जिल्ह्यात 97 जण ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’

 


Ø एकाचा मृत्यु तर 14 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर

यवतमाळ, दि. 9 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 97 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात 14 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला आहे. मृतकामध्ये यवतमाळ येथील 68 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शनिवारी एकूण 319 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 14 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 305 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 293 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10540 झाली आहे.

आज 97 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 9577 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 353 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 95021 नमुने पाठविले असून यापैकी 94604 प्राप्त तर 417 अप्राप्त आहेत. तसेच 84064 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती