शेतीपिक उत्पादन वाढीसाठी मधुमक्षिका पालन योजना इच्छुक व्यक्ती व संस्थाकडून अर्ज आमंत्रित

यवतमाळ,दि.२० जून (जिमाका):- मधमाशा द्वारे शेतीपिके व फळ बागायतीच्या पिकाचे पर-परागीभवन होऊन पिकाच्या उत्पादनात पिकाच्या प्रकारानुसार पाच ते ८० टक्केपर्यंत वाढ होण्यास मदत होते. यामुळे मधमाशांचे संरक्षण, संवर्धन व मधमाशांमुळे होणारे फायदे याबाबत जनजागृती होण्यासोबतच शेतकऱ्यांना जोडधंदा आणि त्यांच्या शेती उत्पादनात वाढ होण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकरी व संस्थांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे. या योजनेची वैशिष्टे:- मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण,साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुतंवणूक,शासनाच्या हमी भावने मध खरेदी,विशेष/छंद प्रशिक्षणाची सुविधा,मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती करणे. योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता वैयक्तिक मधपाळ:- हा साक्षर असावा,तसेच स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य राहील. वय १८ पेक्षा जास्त असावे. केंद्रचालक प्रगतीशील मधपाळ:- हा किमान १० वी पास असावा, वय २१ पेक्षा जास्त असावे,अशा व्यक्तिच्या नावे किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेती, जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेले शेती जमीन, लाभार्थीकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्रचालक संस्था:- संस्था नोंदणीकृत असावी,संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतेलली किमान १ हजार चौ.फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकाना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावेत. अटी व शर्ती-लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरु करणे संबंधी मंडळास बंधपत्र लिहुन देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य असणार आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्याग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी ग्रमोद्योग मंडळ,उद्योग भवन,तिसरा मजला,दरव्हा रोड,यवतमाळ येथे भेट द्यावी,तसेच संपर्कासाठी या दूरध्वनी ०७२३२-२४४७९१,९४२०७७१५३५ क्रमांकावर संपर्क करावा,असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी