शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित* शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन २०१९-२०,२०२०-२१,व २०२१-२२

यवतमाळ, दि. १७ जानेवारी (जिमाका):- क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा मानला गेलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रदान करण्यात येतो. सन २०१९-२०, २०२०-२१, व २०२१-२२ या तीन स्वतंत्र वर्षांच्या पुरस्कारासाठी राज्यातील जेष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांच्यामार्फत राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करते. शासनाने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी १४ डिसेंबर २०२२ रोजीनियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार अर्जाचे नमुने https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन, डाऊनलोड करुन घेऊन, व्यवस्थितरित्या भरुन संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अर्ज सादर करण्याची मुदत ३० जानेवारीपर्यंत असुन अधिक माहितीसाठी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या बातम्या मधील लिंकवर पहावे. पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी