खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी ई-आर-१ ऑनलाईन सादर करावा* *ई-आर-१ सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारी*

यवतमाळ, दि १० जानेवारी (जिमाका) :- कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांचे कडून पुरविण्यात येणाऱ्या रोजगार विषयक सर्व सेवा आता ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. ऑक्टोबर-२०२२ ते डिसेंबर-२०२२ अखेर संपणाऱ्या त्रैमासिक करीता ई-आर-१ या प्रपत्राची माहिती संकेत स्थळावर सर्व शासकिय, निमशासकिय, खाजगी उद्योजक, आस्थापना यांनी ऑनलाईन सादर करावयाची आहे . त्यासाठी rojgar.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसीत करण्यात आलेले आहे. आस्थापनांनी युझर आय.डी. व पासवर्डच्या माध्यमातून लॉग ईन करुन व त्याबाबतचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरुन प्राप्त करुन घ्यायचे आहे. उद्योजक / आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालय (रिक्तपदे अधिसुचित करण्याची सक्ती करणारा ) कायदा १९५९ व नियमावली १९६० कलम ५ (१) व कलम ५(२) अन्वये त्रैमासिक ई-आर १ ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. ऑनलाईन ई आर – १ सादर करतांना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ या कार्यालयाशी संपर्क साधावा, अथवा दुरध्वनी क्रमांक ०७२३२-२४४३९५ यावर संपर्क साधावा. ई-आर १ सादर करण्याची अंतिम मुदत माहे ३१ जानेवारी-२०२३ आहे. ई-आर १ ऑनलाईन सादर न करणाऱ्या कसूरदार आस्थापनावर विहित नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हा कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी कळविले आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी