सावकारांकडुन पिडीत व्यक्तींनी तक्रारी दाखल कराव्यात - जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

यवतमाळ, दि. २५ जानेवारी (जिमाका):- जिल्ह्यातील अवैध सावकारी संबंधाने प्राप्त तक्रारी तसेच अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे व सावकारी व्यवसायावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. जिल्हास्तरीय सावकारी सनियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेस जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, तसेच सर्व तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था उपस्थित होते. तसेच अवैध सावकारी बाबतच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्याबाबत व यासंबंधाने जास्तीत जास्त ६ सुनावण्या घेऊन प्रकरणे गुणवत्तेवर निकाली काढण्याबाबत सूचना देण्यात आल्या. जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या पुढील सभेपूर्वी विधिज्ञ यांचे मार्गदर्शनार्थ सावकारी कायद्याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात येऊन यामध्ये सावकारी प्रकरणे कशी हाताळावीत, तसेच याबाबतचे आदेश कसे पारित करावेत, यासंबंधाने सर्व संबंधितांना प्रशिक्षण देण्याबाबत सांगण्यात आले. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील कलम १८(२) मधील प्राप्त प्रकरणांमध्ये पुढील दोन महीन्यांचे आत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अवैध सावकारांकडुन पिडीत व्यकतींनी संबंधित तालुक्याचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तसेच जिल्हा उपनिबंधक यांचेकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी