, गुण, मुलाखत ३० गुण, एकुण १०० गुणाची सदर प्रशिक्षणासाठी निवड व निकष असणार आहे. सदर प्रशिक्षणस्थळी जाण्याचा/येण्याचा खर्च प्रशिक्षणार्थी यांनी करावयाचा असून. website:www.mtdc.co या वेबसाईटवरून ट्रेनिंगच्या सदराखाली दि.२० जून २०२३ पूर्वी https://forms.gle/AmMsdMVtek5ZpEvW9 लिंक वरून ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी