*कर्ज प्रकरणे निकाली काढण्यासाठी कालमर्यादेचे काटेकोर पालन व्हावे* *जिल्हाधिकारी* *जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीची बैठक*

यवतमाळ, दि,१३ जाने, जिमाका: जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सर्व बँकांच्या विभागिय व्यवस्थापकांनी शिक्षण, घर, लघु उद्योग आणि शासनाच्या सर्व योजनांसाठी कर्ज लक्षांक वाढवावा. तसेच कर्ज प्रकरणे निकाली काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेने घालुन दिलेली १५ ते ४५ दिवसाच्या मर्यादेचे काटेकोर पालन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे पार पडलेल्या बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, रिझर्व बँक ऑफ इंडिया नागपूरचे व्यवस्थापक राजकुमार जयस्वाल, लीड बँक व्यवस्थापक अमर गजभिये, नाबार्डचे जिल्हा महाव्यवस्थापक दीपक पेंदाम, आर सी टी चे संचालक विजयकुमार भगत, स्टेट बँक ऑफ इंडिया चे विभागीय व्यवस्थापक मृत्युंजय पांडा, फिरोज ताडवी, आर एम सोमकुवर, प्रदीप ठाकूर, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी, तसेच घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घरासाठी कर्ज उपलब्ध करुन द्यावे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, गाय म्हैस व बकरी गट वाटप योजना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या योजना, तसेच इतर सर्व शासकीय योजनांसाठी कर्ज प्रकरणे करणाऱ्या लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे. कर्ज प्रकरणे निकाली काढण्याच्या कालावधीची मर्यादा पाळण्यात यावी. तसेच कर्ज प्रस्ताव नाकारण्याची कारणे सविस्तरपणे कर्ज मागणा-यांना कळवावी अशा सुचना श्री येडगे यांनी दिल्यात. बँकांनी शासकीय कार्यालय आणि बँक व्यवस्थापकांशी योग्य समन्वय ठेवून प्रकरणे निकाली काढावीत. कर्ज प्रकरणात नादार होण्याचे प्रमाण मोठे आहे. यासाठी सुद्धा एक शिस्तबद्ध कार्यक्रम राबवावा असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिलेत. सर्व बँकांच्या विभागीय व्यवस्थापकांनी जिल्ह्यातील सर्व बँकांचे शाखा व्यवस्थापक म्हणुन जबाबदार अधिकारी नेमावेत असेही श्री येडगे यावेळी म्हणालेत. या बैठकीला सर्व बँकांचे रिजनल मॅनेजर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, खादी व ग्रामोद्योगचे अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी