एकलव्य निवासी पब्लिक स्कुलमध्ये प्रवेश परीक्षेकरीता अर्ज आमंत्रित*

यवतमाळ, दि. १७ जानेवारी (जिमाका):- इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य निवासी पब्लिक स्कुल मध्ये प्रवेशाकरिता २६ फेब्रुवारीला प्रवेश परीक्षा होणार आहे. अमरावती अप्पर आयुक्त आदिवासी विकास यांचे अधिनस्त असलेल्या प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगर पालिकांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांकरीता आयोजित करण्यात येत आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा अंतर्गत सदर प्रवेश परीक्षा शासकीय आश्रमशाळा शिबला, ता. झरी व शासकीय आश्रमशाळा अंतरगांव ता. कळंब या परीक्षा केंद्रावर २६ फेब्रुवारीला ११ ते २ या कालावधीत घेण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षेकरीता विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज पांढरकवडा प्रकल्प कार्यालय व अधिनस्त सर्व शासकीय व अनुदानित आश्रम शाळांच्या मुख्याध्यापकांकडे विनामूल्य उपलब्ध आहेत. शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हापरिषद, नगरपालिका तथा नगरपरिषदांच्या प्राथमिक तथा माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य प्राथमिक तथा अनुदानित शाळांमध्ये २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी, ६ वी, ७ वी व ८ वी मध्ये शिकत असलेले अनुसुचित जमातिचे विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे नमुन्यातील पूर्ण भरलेले प्रवेश अर्ज संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी ३० जानेवारी २०२३ पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा येथे सादर करावे, असे पांढरकवडा प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी