डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना प्रस्ताव सादर करण्याची मुदत ३० जून

यवतमाळ,दि.९ जून,(जिमाका):-राज्यातील नोंदणीकृत मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना ११ ऑक्टोबर २०१३ च्या शासन निर्णयानुसार कार्यान्वीत करण्यात आली आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी मदरसा चालविणाऱ्या संस्था धर्मादाय आयुक्त अथवा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.या योजने अंतर्गत विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू हे विषय शिकविण्या करीता शिक्षकांना मानधन,पायाभूत सुविधा व ग्रंथालयासाठी अनुदान देण्यात येते.इच्छुक मदरसांनी परिपुर्ण प्रस्ताव ३० जून पूर्वी जिल्हा नियोजन समिती, यवतमाळ येथे सादर करावा. शासन निर्णयातील तरतुदीनुसार जास्तीत जास्त ३ डी.एड/बी.एड शिक्षकांना मानधन अनुज्ञेय आहे. ग्रंथालयासाठी तसेच शैक्षणिक साहित्यासाठी फक्त प्रथम वर्षी रु.५० हजार व तद्नंतर प्रति वर्षी रु.5 हजार अनुदान देय आहे.तसेच पायाभूत सुविधांसाठी जास्तीतजास्त रु. 2 लाख अनुदान देय आहे.पायाभूत सुविधांपैकी ज्या प्रयोजनांसाठी यापूर्वी अनुदान देण्यात आले आहे,त्या प्रयोजनासाठी पुन्हा अनुदान देण्यात येणार नाही. स्किम फॉर प्रोव्हायडींग क्वालीटी एज्युकेशन इन मदरसा या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत लाभ मिळलेल्या मदरसांना, सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही. इच्छुक मदरसांनी २०१३ च्या शासन निर्णयमध्ये नमुद केलेला विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासह ३० जून २०२३ पूर्वी जिल्हा नियोजन समिती,जिल्हाधिकारी कार्यालय,यवतमाळ येथे सादर करावा, मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव ग्राह्य तसेच स्विकारले जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी