थकीत सभासदांना डिसेंबर 2020 पर्यंत परतफेडीची मुदत

 


Ø अन्यथा वसुलीची कारवाई

यवतमाळ, दि. 9 : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेतेखाली घेण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वसुली कृती कार्यक्रमांतर्गत थकीत वसुली करण्याबाबतचे निर्देश वसुली विभाग प्रमुख यांना देण्यात आले. जिल्ह्याबाहेरील थकीत वसुली करण्याकरीता वसुली अधिकारी यांना विशेष अधिकार प्राप्त होण्याचा प्रस्ताव तयार करण्यात असून ज्या थकीत सभासदांना कर्ज वसुलीकरीता नोटीस देण्यात आल्या आहेत, अशा सभासदांनी 20 टक्के रक्कम भरणा केल्यास अशा सभासदांना दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले.

या सभेत शेतकरी, बिगर शेतकरी सभासद तसेच बँक कर्मचाऱ्यांना बँकेच्या धोरणानुसार विविध उद्देशाकरीता कर्ज मंजूर करण्यात आले. बँकेच्या 2 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून चुकीच्या कर्जवाटपाची जबाबदारी देखील त्यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे. दिवाळीचा विचार करता अनेक शिक्षकांना ओव्हर ड्राफ्ट (ओ.डी.) व मध्यम मुदती कर्ज मंजूर करण्यात आले. पगारदार कॅश क्रेडीट कर्ज प्रकरणांच्या कर्ज मर्यादेचे नुतनीकरण करण्यात आले असून कॅश क्रेडीट कर्ज प्रकरणाचा यावेळी आढावा घेण्यात आला. तसेच हंगाम सन 2019-20 मधील कर्ज मागणी व वसुलीचा आढावा घेण्यात आला. तसेच सन 2020-21 मधील कर्ज मागणीची नोंद घेण्यात आली. बँकेचा डाटा सुरक्षिततेच्या दृष्टीने डीआर साईट सुरक्षित स्थळी हालविण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.

या सभेस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे व विभागाचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. सभेतील विषयाच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्याबाबत सुचना सभेत प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी