अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणूक जिल्ह्यात सुमारे ५८ टक्के मतदान* *सुमारे २१ हजार मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क*

यवतमाळ,दि ३०जाने, जिमाका: अमरावती पदवीधर मतदार संघासाठी आज जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यात १६ तालुक्यात ४८ मतदान केंद्रावर सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार चार वाजेपर्यंत अंदाजे ५८.८७ टक्के मतदान झाले आहे. पदवीधर मतदारसंघासाठी एकुण २३ उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यात ३५ हजार २७८ पदवीधर मतदारांची नोंदणी झाली होती. यात २३ हजार ७८५ पुरुष तर ११४९३ महिला मतदारांचा समावेश आहे. पैकी सुमारे २० हजार ७६८ मतदारांनी मतदान केले. यात १४ हजार ९५२ पुरुष तर ५ हजार ८१६ महिलांनी मतदान केले. यवतमाळ जिल्ह्यात ४८ मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व संबंधितांच्या ५३ चमू कार्यरत होत्या. मतदान प्रक्रियेमध्ये २७६ अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. *जिल्हाधिका-यांनी बजावला मतदानाचा हक्क* पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज व्यस्त वेळापत्रकातुन वेळ काढुन सकाळी साडेदहा वाजता अभ्यंकर कन्या शाळा येथे मतदानाचा हक्क बजावला. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी स्नेहल कनिचे, प्रशासनातील इतर अधिकारी यांनी सुद्धा आज पदवीधर मतदार संघ निवडणुकीत मतदान केले. अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीची मतमोजणी २ फेब्रुवारीला होईल. मतमोजणी ही अमरावती येथील नेमाणी गोडावून मध्ये होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी