बालकामगार कृतीदलाच्या धाडीत एका बालकामगाराची मुक्तता

यवतमाळ,दि.२० जून (जिमाका):- जिल्हा कामगार कृतीदलाने १५ जूनला टाकलेल्या धाडीत मदिना टायर वर्क्स ,पिंपरी रोड,पांढरकवडा इथे १८ वर्षाखालील एक बालक काम करताना आढळून आले होते. कृतिदलाने बालकास मुक्त करून बालकल्याण समिती, यवतमाळ यांना सपूर्द केले. बालकामगार ही अनिष्ट प्रथा बंद व्हावी व जिल्हा बालकामगार मुक्त व्हावा याकरिता जिल्हाधिकारी अमोल येडगे, सरकारी कामगार अधिकारी रा.रा.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पांढरकवडा येथे १५ जून रोजी धाड टाकण्यात आली. मदिना टायर वर्क्सचे मालक मोहम्मद सज्जात अन्सारी यांच्याविरुद्ध मुलाची काळजी व संरक्षण कायदा २०१५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध व नियमन अंतर्गत कलम ३ मध्ये स्वतंत्र खटला दाखल करण्याची कारवाई सुद्धा यावेळी करण्यात आली. सदर धाडीमध्ये दुकाने निरीक्षक विजय गुल्हाने,रवींद्र जतकर,विनोद कुमार चोपकर,महात्मा ज्योतिबा फुले समाज कार्य महाविद्यालयाचे निरंजन मलकापुरे,जिल्हा समादेशक सतीश दिघळे,आकाश बुरेवार,महिला बाल विकास विभाग,जिल्हा बाल संरक्षण कक्ष प्रकाश नानाजी चहाणकर,चाईल्ड लाईनचे श्री.दाभाडकर,तसेच पोलीस कॉन्स्टेबल आकाश मसनकर यांचा सहभाग होता. जिल्ह्यामध्ये बालकामगार ठेवणाऱ्या आस्थापना धारकाविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून कोणत्याही आस्थापना मालकांनी बालकांना कामावर ठेवू नये,असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी रा.रा.काळे तसेच जिल्हा बालकामगार कृती दल समिती द्वारे करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी