जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पांदण रस्त्याबाबत बैठक

 


यवतमाळ, दि. 20 : पांदण रस्ते योजनेंतर्गत जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगीता राठोड, जिल्हा‍ नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर, पुसद येथील एकात्मिक आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे उपस्थित होते.

बैठकीत पांदण रस्ते भाग – ब अंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात 1500 कामे घेण्याबाबत सुचना देण्यात आल्या. तसेच योजनेंतर्गत वापरावयाच्या निधीच्या स्त्रोताबाबत चर्चा करण्यात आली. संबंधीत रस्त्याकरीता निधीच्या स्त्रोताबाबतचा प्रस्ताव व जिल्हास्तरावर सादर केलेल्या कृती आराखड्यातील मंजूर रस्ते संबंधीत ग्राम पंचायतीचा ठराव जिल्हास्तरावर उपविभागीय अधिका-यांनी तात्काळ सादर करावा. तसेच लोकसहभाग अंतर्गत सुध्दा कामे घ्यावीत, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी केल्या.

भाग –ब च्या रस्त्याच्या 1500 कामांना लागणाऱ्या निधीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यात ग्रामपंचायतीला जनसुविधांकरीता मिळणारे अनुदान, मोठ्या ग्रामपंचायतीला नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान, जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी, ग्रामपंचायतींना मिळणारे जमीन महसूल अनुदान, जिल्हा परिषद / पंचायत समिती सेस मधून उपलब्ध होणारा निधी, ग्रामपंचायतीचे स्व-उत्पन्न, पेसा अंतर्गत उपलब्ध होणारा निधी (अनुसूचित क्षेत्रातील गावाकरीता), ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार कार्यक्रम (आदिवासी उपाययोजना गावाकरीता) आदींचा समावेश होता. आचारसंहिता संपताच जिल्ह्यातील पांदण रस्त्यांच्या कामांना सुरवात होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

यावेळी भूमी अभिलेखचे उपअधीक्षक वाय. पी. चव्हाण, जि.प. बांधकाम विभाग क्र. 1 व क्र. 2 चे कार्यकारी अभियंता रा.ना. सूरकर आणि पी.एस. भांगे तसेच सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

०००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी