राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा: प्लॅस्टीक राष्ट्रध्वजाचा वापर टाळा* जिल्हाधिकारी यांचे आवाहन

यवतमाळ, दि. २४ जानेवारी (जिमाका):- प्रजासत्ताक दिनी विविध कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी प्लॅस्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर खराब झालेले, फाटलेले, रस्त्यावर पडलेले, माती लागलेले राष्ट्रध्वज सांस्कृतिक व क्रिडा कार्यक्रमानंतर कार्यक्रम स्थळी इतरत्र पडलेले आढळतात. राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राचीअस्मिता होय. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होता कामा नये. राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याने स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी,सुजाण व जागरुक नागरिक, ग्रामपंचायत, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आरोग्य संस्था, सर्व खाजगी संस्था यांनी स्थानिक पोलीस यंत्रणेच्या मदतीने अशा प्रकारे प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. तसेच विक्रेत्यांनी प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करु नये. प्लॅस्टीकचे ध्वज आढळून आल्यास संबंधित तहसिलदार किंवा नगरपालिका कार्यालयात असे ध्वज जमा करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी