Posts

Showing posts from November, 2020

जिल्हाधिका-यांनी घेतला नोडल अधिका-यांचा आढावा

Image
  अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक यवतमाळ, दि. 28 : येत्या 1 डिसेंबर रोजी विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात नोडल अधिका-यांची नेमणूक करण्यात आली असून निवडणूक प्रक्रियेसंदर्भात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सर्व नोडल अधिका-यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या  बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, तहसीलदार सुभाष जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तगडपिल्लेवार तसेच उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण 19 मतदान केंद्र आहे. या सर्व मतदान केंद्रांना दोन दिवसात भेटी देऊन तेथील सोयीसुविधांची पाहणी करावी. 30 नोव्हेंबरपर्यंत मतदान प्रक्रियेसाठी लागणारे सर्व साहित्य मतदान केंद्रावर पोहचवावे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ही निवडणूक होणार असल्यामुळे मतदान केंद्रावर थर्मल गन, पल्स ऑक्सीमीटर, पीपी

1 ते 16 डिसेंबर दरम्यान जिल्ह्यात कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण संयुक्त शोध मोहीम

  यवतमाळ, दि. 28 : कोरोना महामारीमुळे कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधण्याचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे राज्य शासनाने संयुक्तरित्या रुग्ण शोध मोहीम राबविण्याच्या सुचना दिल्या आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात 1 ते 16 डिसेंबर 2020 या कालावधीत आरोग्य विभागाच्या वतीने कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण संयुक्त शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. समाजातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णाचे लवकरात लवकर निदान करून त्यांना औषधोपचाराखाली आणणे व संसर्गाची साखळी खंडीत करून होणारा प्रसार रोखणे, तसेच समाजामध्ये कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यवतमाळ जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण 1480 क्षयरुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांना निश्चय पोषण योजनेंतर्गत दरमहा 500 रुपये प्रमाणे औषधोपचार कालावधीकरीता लाभ देण्यात येत आहे. तसेच 1 एप्रिल ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत जिल्ह्यात 158 कुष्ठरुग्णांचे निदान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्याकरीता ग्रामीण भागातील 22 लक्ष 69 हजार 859 व शहरी भागातील 2 लक्ष 1 हजार 67 लोकसंख्येचे सर्व्हेक्षण आशा स्वयंसेविका व

जिल्ह्यात 52 नव्याने पॉझेटिव्ह ; 28 जण बरे

  Ø एकाचा मृत्यु यवतमाळ, दि. 27 : गत 24 तासात जिल्ह्यात 52 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला. मृतकामध्ये घाटंजी शहरातील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 28 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 711 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 52 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 659 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 469 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 11382 झाली आहे. 24 तासात 28 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 10543 आहे. तर जिल्ह्यात एकूण 370 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 110149 नमुने पाठविले असून यापैकी 109333 प्राप्त तर 816 अप्राप्त आहेत. तसेच 97951 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. ००००००

जिल्ह्यात 95 नव्याने पॉझेटिव्ह ; 73 जण बरे

  Ø एकाचा मृत्यु यवतमाळ, दि. 26 : गत 24 तासात जिल्ह्यात 95 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला. मृतकामध्ये दारव्हा तालुक्यातील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 73 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 1612 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 95 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 1517 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 446 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 11330 झाली आहे. 24 तासात 73 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 10515 आहे. तर जिल्ह्यात एकूण 369 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 109461 नमुने पाठविले असून यापैकी 108625 प्राप्त तर 836 अप्राप्त आहेत. तसेच 97295 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. ०००

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना सीएसआर फंडमधून लाभ द्या

Image
  Ø जिल्हाधिका-यांचे विविध कंपन्या व बँकर्सना आवाहन यवतमाळ, दि. 25 : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी जिल्ह्यात  ‘मिशन उभारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शासनाच्या मदतीसोबतच विविध योजनेंतर्गत अशा कुटुंबांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र जे कुटुंब शासकीय योजनांच्या निकषात बसत नाही किंवा शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये अपात्र ठरतात, अशाही कुटुंबांना उभे करणे आवश्यक आहे. या कुटुंबांना सीएसआर फंडमधून लाभ देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले. ‘मिशन उभारी’ अंतर्गत सीएसआर फंडबाबत आयोजित विविध कंपन्यांचे प्रतिनिधी व बँकर्सच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा खनीकर्म अधिकारी राजेंद्र गोसावी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजभिये, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बी.आर. रामटेके आदी उपस्थित होते.   आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांपैकी लाभ दिला जातो, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला तालुकास्तरीय यंत
  जिल्ह्यात 120 जण नव्याने पॉझेटिव्ह Ø एकाचा मृत्यु ; 40 बरे यवतमाळ, दि. 25 : गत 24 तासात जिल्ह्यात 120 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला. मृतकामध्ये घाटंजी तालुक्यातील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 40 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 1905 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 120 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 1785 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 425 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 11235 झाली आहे. 24 तासात 40 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 10442 आहे. तर जिल्ह्यात एकूण 368 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 108306 नमुने पाठविले असून यापैकी 106998 प्राप्त तर 1308 अप्राप्त आहेत. तसेच 95763 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल

जिल्ह्यात दोघांचा मृत्यु तर 22 नव्याने पॉझेटिव्ह

  Ø 20 जण कोरोनामुक्त यवतमाळ, दि. 23 : गत 24 तासात जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 22 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 20 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मृतकांमध्ये यवमताळ शहरातील 70 वर्षीय आणि राळेगाव शहरातील 75 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 1359 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 22 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 1337 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 326 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 11062 झाली आहे. 24 तासात 20 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 10370 आहे. तर जिल्ह्यात एकूण 366 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 104932 नमुने पाठविले असून यापैकी 102956 प्राप्त तर 1976 अप्राप्त आहेत. तसेच 91894 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे ज

शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रक्रीयेबाबत प्रशिक्षण

Image
  यवतमाळ, दि. 23 : विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रक्रियेबाबत मतदान केंद्रावर उपस्थित राहणारा स्टाफ, मायक्रो ऑब्जर्व्हर, संबंधित झोनल अधिकारी यांचे मास्ट्रर ट्रेनरद्वारे प्रशिक्षण घेण्यात आले. नियोजन सभागृहात झालेल्या या प्रशिक्षणाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी एम. देवेंद्रर सिंह, अमरावती येथील महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे, पुरवठा उपायुक्त श्री. लहाने, सहाय्यक आयुक्त (भुसूधार) श्याम मस्के, पांढरकवडा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जान्सन, जिल्ह्याचे अतिरिक्त्‍ जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, तिवसा येथील उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ. स्नेहन कनिचे तसेच संबंधित उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, निवडणुकीत दिव्यांग मतदारांची विशेष काळजी घ्यावी. त्यांच्यासाठी रॅम्प तसेच निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्या सर्व सुविधा मतदार केंद्रावर असणे गरजेचे आहे. ही निवडणूक कोरोनाच्या पार्श्वभुमीवर होत असल्याने प्रत्येक मतदान केंद्र संपूर्णपणे सॅनिटाईझ असणे आवश्यक आहे. तसेच मतदान केंद्रावर कार्य

शेतकरी आत्महत्या कुटुंबांना विविध योजनेंतर्गत लाभ देण्याचे निर्देश

Image
  Ø जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा यवतमाळ, दि. 23 : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे, याउद्देशाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या संकल्पनेतून ‘मिशन उभारी’ हा अभिनव प्रकल्प राबविण्यात येत आहे. याअंतर्गत दर आठवड्याला आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष भेटीला बोलावून सदर कुटुंबाची काय मागणी आहे, हे जाणून घेतले जाते. तसेच त्यांना कोणत्या योजनेतून लाभ दिला जाऊ शकतो, याची पडताळणी जिल्हास्तरीय समितीमध्ये करण्यात येते. याअंतर्गत जिल्हाधिका-यांनी   आढावा घेऊन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला विविध योजनेतून लाभ देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत सोमवारी नऊ प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. पात्र / अपात्र प्रकरणांमध्ये लाभ देण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीमध्ये निर्णय घेण्यात आला. यात संबंधित कुटुंबांचा समावेश संजय गांधी निराधार योजनेत करण्यासाठी संबंधित नायब तहसीलदार यांनी एका आठवड्याच्या आत कागदपत्रांची पुर्तता करावी. यासाठी स्वत

खाजगी कोव्हीड रुग्णालयात जास्त रक्कम आकारल्याबाबत जिल्हाधिका-यांनी घेतली सुनावणी

Image
  Ø संबंधितांना अतिरिक्त रक्कम परत करण्याचे निर्देश यवतमाळ, दि. 20 : जिल्ह्यात कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्रशासन, आयसीएमआर आणि राज्यशासनाच्या मार्गदर्शन सुचनेनुसार शहरात नामवंत खाजगी रुग्णालयाला डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पीटल सुरू करण्याबाबत मान्यता दिली. मात्र या खाजगी रुग्णालयात शासनाच्या मार्गदर्शक सुचनेच्या नमुद दरापेक्षा जास्त रक्कम आकारल्याच्या अनुषंगाने तक्रारदारांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी याप्रकरणी सुनावणी घेतली. तसेच याप्रकरणी सत्यता पडताळून संबंधित कुटुंबाला अतिरिक्त रक्कम परत करण्याचे निर्देश दिले. यवतमाळ शहरातील एक महिला सदर डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पीटल येथे 13 ऑक्टोबर 2020 रोजी उपचारार्थ दाखल झाली होती. चाचणी केली असता सदर महिलेचा अहवाल कोरोना पॉझेटिव्ह आला. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा 16 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मृत्यु झाला. उपचाराकरीता लागलेला खर्च म्हणून डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पीटलने 97250 इतकी आगावू रक्कम भरणा करून घेतल्याची तक्रार संबंधित कुटुंबियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पांदण रस्त्याबाबत बैठक

Image
  यवतमाळ, दि. 20 : पांदण रस्ते योजनेंतर्गत जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगीता राठोड, जिल्हा‍ नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर, पुसद येथील एकात्मिक आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे उपस्थित होते. बैठकीत पांदण रस्ते भाग – ब अंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात 1500 कामे घेण्याबाबत सुचना देण्यात आल्या. तसेच योजनेंतर्गत वापरावयाच्या निधीच्या स्त्रोताबाबत चर्चा करण्यात आली. संबंधीत रस्त्याकरीता निधीच्या स्त्रोताबाबतचा प्रस्ताव व जिल्हास्तरावर सादर केलेल्या कृती आराखड्यातील मंजूर रस्ते संबंधीत ग्राम पंचायतीचा ठराव जिल्हास्तरावर उपविभागीय अधिका-यांनी तात्काळ सादर करावा. तसेच लोकसहभाग अंतर्गत सुध्दा कामे घ्यावीत, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी केल्या. भाग –ब च्या रस्त्याच्या 1500 कामांना लागणाऱ्या निधीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यात ग्रामपंचायतीला जनसुविधांकरीता मिळणारे अनुदान, मोठ्या ग्रामपंचायतीला नागरी सुविधांसाठी विशेष अनु

जिल्ह्यातील 102 आयटीआय उमेदवारांची सुझुकी मोटर कंपनीत निवड

Image
                                                                     Ø आयटीआयच्या पुढाकाराने रोजगार मेळाव्याचे फलित यवतमाळ, दि. 20 : लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोक-यांवर संक्रात आली असतांनाच येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने (आयटीआय) मात्र ऐन दिवाळीत तरुणांच्या जीवनात प्रकाश उजळविला आहे. आयटीआयच्या माध्यमातून झालेल्या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील तब्बल 102 उत्तीर्ण उमेदवारांची नोकरीसाठी निवड झाली आहे. गुजरातच्या हसनपूर येथील सुझुकी मोटर प्रायव्हेट लिमिटेडच्या दोन बसेसने ही मुले कंपनीकडे रवाना झाली. निवड झालेल्या मुलांना निरोप देण्यासाठी आयटीआयतर्फे निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेमंड युको डेनिम प्रा. लि.चे वर्क्स डायरेक्टर नितीनकुमार श्रीवास्तव तर प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी महेशकुमार सिडाम, आयटीआयच्या प्राचार्या कविता बुटले आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही फार मोठी उपलब्धी व दिवाळी भे

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शाळा सुरू करण्यासंदर्भात योग्य दक्षता घ्या - जिल्हाधिकारी सिंह

Image
  Ø शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिका-यांची बैठक यवतमाळ, दि. 19 : जिल्ह्यातील 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी व सुरू झाल्यानंतर कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात ठेवून आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा याबाबींना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे या बाबींचा विचार करून शाळा सुरू करण्यासंदर्भात योग्य दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच खाजगी शाळेचे मुख्याध्यापक यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, शिक्षणाधिकारी श्री. चवणे आदी उपस्थित होते. शाळेमध्ये आरोग्याच्या दृष्टीने तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सीमीटर, हॅन्डवॉश, आत धुण्याचे पाणी आदींची सुविधा असणे आवश्यक आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, संपूर्ण श

जिल्ह्यात 74 जण नव्याने पॉझेटिव्ह ; 64 जण कोरोनामुक्त

  यवतमाळ, दि. 19 : गत 24 तासात जिल्ह्यात 74 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 64 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 569 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 74 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 495 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 268 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10921 झाली आहे. 24 तासात 64 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 10224 आहे. तर जिल्ह्यात एकूण 359 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 98734 नमुने पाठविले असून यापैकी 97971 प्राप्त तर 763 अप्राप्त आहेत. तसेच 87050 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. ००००००

जिल्ह्यात 59 जणांची कोरोनावर मात

  Ø दोघांचा मृत्यु ; 39 नव्याने पॉझेटिव्ह यवतमाळ, दि. 18 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 59 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 39 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकांमध्ये वणी तालुक्यातील 72 वर्षीय आणि उमरखेड तालुक्यातील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 493 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 39 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 454 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 301 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10847 झाली आहे. 24 तासात 59 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 10160 असून आतापर्यंत 359 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 97783 नमुने पाठविले असून यापैकी 97402 प्राप्त तर 381 अप्राप्त आहेत. तसेच 86555 नागरिकांचे नमुने आतापर्यंत

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी 'मिशन उभारी' चे बळ

Image
  Ø जिल्हाधिका-यांचा अभिनव उपक्रम   यवतमाळ, दि. 18 : ‘शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा’ अशी यवतमाळची ओळख कायमची पुसून टाकण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्या अभिनव संकल्पनेतून ‘मिशन उभारी’ हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नैराश्यग्रस्त शेतकरी कुटुंबांना बळ मिळण्यास मदत होईल. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात घट करणे किंबहुना एकही शेतकरी आत्महत्या न होऊ देणे, यासाठी प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा अभ्यास केला असता असे निदर्शनास आले आहे की, पूर्णत: शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबामध्ये आत्महत्यासारख्या घटना घडत आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकरी कुटुंबाकरीता ‘मिशन उभारी’ राबविण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. या कार्यक्रमांतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देऊन त्यांना पुन्हा आपल्या पायावर उभे करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. तसेच नैराश्यग्रस्त शेतकरी कुटुंबांना त्यांच्या आवश्यकतेनुसार योजनांचा लाभ मिळाला

नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक हरकती व सुचना 18 ते 26 नोव्हेंबरपर्यंत आमंत्रित

  यवतमाळ, दि. 17 : जिल्ह्यातील कळंब, राळेगाव, बाभुळगाव, महागाव, झरीजामणी आणि मारेगाव या सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता   सोडत पध्दतीने आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशामध्ये दिलेल्या सुचनेनुसार जिल्ह्यातील वरील सहाही नगरपंचायतीच्या यापुढे होणा-या सार्वत्रिक निवडणुकीकरीता शहराची विभागणी नवीन प्रभागात केली आहे. त्यानुसार उपरोक्त नगरपंचायतींचे क्षेत्र दर्शविणारा नकाशा व सीमा प्रदर्शित केलेल्या प्रारुप रचनेचा मसुदा तसेच सदस्य पदाचे आरक्षण संबंधित नगरपंचायत (कळंब, राळेगाव, बाभुळगाव, महागाव, झरीजामणी आणि मारेगाव) व संबंधित तहसील आणि जिल्हाधिकारी, यवतमाळ कार्यालयाच्या सुचना फलकावर तसेच yavatmal.nic.in या संकेतस्थळावर 18 नोव्हेंबर 2020 रोजी पर्यंत प्रसिध्द करण्यात येणार आहे. उपरोक्त नगर पंचायत क्षेत्रातील ज्या नागरिकांना या संबंधात काही हरकती व सुचना दाखल करावयाच्या असतील, त्यांनी नगर पालिका प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे 18 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात कारणासह सादर कराव्यात. त्यानंतर येण

जिल्ह्यात 52 नव्याने पॉझेटिव्ह ; 38 कोरानामुक्त

  यवतमाळ, दि. 17 : गत 24 तासात जिल्ह्यात 52 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 38 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 183 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 52 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 131 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 299 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10808 झाली आहे. 24 तासात 38 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 10101 असून आतापर्यंत 357 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 97285 नमुने पाठविले असून यापैकी 96986 प्राप्त तर 229 अप्राप्त आहेत. तसेच 86248 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. ००००००

जिल्ह्यात 58 जणांची कोरोनावर मात ; 26 नव्याने पॉझेटिव्ह

  यवतमाळ, दि. 12 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 58 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात 26 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 357 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 26 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 331 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 301 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10659 झाली आहे. आज 58 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 9805 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 354 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 96286 नमुने पाठविले असून यापैकी 96052 प्राप्त तर 234 अप्राप्त आहेत. तसेच 85393 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. ००००००००    

जिल्ह्यात 94 जणांची कोरोनावर मात ; 44 नव्याने पॉझेटिव्ह

  यवतमाळ, दि. 11 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 94 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात 44 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 487 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 44 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 443 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 284 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10633 झाली आहे. आज 94 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 9747 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 354 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 95899 नमुने पाठविले असून यापैकी 95695 प्राप्त तर 204 अप्राप्त आहेत. तसेच 85062 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. ००००००००

जिल्ह्यात 76 जणांची कोरोनावर मात तर 49 नव्याने पॉझेटिव्ह

  Ø एकाचा मृत्यु यवतमाळ, दि. 10 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 97 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात 49 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला आहे. मृतकामध्ये वणी तालुक्यातील 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 602 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 49 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 553 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 282 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10589 झाली आहे. आज 76 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 9653 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 354 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 95467 नमुने पाठविले असून यापैकी 95205 प्राप्त तर 262 अप्राप्त आहेत. तसेच 84616 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आह

अतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहचवा

Image
                Ø जिल्हाधिका-यांचे तालुकास्तरीय यंत्रणेला निर्देश Ø व्हीसीद्वारे साधला संवाद यवतमाळ, दि. 10 : सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत म्हणून शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्हास्तरावरून हा निधी तालुकास्तरावर वितरीतसुध्दा करण्यात आला. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी तसेच नागरिकांना या निधीचे तातडीने वाटप करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीसीद्वारे त्यांनी सर्व तालुकास्तरीय यंत्रणेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. शासनाच्या 9 नोव्हेंबरच्या पत्रानुसार जिल्ह्याला 18 कोटी 6 लक्ष रुपये प्राप्त झाले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाचे तसेच पशुधनाचे नुकसान, घरांची पडझड, मृत्यू आदींसाठी निधी वितरीत करण्यात आला आहे. या संपूर्ण निधीचे दोन-तीन दिवसात वाटप करण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणेने प्राधान्याने नियोजन करावे. कोणत्याही परिस्थितीत हा निधी नुकसानग्रस्तांना वेळेत मिळाला प

जिल्ह्यात 97 जण ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’

  Ø एकाचा मृत्यु तर 14 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर यवतमाळ, दि. 9 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 97 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात 14 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला आहे. मृतकामध्ये यवतमाळ येथील 68 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शनिवारी एकूण 319 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 14 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 305 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 293 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10540 झाली आहे. आज 97 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 9577 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 353 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 95021 नमुने पाठविले असून यापैकी 94604 प्राप्त तर 417 अप्राप्त आहेत. तसेच 84064 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे

शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

Image
  यवतमाळ, दि. 9 : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणे निकाली काढण्यासंदर्भात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्हास्तरीय समितीचा आढावा घेऊन प्रकरणे निकाली काढली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अरविंद गुडधे, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके आदी उपस्थित होते. जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत एकूण 15 प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यात पात्र प्रकरणातील कुटुंबियांना शेतामध्ये नरेगा अंतर्गत विहिरी देण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. एका आठवड्याच्या आत संबंधित नायब तहसीलदार, तलाठी, पोलिस पाटील आणि ग्रामसेवक यांनी सदर कुटुंबियांकडून सर्व कागदपत्रे तयार करून घ्यावीत. यात कोणतीही चालढकल करू नये. तसेच काही कुटुंबांना शेतात पंप, जोडधंदा म्हणून गाई-म्हशी वाटप, शेटीवाटप आदींचा लाभ द्यावा. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत सुध्दा सदर कुटुंबाना लाभ देण्याचे नियोजन करावे, अशा सुचना त्यांनी केल्या. यावेळी जिल्हाधिका-यांनी