जिल्ह्यात 69 कोरोनामुक्त तर 57 नव्याने पॉझेटिव्ह

 


Ø दोघांचा मृत्यु

यवतमाळ, दि. 6 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 69 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात 57 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. मृतकांमध्ये यवतमाळ येथील 79 वर्षीय पुरुष आणि मारेगाव येथील 39 वर्षीय महिला आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 625 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 57 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 568 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 336 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10459 झाली आहे.

आज 69 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 9312 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 351 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 93777 नमुने पाठविले असून यापैकी 93463 प्राप्त तर 314 अप्राप्त आहेत. तसेच 83004 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

००००००००

 

 

 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी