ज्वारी, मका, बाजरी खरेदी ऑनलाईन नोंदणीकरिता ७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ*

यवतमाळ,दि ४ जाने (जिमाका): आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनामार्फत ज्वारी,मका व बाजरी खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता महाराष्ट्र स्टेट को. ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडमार्फत ५ खरेदी केंद्र उघडण्यात आलेले आहे. ज्वारी, मका, बाजरी खरेदी ऑनलाईन नोंदणीकरिता आता ७ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महागांव तालूक्यात तालुका खरेदी विक्री समिती, महागांव, पांढरकवडा तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती, पांढरकवडा, झरी तालुक्यात बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था पाटण, पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु), पुसद, आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी यांचा समावेश आहे. या हंगामापासुन ज्या शेतकऱ्यांचा ७/१२ आहे त्याच शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पुर्ण होणार नाही.शेतकरी नोंदणी मोबाईल ॲपव्दारे होत असुन लाईव्ह फोटो देखील मोबाईल ॲपव्दारे अपलोड करता येणार आहे.तशा सुचना दिनांक ३१ डिसेंबर २०२२ रोजी शासनाकडून प्राप्त झालेल्या आहे. त्यामुळे शेतमालाची विक्री करावयाची आहे त्याच शेतकऱ्याने लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वत: खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. खरेदीची अंतिम मुदत ७ जानेवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सदर शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अर्चना माळवे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी