रोहयोच्या अंमलबजावणीतील पारदर्शकतेसाठी तक्रार निवारण अधिकारी नियुक्त

यवतमाळ,दि.२५ जाने (जिमाका):- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना २००५ अंतर्गत महाराष्ट्र शासनाचे नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) यांचे मार्फत यवतमाळ जिल्हयाकरीता तक्रार निवारण प्राधिकारी (ओम्बडसमन) या पदावर ९ जानेवारी रोजी श्रीकृष्ण खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. श्री. खोब्रागडे या पदावर रुजु झालेले आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता निर्माण होण्याच्या दृष्टीने तक्रार निवारण प्राधिकारी तथा ओम्बड्समन या स्वायत्त व्यवस्थेची निर्मिती करण्यात आलेली आहे. या व्यवस्थेमार्फत या योजने अंतर्गत काम करणारे मजुर, योजनेचे लाभार्थी तसेच सर्वसामान्य जनता यांना त्यांच्या तक्रारी सादर करता येईल. सदरच्या तक्रारी, तक्रार निवारण प्राधिकारी, रोहयो विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ या पत्यावर तसेच भ्रमणध्वनी क्र. ८५३०७५९३४९ यावर सादर करता येईल. ०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी