यवतमाळ, दि ३ जाने:- अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतुन यवतमाळ जिल्ह्यात सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान अंतर्गत तालुका स्तरीय 'समाधान शिबीर' आयोजित करण्यात येणार होते. ८ व ९ जानेवारी 2023 ला होणारे समाधान शिबीर जिल्ह्यात पदवीधर मतदार संघासाठी आचारसंहिता लागू झाल्यामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील १३ तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुका असल्यामुळे शासकीय यंत्रणा ग्रामपंचायत निवडणुक कामामध्ये व्यस्त होती. तसेच १९ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२२ पर्यंत विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन असल्याने सदर समाधान शिबीर पुढे ढकलण्यात आले होते. आता २९ डिसेंबरलाच पदवीधर मतदार संघासाठी जिल्ह्यात आचार संहिता लागु झाल्यामुळे समाधान शिबिर आयोजित करता येणार नाही. त्यामुळे ८ व ९ जानेवारीला होणारे समाधान शिबिर पुढे ढकलण्यात आले आहे. पुढिल तारिख निश्चित झाल्यवर कळविण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी