Posts

Showing posts from January, 2023

*उत्कृष्ट काम करण्याऱ्या 3 जिल्हा परिषद शाळांना प्रशस्तीपत्र प्रदान*

यवतमाळ, दि ३०(जिमका):- जिल्हयातील काही निवडक शाळांचा आदर्श शाळेच्या धर्तीवर विकास करण्यासाठी शाळांना पायाभुत सुविधा, डिजीटल तंत्रज्ञान, शाळा तिथे पोषण परसबाग व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम घेण्यात आले होते. सन २०२१-२२ मध्ये निवडण्यात आलेल्या शाळांपैकी 3 शाळांना २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, सावरगड, तालुका यवतमाळ, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देवनाळा, तालुका कळंब व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धनसळ, तालुका पुसद यांचा समावेश आहे. सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन, ग्राम विकास विभागांतर्गत बालभारती अर्थसहाय्यातून सन २०२१-२२ मध्ये मिशन १०० आदर्श शाळा अंतर्गत शाळांमध्ये भौतिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उपक्रम सुरू करण्यात आले होते. त्या शाळांमध्ये शासकीय योजनांचे कृतिसंगम, लोकसहभाग (लोकवाटा व श्रमदान) व सी एस आर निधीतून शाळांनी चांगले काम केले असून, या अभियानास शाळेतील शिक्षक वृंद, विद्यार्थी-पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व गावकऱ्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद

अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणूक जिल्ह्यात सुमारे ५८ टक्के मतदान* *सुमारे २१ हजार मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क*

Image
यवतमाळ,दि ३०जाने, जिमाका: अमरावती पदवीधर मतदार संघासाठी आज जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यात १६ तालुक्यात ४८ मतदान केंद्रावर सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार चार वाजेपर्यंत अंदाजे ५८.८७ टक्के मतदान झाले आहे. पदवीधर मतदारसंघासाठी एकुण २३ उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यात ३५ हजार २७८ पदवीधर मतदारांची नोंदणी झाली होती. यात २३ हजार ७८५ पुरुष तर ११४९३ महिला मतदारांचा समावेश आहे. पैकी सुमारे २० हजार ७६८ मतदारांनी मतदान केले. यात १४ हजार ९५२ पुरुष तर ५ हजार ८१६ महिलांनी मतदान केले. यवतमाळ जिल्ह्यात ४८ मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व संबंधितांच्या ५३ चमू कार्यरत होत्या. मतदान प्रक्रियेमध्ये २७६ अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. *जिल्हाधिका-यांनी बजावला मतदानाचा हक्क* पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज व्यस्त वेळापत्रकातुन वेळ काढुन सकाळी साडेदहा वाजता अभ्यंकर कन्या शाळा येथे मतदानाचा हक्क बजावला. तसेच निवासी उपजिल्हा

*संवैधानिक मुल्यांची जपणूक करुया* *अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड*

Image
*प्रजासत्ताकाचा ७३वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा* यवतमाळ दि.२६ : देशाला दिशा देणाऱ्या संवैधानिक मुल्यांची जपणूक करत महाराष्ट्राला घडवण्यात नागरिकांचा सहभाग महत्वाचा असल्याचे प्रतिपादन आज अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. पोस्टल ग्राऊंड येथे आयोजित भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनाच्या मुख्य कार्यक्रमात श्री.राठोड बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कर्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक पवन बनसोड, यांच्यासह राज्य शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक,लोकप्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते. श्री. राठोड म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला दिलेले संविधान हे सर्वोच्च स्थानी असून संविधानाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत हा देश विविध क्षेत्रात प्रगती करीत आहे. प्रत्येक भारतीयांना अभिमान असलेल्या संविधानातील मुल्यांचा अंगीकार करून महाराष्ट्राचा विकास होत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असतांना प्रत्तेक नागरि

रोहयोच्या अंमलबजावणीतील पारदर्शकतेसाठी तक्रार निवारण अधिकारी नियुक्त

यवतमाळ,दि.२५ जाने (जिमाका):- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना २००५ अंतर्गत महाराष्ट्र शासनाचे नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) यांचे मार्फत यवतमाळ जिल्हयाकरीता तक्रार निवारण प्राधिकारी (ओम्बडसमन) या पदावर ९ जानेवारी रोजी श्रीकृष्ण खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. श्री. खोब्रागडे या पदावर रुजु झालेले आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता निर्माण होण्याच्या दृष्टीने तक्रार निवारण प्राधिकारी तथा ओम्बड्समन या स्वायत्त व्यवस्थेची निर्मिती करण्यात आलेली आहे. या व्यवस्थेमार्फत या योजने अंतर्गत काम करणारे मजुर, योजनेचे लाभार्थी तसेच सर्वसामान्य जनता यांना त्यांच्या तक्रारी सादर करता येईल. सदरच्या तक्रारी, तक्रार निवारण प्राधिकारी, रोहयो विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ या पत्यावर तसेच भ्रमणध्वनी क्र. ८५३०७५९३४९ यावर सादर करता येईल. ०००००००

सावकारांकडुन पिडीत व्यक्तींनी तक्रारी दाखल कराव्यात - जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

यवतमाळ, दि. २५ जानेवारी (जिमाका):- जिल्ह्यातील अवैध सावकारी संबंधाने प्राप्त तक्रारी तसेच अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे व सावकारी व्यवसायावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. जिल्हास्तरीय सावकारी सनियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेस जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, तसेच सर्व तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था उपस्थित होते. तसेच अवैध सावकारी बाबतच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्याबाबत व यासंबंधाने जास्तीत जास्त ६ सुनावण्या घेऊन प्रकरणे गुणवत्तेवर निकाली काढण्याबाबत सूचना देण्यात आल्या. जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या पुढील सभेपूर्वी विधिज्ञ यांचे मार्गदर्शनार्थ सावकारी कायद्याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात येऊन यामध्ये सावकारी प्रकरणे कशी हाताळावीत, तसेच याबाबतचे आदेश कसे पारित करावेत, यासंबंधाने सर्व संबंधितांना प्रशिक्षण देण्याबाबत सांगण्यात आले. महाराष्ट्र स

अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा- जिल्हाधिकारी राष्ट्रीय मतदार दिन साजरा* मतदार जागृतीसाठी निघाली रॅली*

यवतमाळ, दि २५ जाने, (जिमाका):- विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच देशातील संवैधानिक संस्थांची कार्ये आणि जबाबदाऱ्या याची माहिती करून घेतली पाहिजे. निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त ही संवैधानिक संस्था आणि पद आहे. देशातील निवडणुका पार पाडण्याचे काम निवडणूक आयोगामार्फत होत असते. आपले आणि आपल्या देशाचे भविष्य उज्वल होण्यासाठी १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने मतदान नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावावा आणि राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात आज 25 जानेवारी मतदार दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य राम तत्ववादी, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, तहसीलदार कुणाल झाल्टे उपस्थित होते. पुढे बोलताना श्री येडगे म्हणाले, विद्यार्थ्यांना आता मोबाईल अप्लिकेशन द्वारेच मतदार नोंदणी करता येते. मतदार यादी, मतदार केंद्र, आपल्या कुटुंबातील सर्व

पदवीधर मतदार संघ निवडणुक* मतदानाच्या दिवशी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश*

यवतमाळ, दि.२५जाने.(जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषद व्दिवार्षिक निवडणूक-२०२३ साठी ३० जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. सदर निवडणूक शांततेत पार पाडण्याकरीता निवडणूक होत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील विधानपरिषद, निर्वाचन क्षेत्रातील मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. मतदानाची वेळ संपण्यापुर्वी ४८ तास आधी पासून दिनांक २८ जानेवारी २०२३ दुपारी ४ वाजता पासून दिनांक ३० जानेवारी २०२३ दुपारी ४ वाजेपर्यंत संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याच्या क्षेत्रातील अनुज्ञप्त्या बंद राहील. (एफएल-१,एफएल-२ सीएल/एफएल/टिओडी-३, एफएल/बिआर-२ एफएल -३,सिएल-२,सीएल-३ अनुज्ञप्ती ) बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. बंदच्या कालावधीत अनुज्ञप्ती मद्य विक्रीसाठी उघडी ठेवू नये. तसे आढळून आल्यास संबंधीत अनुज्ञप्ती व अनुज्ञप्तीधारकाविरुध्द कडक कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी,असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आदेशात म्हटले आहे

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा: प्लॅस्टीक राष्ट्रध्वजाचा वापर टाळा* जिल्हाधिकारी यांचे आवाहन

यवतमाळ, दि. २४ जानेवारी (जिमाका):- प्रजासत्ताक दिनी विविध कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी प्लॅस्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर खराब झालेले, फाटलेले, रस्त्यावर पडलेले, माती लागलेले राष्ट्रध्वज सांस्कृतिक व क्रिडा कार्यक्रमानंतर कार्यक्रम स्थळी इतरत्र पडलेले आढळतात. राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राचीअस्मिता होय. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होता कामा नये. राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याने स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी,सुजाण व जागरुक नागरिक, ग्रामपंचायत, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आरोग्य संस्था, सर्व खाजगी संस्था यांनी स्थानिक पोलीस यंत्रणेच्या मदतीने अशा प्रकारे प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. तसेच विक्रेत्यांनी प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करु नये. प्लॅस्टीकचे ध्वज आढळून आल्यास संबंधित तहसिलदार किंवा नगरपालिका कार्यालयात असे ध्वज जमा करावेत, असे
अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणूक_ मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांना दुस-या टप्प्यातील प्रशिक्षण* आपली जबाबदारी दक्षतापूर्वक पार पाडावी* सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे* यवतमाळ दि. २४ : निवडणूक प्रक्रियेत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची जबादारी महत्त्वपूर्ण असून सर्व प्रक्रिया दक्षतापूर्वक पार पाडावी, असे निर्देश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी दिले. अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ व्दिवार्षिक निवडणूक २०२३ कार्यप्रणालीबाबत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचे एक दिवसीय दुसरे प्रशिक्षण आज बचत भवन येथे आयोजित करण्यात आले होते. यवतमाळ जिल्ह्यात ४८ मतदान केंद्र असून त्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व संबंधितांच्या ५३ चमू तयार करण्यात आल्या आहेत. त्यातील ५ चमू राखीव ठेवण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेमध्ये २७६ अधिकारी, कर्मचारी सहभागी आहेत. या सर्वांना द्वितीय टप्प्यातील प्रशिक्षण उपजिल्हाधिकारी निवडणुक डॉ. स्नेहल कनिचे आणि तहसिलदार राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. सहाय
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त रॅलीचे आयोजन यवतमाळ, दि. २४ जानेवारी (जिमाका):- राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त २५ जानेवारी रोजी रॅलीचे आयोजन करुन मतदान यादीतील नाव नोंदणी व मतदानाचा हक्क याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. २५ जानेवारी २०२३ रोजी आझाद मैदान यवतमाळ येथे सकाळी साडेसात वाजता रॅलीचा शुभारंभ होणार असून यामध्ये ५०० विदयार्थी उपस्थित राहणार आहे. सदर रॅली ही आझाद मैदान-पोलीस स्टेशन यवतमाळ-नेताजी चौक-बस स्टॅन्ड-एल.आय.सी.चौक या मार्गाने मार्गक्रमण करुन बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे सामारोप होणार आहे अशी माहिती तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कुणाल झाल्टे यांनी दिली आहे. नागरिकांनी यात सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.
कुष्ठरुग्णांच्या उपचारासाठी समाजाने सहकार्य करावे -जिल्हाधिकारी स्पर्श अभियान ३०जानेवारी ते १३ फेब्रुवारी यवतमाळ दि २४ जाने (जिमाका) :- कोविड सारख्या संसर्गजन्य आजारातही आपण कुटुंबातील सदस्याला घरातच ठेवून उपचार केले आहेत. त्यापेक्षा कुष्ठरोग हा लवकर बरा होणारा आजार असुन यासाठी योग्यवेळी उपचार घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे कुष्ठरुग्णांवर सामाजिक बहिष्कार न टाकता कुटुंबियांनी व नागरिकांनी त्यांच्या उपचारासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. जागरूकता आणि शास्त्रीय माहितीच्या अभावामुळे कुष्ठरोगाबाबत समाजात कलंक आणि भेदभाव निर्माण झालेला आहे. ज्यामुळे रोगाचा प्रसार आणि उपचाराबद्दल गैरसमज वाढतात. कुष्ठ रोगाशी निगडित कलंक आणि भेदभावाचे निराकरण करण्यासाठी आणि समाजात जागरूकता वाढविण्यासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत स्पर्श अभियान राबविण्यात येणार आहे. यासंबंधीची बैठक जिल्हाधिक
यवतमाळ,दि.२०जाने (जिमाका):- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,यवतमाळ व जिल्हा वकील संघ,यांचे संयुक्त विद्यमाने ११ फेब्रुवारीला सकाळी साडेदहा वाजता जिल्हा न्यायालय,यवतमाळ येथे तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये येथे राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार राष्ट्रिय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेले तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भुअर्जन मामल्याची प्रकरणे, महसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद प्रकरणे, बॅका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुलीप्रकरणे व तडजोडीस पात्र असणारी सर्व प्रलंबित व दाखलपुर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येतात. सदर लोकअदालतीमध्ये वाद मिटविण्याकरिता न्यायाधीश, तज्ञ वकील व सामाजीक कार्यकर्ते यांचे मंडळ पक्षकारांस मदत करेल. तसेच लोकअदालतीमध्ये प्रकरण ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. तरी सर्व पक्षकारांनी ११ फेब्रुवारी रोजी आ

सामुहिक व वैयक्तिक वनहक्क मिळालेल्या वनवासींना इतर विभागाच्या योजनांचा लाभ मिळवून द्या जिल्हाधिकारी

यवतमाळ दि 17 जिमाका: वनहक्क कायद्याअंतर्गत सामूहिक व वैयक्तिक वनहक्क मिळालेल्या वनवासींना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी इतर विभागाच्या सामूहिक व वैयक्तिक योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयात श्री येडगे यांनी आज अभिसरण समितीची बैठक घेतली. यावेळी आदिवासी लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या योजनांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. पांढरकवडा आणि पुसद प्रकल्प अधिकाऱ्यांनी आतापर्यंत सामूहिक वन हक्क मंजूर झालेल्या 767 गावांपैकी २५० गावांमध्ये वन व्यवस्थापन समित्या गठीत कराव्यात. या समित्यांकडुन आदर्श व्यवस्थापन आराखडा तयार करावा. 20 फेब्रुवारीच्या आत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. त्याचबरोबर वैयक्तिक आणि सामूहिक वन हक्क दावे सुटलेल्या ग्रामपंचायतीने अशी प्राकरणे पुन्हा सादर करावीत. तेंदुपत्ता संकलन करताना यावर्षी काही अडचणी उद्भवणार नाहीत याची काळजी घेण्यात यावी. 767 सामूहिक वन हक्क मिळालेल्या गावांपैकी किती गावांमध्ये तेंदुपत्ता संकलन केले जाते त्या गावांची यादी तयार करावी. या सर्व गावात मनरेगा अंतर्गत व

नामंजुर कर्ज प्रकरणात अर्जदारांनी पुन्हा कागदपत्रे सादर करावीत*

यवतमाळ, दि १७: जिल्हा उद्योग केंद्र आणि खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रमांतर्गत बँकेने नामंजुर केलेल्या कर्ज प्रकरणे पुन:श्च विचारात घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील सर्व बँकांना केलेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रमांतर्गत सीबीलमुळे (CIBIL) नामंजूर झालेले कर्ज प्रकरण वगळता इतर सर्व अर्जदारांनी बँकेस संपुर्ण कागदपत्रासह भेट द्यावी. यासंबंधी काही अडचण आल्यास जिल्हा उद्योग केंद्र व खादी व ग्रामोद्योग मंडळ, यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी कळविले आहे.

एकलव्य निवासी पब्लिक स्कुलमध्ये प्रवेश परीक्षेकरीता अर्ज आमंत्रित*

यवतमाळ, दि. १७ जानेवारी (जिमाका):- इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य निवासी पब्लिक स्कुल मध्ये प्रवेशाकरिता २६ फेब्रुवारीला प्रवेश परीक्षा होणार आहे. अमरावती अप्पर आयुक्त आदिवासी विकास यांचे अधिनस्त असलेल्या प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगर पालिकांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांकरीता आयोजित करण्यात येत आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा अंतर्गत सदर प्रवेश परीक्षा शासकीय आश्रमशाळा शिबला, ता. झरी व शासकीय आश्रमशाळा अंतरगांव ता. कळंब या परीक्षा केंद्रावर २६ फेब्रुवारीला ११ ते २ या कालावधीत घेण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षेकरीता विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज पांढरकवडा प्रकल्प कार्यालय व अधिनस्त सर्व शासकीय व अनुदानित आश्रम शाळांच्या मुख्याध्यापकांकडे विनामूल्य उपलब्ध आहेत. शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हापरिषद, नगरपालिका तथा नगरपरिषदांच्या प्राथमिक तथा माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य प्राथमिक तथा अनुदानित शाळांमध्ये २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी, ६ वी, ७ वी व ८ वी मध्ये शिकत असलेले

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित* शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन २०१९-२०,२०२०-२१,व २०२१-२२

यवतमाळ, दि. १७ जानेवारी (जिमाका):- क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा मानला गेलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रदान करण्यात येतो. सन २०१९-२०, २०२०-२१, व २०२१-२२ या तीन स्वतंत्र वर्षांच्या पुरस्कारासाठी राज्यातील जेष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांच्यामार्फत राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करते. शासनाने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी १४ डिसेंबर २०२२ रोजीनियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार अर्जाचे नमुने https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन, डाऊनलोड करुन घेऊन, व्यवस्थितरित्या भरुन संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदारांना मतदानाच्या दिवशी विशेष नैमेत्तिक रजा

यवतमाळ, दि. 17 : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान 30 जानेवारी रोजी होणार आहे. यादिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याचे निर्देश संबंधित आस्थापनांना देण्यात आले आहेत. ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असेल अशी तदतूद आहे. यादिवशी मतदारांनी मतदानपद्धतीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले.

मत कसे नोंदवाल ? निवडणूक आयोगाच्या सूचना पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदविणे अत्यंत आवश्यक*

यवतमाळ, दि. १७ : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान करताना पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदविणे अत्यंत आवश्यक आहे. मतदान पद्धतीबाबत भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून मतदारांनी मतदानाचे कार्य पार पाडावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले. _ मतदान करताना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे आवश्यक आहे._ मतदान करताना केवळ आणि केवळ मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केचपेननेच मत नोंदवावे. स्वत: जवळील इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉलपेनचा वापर करण्यात येऊ नये. आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील ‘पसंतीक्रम नोंदवावा’ या रकान्यात *१*’ हा अंक लिहून मत नोंदवावे. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत, तितके पसंतीक्रम आपण मतपत्रिकेवर नोंदवू शकता.आपले पुढील पसंतीक्रम उर्वरित उमेदवारांसमोरील रकान्यात २, ३, ४ इत्यादीप्रमाणे आपल्या पसंतीप्रमाणे नोंदवता येतील. एका उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एकच पसंतीक्रमाचा अंक नोंदवावा.

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक_ दहा उमेदवारांचे अर्ज मागे ; 23 उमेदवार निवडणूक लढविणार*

यवतमाळ दि. १७ : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज वैध ठरलेल्या 33 उमेदवारांपैकी आज नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याच्या दिवशी 10 उमेदवारांकडून अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे उर्वरित 23 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या व्यक्तींची नावे अशी :* गोपाल सुखदेवराव वानखेडे, मधुकर दिगांबर काठोळे, प्रा. डॉ. प्रफुल्ल अजाबराव राऊत, राजेश मोतीराम दांदडे, ॲड. सिध्दार्थ मारोतराव गायकवाड, राजेश सोपान गावंडे, किरण अर्जुन चौधरी, पांडुरंग तुकारामजी ठाकरे, नामदेव मोतीराम मेटांगे, मीनल सचिन ठाकरे.निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे अशी (कंसात पक्षाची नावे): धीरज रामभाऊ लिंगाडे (इंडियन नॅशनल काँग्रेस), डॉ. रणजीत विठ्ठलराव पाटील (भारतीय जनता पार्टी), अनिल ओंकार अमलकार (वंचित बहुजन आघाडी), डॉ. गौरव रामदास गवई (बहुजन भारत पार्टी), तर अपक्ष म्हणून अनिल वकटूजी ठवरे, अनंतराव राघवजी चौधरी, अरुण रामराव सरनाईक, ॲड. आनंद रविंद्र राठोड, धनराज किसनराव शेंडे, ॲड. धनंजय मोहनराव तोटे, निलेश दिपकपंत पवार (राजे), उपेंद्र बाबाराव पाटील, शरद प्रभाकर झांबरे पाटील, श्याम जगमोहन प

*कर्ज प्रकरणे निकाली काढण्यासाठी कालमर्यादेचे काटेकोर पालन व्हावे* *जिल्हाधिकारी* *जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीची बैठक*

यवतमाळ, दि,१३ जाने, जिमाका: जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सर्व बँकांच्या विभागिय व्यवस्थापकांनी शिक्षण, घर, लघु उद्योग आणि शासनाच्या सर्व योजनांसाठी कर्ज लक्षांक वाढवावा. तसेच कर्ज प्रकरणे निकाली काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेने घालुन दिलेली १५ ते ४५ दिवसाच्या मर्यादेचे काटेकोर पालन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे पार पडलेल्या बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, रिझर्व बँक ऑफ इंडिया नागपूरचे व्यवस्थापक राजकुमार जयस्वाल, लीड बँक व्यवस्थापक अमर गजभिये, नाबार्डचे जिल्हा महाव्यवस्थापक दीपक पेंदाम, आर सी टी चे संचालक विजयकुमार भगत, स्टेट बँक ऑफ इंडिया चे विभागीय व्यवस्थापक मृत्युंजय पांडा, फिरोज ताडवी, आर एम सोमकुवर, प्रदीप ठाकूर, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी, तसेच घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घरासाठी कर्ज उपलब्ध करुन द्यावे. मुख्यमंत्री र

निवडणूक निरीक्षकांकडून निवडणूक पूर्वतयारीचा आढावा *मतदान केंद्रांचीही पाहणी*

यवतमाळ,दि.१३जिमाका: पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत, असे निर्देश निवडणूक निरीक्षक पंकज कुमार यांनी आज येथे दिले. निवडणुकीच्या अनुषंगाने निरीक्षक श्री. पंकजकुमार यांचे आज आगमन झाले. त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल भवन येथे निवडणूक प्रशासनाची बैठक घेऊन विविध कामांचा आढावा घेतला. तसेच विविध मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. या बैठकिला जिल्हाधिकारी अमोल येडगे, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, उपजिल्हाधिकारी निवडणूक स्नेहल कनिचे आदी उपस्थित होते. बैठकीत प्रशासनाकडून करण्यात आलेली पूर्वतयारी, मतदान केंद्रे, मतदार संख्या, आदर्श आचारसंहिता कक्ष, माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती, प्रशिक्षण कार्यक्रम, निवडणुक कर्मचारी संख्या, आदी विविध बाबींची माहिती निवडणूक निरीक्षकांनी घेतली. आदर्श आचारसंहितेचे पालन होण्याच्या दृष्टीने काटेकोर कार्यवाही व्हावी, असे निर्देश त्यांनी दिले. पदवीधर निवडणूक ही लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीपेक्षा वेगळी आहे. यात मतदान यंत्राचा वापर न ह

मकर संक्रांती भोगी हा दिवस 'पौष्टिक तृणधान्य दिन' म्हणून होणार साजरा*

यवतमाळ,दि. 12 :- संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे. यानिमित्त कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकरी व सर्व सामान्य व्यक्तींना पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व, त्याचे फायदे काय आहेत याबरोबरच तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढ कार्यक्रम हाती घेतला आहे. यानुसार आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत “मकर संक्रांती-भोगी” हा सणाचा दिवस दरवर्षी राज्यामध्ये “पौष्टिक तृण धान्य दिन” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील गावांमध्ये कृषि विभागामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा व राजगिरा पिकापासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थ आहारासाठी पौष्टीक असल्याने यांची माहिती व कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. 14 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रांती-भोगी हा द

ज्वारी, मका, बाजरी खरेदी ऑनलाईन नोंदणीकरिता १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

यवतमाळ,दि 12 जानेवारी (जिमाका): आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनामार्फत ज्वारी,मका व बाजरी खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता महाराष्ट्र स्टेट को. ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडमार्फत ५ खरेदी केंद्र उघडण्यात आलेले आहे. ज्वारी, मका, बाजरी खरेदी ऑनलाईन नोंदणीकरिता आता १५ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महागांव तालूक्यात तालुका खरेदी विक्री समिती, महागांव, पांढरकवडा तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती, पांढरकवडा, झरी तालुक्यात बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था पाटण, पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु), पुसद, आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी यांचा समावेश आहे. या हंगामापासुन ज्या शेतकऱ्यांचा ७/१२ आहे त्याच शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पुर्ण होणार नाही.शेतकरी नोंदणी मोबाईल ॲपव्दारे होत असुन लाईव्ह फोटो देखील मोबाईल ॲपव्दारे अपलोड करता येणार आहे.तशा सुचना दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी शासनाकडून प्राप्त झालेल्या आहे. त्यामुळे शेतमालाची

हेल्मेट वापरा जीव वाचवा -जिल्हाधिकारी* रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ

यवतमाळ, दि,12 :- कोरोना काळात प्राण वाचवण्यासाठी ज्या प्रकारे मास्क वापरण्याची काळजी घेतली जात होती, तशीच काळजी सध्या रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी घेणे आवश्यक आहे. अतिवेग, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, हेल्मेट न वापरणे, ट्रिपल सीट चालवणे या सगळ्या चुकीच्या कृत्यांमुळे आपण स्वतःचा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालतो. यापुढे तरुणांनी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर अवश्य करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिकेमध्ये रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड एन एच आय चे प्रकल्प संचालक प्रकल्प अधिकारी हर्षद पारीक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता दीपक सोनटक्के परिवहन विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले की देशात चार लाख 90 हजार अपघात झाले असून यामध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यात जास्तीत जास्त अपघात हे दुचाकी वाहनांचे आहेत. यात झालेले मृत्यु हे केवळ हेल्म

राज्यातील खाजगी चित्रीकरण स्थळांची माहिती पाठविण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. १० : राज्यातील खाजगी मालकीच्या चित्रीकरण स्थळांची माहिती जास्तीत जास्त निर्मिती संस्थांना कळावी यासाठी संबधित चित्रीकरण स्थळांचे मालक अथवा संस्थांनी गुगल ड्राईव्हवर स्थळांची विस्तृत माहिती, छायाचित्र, व्हिडीओ आणि संपर्क क्रमांक पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने (चित्रनगरी/फिल्मसिटी) केले आहे. महाराष्ट्र हे मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेले राज्य असून देश- विदेशातील निर्मिती संस्था येथे चित्रीकरण करण्यासाठी प्राधान्याने येत असतात. सध्या राज्यातील विविध ठिकाणी खाजगी चित्रीकरण स्थळ विकसित होत आहेत. ही चित्रीकरण स्थळे विविध निर्मिती संस्थांना माहिती व्हावीत यासाठी महामंडळ पुढाकार घेत आहे. यासाठी चित्रीकरणयोग्य अशा मालमत्ताधारकांनी महामंडळास संपर्क साधून आपल्या स्थळांची परिपूर्ण माहिती कळविल्यास, महामंडळ विविध प्रसिद्धीमाध्यमाद्वारे चित्रीकरण स्थळांची माहिती निर्मितीसंस्थांपर्यंत पोहोचविण्याचे काम करेल. याद्वारे नागरिकांना अधिकचे उत्पन्न प्राप्त होईल आणि त्यांच्या स्थळांची प्रचार-प्रसिद्धी होईल. अधिक माहितीसाठी www.filmcitymumbai.org,

खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी ई-आर-१ ऑनलाईन सादर करावा* *ई-आर-१ सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारी*

यवतमाळ, दि १० जानेवारी (जिमाका) :- कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांचे कडून पुरविण्यात येणाऱ्या रोजगार विषयक सर्व सेवा आता ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. ऑक्टोबर-२०२२ ते डिसेंबर-२०२२ अखेर संपणाऱ्या त्रैमासिक करीता ई-आर-१ या प्रपत्राची माहिती संकेत स्थळावर सर्व शासकिय, निमशासकिय, खाजगी उद्योजक, आस्थापना यांनी ऑनलाईन सादर करावयाची आहे . त्यासाठी rojgar.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसीत करण्यात आलेले आहे. आस्थापनांनी युझर आय.डी. व पासवर्डच्या माध्यमातून लॉग ईन करुन व त्याबाबतचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरुन प्राप्त करुन घ्यायचे आहे. उद्योजक / आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालय (रिक्तपदे अधिसुचित करण्याची सक्ती करणारा ) कायदा १९५९ व नियमावली १९६० कलम ५ (१) व कलम ५(२) अन्वये त्रैमासिक ई-आर १ ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. ऑनलाईन ई आर – १ सादर करतांना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ या कार्यालयाशी संपर्क साधावा, अथवा दुरध्वनी क्रमांक ०७२३२-२४४३९५ यावर संपर्क साधावा. ई-आर १ सादर करण्याची अंतिम मुदत माहे ३१ जानेवारी-२०२३

मराठी भाषा पंधरवाडामिमित्त कला महोत्सवाचे आयोजन*

*रेगिस्तान-ए-गझल’ हा गझल कार्यक्रम व अमृता, साहिर, इमरोज या नाटकाचा प्रयोग* यवतमाळ, दि १० जाने, जिमाका: मराठी भाषा पंधरवडा निमित्ताने महसूल कर्मचारी संघटना, यवतमाळ यांच्या वतीने परिवर्तन, जळगाव या संस्थेचा राज्यभर गाजत असलेला ‘कला महोत्सव’ यवतमाळ मध्ये आयोजित करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील बचत भवन येथे १४ व १५ जानेवारीला कला महोत्सवाचे आयोजन आयोजन करण्यात आले आहे. ‘ रेगिस्तान-ए-गझल’ या कार्यक्रमाचे सादरीकरण १४ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता करण्यात येणार आहे. गज़ल म्हणजे काय, गज़ल कुठून आली, कशी रुजली, अरबस्तानमधली गझल भारतात येऊन भारतीय कशी झाली. आज भारतातील सगळ्यात लोकप्रिय काव्य प्रकार गझल आहे. याच गझलचा शोध एका संगीतमय कार्यक्रमामधून घेण्यात येणार आहे. अमरावती महसूल विभागाचे विभागीय आयुक्त ज्येष्ठ गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या संकल्पनेमधून व निवेदनामधून हा संगीतमय गझल गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. दुसऱ्या दिवशी,१५ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता शंभु पाटील लिखित ‘अमृता, साहिर, इमरोज ह्या नाटकाचा व ‘नली’ या एकल नाट्या
*मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे पत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार* पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन यवतमाळ, दि १० जाने:- लोकशाहीचा ढाचा अबाधित राखण्यासाठी निवडणुका, मतदान, मतदार नोंदणी या अत्यावश्यक बाबी आहेत. निवडणुका निःपक्षपाती आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. मात्र ही जबाबदारी पार पाडत असताना प्रसारमाध्यमांचे आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे निवडणूक आयोगाला सहकार्य लाभत असते. हे लक्षात घेऊन यावर्षीपासून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार जाहीर केले आहेत. मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधी माहितीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी 'निवडणूकवार्तांकन पुरस्कार' दिला जाणार आहे. तर मतदार जागृतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना 'मतदार-मित्र पुरस्कार' दिला जाणार आहे. १० हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. हे पुरस्कार २५जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात वितरित केले जातील. पत्रकार आणि स्वयंसे
इयत्ता ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी जात पडताळणीचे विशेष शिबीर यवतमाळ, दि. ९ जानेवारी (जिमाका):- इयता ११ वी व १२ वी विज्ञान तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास ईच्छुक विद्यार्थ्यांसाठी जात पडताळणी समितीद्वारे शिबीरे आयोजीत केलेली आहे. उमरखेड तालुक्यामध्ये गोपिकाबाई सितारामजी गावंडे महाविद्यालय उमरखेड, जि.यवतमाळ येथे ११ जानेवारीला शिबीराचे आयोजन ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत करण्यात आले आहे. सदर शिबीरात सन २०२२-२३ मधील ११ वी व १२ विज्ञान शाखेतील प्रवेशीत विद्यार्थी यांनी https:// bartievalidity.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाचा उपयोग करुन परिपुर्णभरलेला अर्ज व मूळ कागदपत्रासह उपस्थीत रहावे. अर्जदाराचा जातीचा दाखला यवतमाळ जिल्ह्यातील असावा व अर्जदार हा अनुसुचित जाती (SC), विमुक्त जाती, भटक्या जमाती(VJNT), विशेष मागासवर्ग (SBC) व इतर मागासप्रवर्ग (OBC) याच प्रवर्गाचे अर्ज समितीकडुन स्वीकारले जातील व पडताळणी केली जाईल. अधिक माहितीकरीता विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील प्राचार्य यांचेशी संपर्क करावा. ज्या विदयार्थींचे अर्ज परिपुर्ण असतील त्या विद्यार्थ्यांना
*सैनिक दरबार ६ फेब्रुवारीला* यवतमाळ, दि ९ जानेवारी (जिमाका) :- माजी सैनिक, सेवारत सैनिक व त्यांच्या कुटूबियांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षते खाली ६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता सैनिक दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ज्या माजी सैनिक/सेवारत सैनिक व त्यांचे अवलंबितांच्या वैयक्तिक अडीअडचणी व तक्रार असतील त्यांनी पुराव्यासह सर्व कागदपत्रे, दुरध्वनी क्रमांक व पत्यासह दोन प्रतिमध्ये लेखी स्वरुपात अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यवतमाळ येथे २० जानेवारी २०२३ पुर्वी (कार्यालयीन वेळेमध्ये) सादर करून टोकन प्राप्त करावे. यापुर्वी लोकशाही दिनात सादर केलेली तसेच न्याय प्रविष्ठ प्रकरणे स्विकारण्यात येणार नाही. तसेच मुदतीनंतर अथवा ऐनवेळी दिलेल्या अर्जांचा विचार पुढील तक्रार निवारण आयोजनाचे वेळी करण्यात येईल. यवतमाळ जिल्ह्यातील माजी सैनिक/सेवारत सैनिक यांनी सैनिक दरबाराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी केले आहे.

ज्वारी, मका, बाजरी खरेदी ऑनलाईन नोंदणीकरिता ७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ*

यवतमाळ,दि ४ जाने (जिमाका): आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनामार्फत ज्वारी,मका व बाजरी खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता महाराष्ट्र स्टेट को. ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडमार्फत ५ खरेदी केंद्र उघडण्यात आलेले आहे. ज्वारी, मका, बाजरी खरेदी ऑनलाईन नोंदणीकरिता आता ७ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महागांव तालूक्यात तालुका खरेदी विक्री समिती, महागांव, पांढरकवडा तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती, पांढरकवडा, झरी तालुक्यात बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था पाटण, पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु), पुसद, आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी यांचा समावेश आहे. या हंगामापासुन ज्या शेतकऱ्यांचा ७/१२ आहे त्याच शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पुर्ण होणार नाही.शेतकरी नोंदणी मोबाईल ॲपव्दारे होत असुन लाईव्ह फोटो देखील मोबाईल ॲपव्दारे अपलोड करता येणार आहे.तशा सुचना दिनांक ३१ डिसेंबर २०२२ रोजी शासनाकडून प्राप्त झालेल्या आहे. त्यामुळे शेतमालाची विक्री
यवतमाळ, दि ३ जाने:- अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतुन यवतमाळ जिल्ह्यात सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान अंतर्गत तालुका स्तरीय 'समाधान शिबीर' आयोजित करण्यात येणार होते. ८ व ९ जानेवारी 2023 ला होणारे समाधान शिबीर जिल्ह्यात पदवीधर मतदार संघासाठी आचारसंहिता लागू झाल्यामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील १३ तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुका असल्यामुळे शासकीय यंत्रणा ग्रामपंचायत निवडणुक कामामध्ये व्यस्त होती. तसेच १९ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२२ पर्यंत विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन असल्याने सदर समाधान शिबीर पुढे ढकलण्यात आले होते. आता २९ डिसेंबरलाच पदवीधर मतदार संघासाठी जिल्ह्यात आचार संहिता लागु झाल्यामुळे समाधान शिबिर आयोजित करता येणार नाही. त्यामुळे ८ व ९ जानेवारीला होणारे समाधान शिबिर पुढे ढकलण्यात आले आहे. पुढिल तारिख निश्चित झाल्यवर कळविण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा ९ जानेवारीला

यवतमाळ, दि. 3 जानेवारी (जिमाका):- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे ९ जानेवारीला सकाळी साडेनऊ वाजता राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यामध्ये जगप्रसिध्द सुझुकी मोटार गुजरात प्रायव्हेट लिमिटेड, हंसलपुर गुजरात या कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. लेखी परीक्षा व मुलाखत घेवून शिकाऊ उमेदवार म्हणून निवड करण्यात येणार आहे. तरी या मेळाव्यासाठी १८ ते २४ या वयोगटातील जास्तीत जास्त आय टी आय वेल्डर, फिटर, पेंटर जनरल, मेकॅनिक मोटार व्हेईकल, वायरमन, टर्नर, टुल्स अँड डाय मेकर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक मोटार व्हेईकल, वायरमन, मेकॅनिक डिझेल उत्तीर्ण उमेदवारांनी सहभागी व्हावे. प्रशिक्षणार्थी यांनी मूळ कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षणादरम्यान १६ हजार ९०० रुपये विद्यावेतन प्रति माह मिळणार आहे. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य व्ही. जे. नागोरे औद्योगीक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ यांनी केले आहे.

सेवा समाप्त होमगार्डनी १५ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावा*

यवतमाळ, दि. ३ जानेवारी (जिमाका):- जानेवारी २०१० नंतर व जुलै २०१५ पुर्वी सेवा समाप्त झालेल्या होमगार्डस उमेदवारानी संघटनेत समावेशासाठी १५ जानेवारीपर्यंत विविध प्रमाणपत्रासह अर्ज जिल्हा समादेशक कार्यालयात सादर करावा, असे आवाहन जिल्हा समादेशक पियुष जगताप यांनी केले आहे. प्रपत्र अ नुसार कोणत्याही संघटनेत सदस्य होणार नाही, व प्रपत्र ब नुसार बेशिस्त वर्तन करणार नाही, याचे हमीपत्र सादर करावे. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र व प्रपत्र ब नुसार चारित्र्य प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे. उशिराने सादर केलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही तसेच पथकात येणाऱ्या एकूण अर्जांपैकी रिक्त जागा असल्यास उमेदवाराला सामाऊन घेता येईल. प्रपत्र अ व प्रपत्र ब होमगार्ड यवतमाळ जिल्हा कार्यालयाच्या जिल्हयातील समादेशक अधिकारी पथक कार्यालयाचे सुचना फलकावर उपलब्ध आहेत. यवतमाळ जिल्हयातील नमुद कालावधीत सेवासमाप्त केलेल्या होमगार्डसाठी असल्याने इतरांनी अर्ज करु नये, असे जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप यांनी कळविले आहे.

*निधी नाही म्हणुन काम थांबवू नये*

-जिल्हाधिकारी* यवतमाळ दि 3 जाने:- जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मधील कामांसाठी प्रशासकीय मान्यता दिली असल्यास, कार्यकारी यंत्रणांनी निधी वितरण आदेश मिळाला नाही म्हणून कार्यादेश देण्याचे थांबवू नये. प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर निधी देण्याची जबाबदारी जिल्हा नियोजन समितीची आहे. त्यामुळे कार्यकारी यंत्रणांनी केवळ निधी उपलब्ध नाही अशा सबबी न सांगता कार्यादेश देऊन काम सुरु करावे अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, प्रादेशिक पर्यटन, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, आणि वन विभागाकडे परवानगीसाठी प्रलंबित असलेली प्रकरणे आदींचा जिल्हाधिकारी यांनी आज आढावा घेतला यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. अनेक विभागांना तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर वन विभागाच्या मान्यतेची आठवण होते. वन विभागाची मान्

आता अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेत मोफत धान्य*

यवतमाळ दिनांक 2 जाने जिमाका :- केंद्र शासनाने 1 जानेवारी, 2023 पासून अन्न सुरक्षा कायद्याखाली दिले जाणारे धान्य मोफत देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जानेवारीपासून अन्न सुरक्षा योजने अंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेमध्ये दिले जाणारे धान्य 1 वर्षांपर्यंत मोफत दिले जाईल. हे धान्य देताना त्याची स्वतंत्र पावती दिली जाईल. या धान्याची उचल करताना लाभार्थ्यांचे स्वतंत्र बायोमेट्रिक प्रमाणीकरण (इ-पॉस मशीनवर वेगळ्याने अंगठा देणे) करावे लागेल. लाभार्थ्यांना यापुढे या योजनेमुळे वर्षभर धान्याचे पैसे द्यावे लागणार नाहीत, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी कळविले आहे.

शेतकरी निघाले अभ्यास दौ-यावर*

यवतमाळ,दि.२ जानेवारी (जिमाका):- शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञान, इतर जिल्ह्यातील शेतक-यांचे प्रयोग, सुगी पश्चात तंत्रज्ञान इत्यादीची माहिती होण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील 60 शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत अभ्यास दौऱ्यावर पाठविण्यात आले. आज जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी हिरवा झेंडा दाखवून शेतकऱ्यांच्या वाहनांना मार्गस्थ केले. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२२-२३ मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय यवतमाळ येथून शेतकरी मार्गस्थ झाले. २ जानेवारी ते ६ जानेवारी २०२३ पर्यंत प्रक्षेत्र प्रशिक्षण व अभ्यास दौरा आहे. यवतमाळ,राळेगाव,कळंब,घाटंजी येथील महिला व पुरूष असे एकूण ६० शेतकरी व कर्मचारी पाठविण्यात आले.यामध्ये शेतकऱ्यांना सिल्लोड येथील कृषी प्रदर्शनी,कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर अहमदनगर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर, कांदा लसून संचलनालय राजगुरूनगर, पुणे, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव,पुणे व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान, तळेगाव दाभाडे इत्यादी संस्था व प्रगतीशील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देण्याचा यामध्