कुष्ठरुग्णांच्या उपचारासाठी समाजाने सहकार्य करावे -जिल्हाधिकारी स्पर्श अभियान ३०जानेवारी ते १३ फेब्रुवारी यवतमाळ दि २४ जाने (जिमाका) :- कोविड सारख्या संसर्गजन्य आजारातही आपण कुटुंबातील सदस्याला घरातच ठेवून उपचार केले आहेत. त्यापेक्षा कुष्ठरोग हा लवकर बरा होणारा आजार असुन यासाठी योग्यवेळी उपचार घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे कुष्ठरुग्णांवर सामाजिक बहिष्कार न टाकता कुटुंबियांनी व नागरिकांनी त्यांच्या उपचारासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. जागरूकता आणि शास्त्रीय माहितीच्या अभावामुळे कुष्ठरोगाबाबत समाजात कलंक आणि भेदभाव निर्माण झालेला आहे. ज्यामुळे रोगाचा प्रसार आणि उपचाराबद्दल गैरसमज वाढतात. कुष्ठ रोगाशी निगडित कलंक आणि भेदभावाचे निराकरण करण्यासाठी आणि समाजात जागरूकता वाढविण्यासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत स्पर्श अभियान राबविण्यात येणार आहे. यासंबंधीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रल्हाद चव्हाण जिल्हा शल्यचिकित्सक आर डी राठोड सहाय्यक संचालक कुष्ठरोग जिल्हा सातव अधिकारी इत्यादी उपस्थित होते. कुष्ठरोगाशी संबंधित कलंक रुग्णांच्या जीवनाच्या अनेक पैलुंवर परिणाम करतात. रोजगाराच्या संधी, विवाह ,कौटुंबिक जीवन, सामाजिक स्थितीवर याचा मोठा परिणाम होतो. या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या पंधरवड्यात आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम राबविण्यात यावे. याच दरम्यान विशेष ग्रामसभांचे आयोजन करून नागरिकांना याबाबत माहिती देण्यात यावी. या ग्रामसभेत रोगमुक्त कृष्ठ रुग्णांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करुन त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात यावा. कुष्ठरोगाची लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तात्काळ तपासणी करून उपचार घ्यावा अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्यात. चौकट : शरीरावर संवेदनारहित लालसर फिकट रंगाचा चट्टा आढळून आलेला व्यक्ती हा कुष्ठरोग संशयित असू शकतो. अशा व्यक्तीने त्वरित कुष्ठरोग निदानासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात, नजीकच्या उपकेंद्रात, किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी. लवकर निदान लवकर उपचार केल्यास कुष्ठरोगापासून होणाऱ्या विकृती टाळता येऊ शकतात. तसेच हा आजार उपचाराने पूर्णपणे बरा होतो. अंगावर पाचपेक्षा कमी चट्टे असल्यास सहा महिन्यापर्यंत उपचार घ्यावे लागतात तर पाच पेक्षा जास्त चट्टे असल्यास बारा महिन्यांपर्यंत उपचार घेणे आवश्यक आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास, अंधश्रद्धा आणि चुकीच्या समजुतीवर विश्वास ठेवून उपचार न घेतल्यास हा आजार गंभीर स्वरूप धारण करून हातापायाची बोटे झळुन अपंगत्व येण्याचे प्रकार होतात. त्यामुळे नागरिकांनी याबाबतीत लवकर उपचार करावे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण *जिल्ह्यात वर्षनिहाय नवीन आढळून आलेले कुष्ठरुग्ण* २०१९-२० २०२०-२१. २०२१-२२ २२-२३ ५६७ ४२५ ५१८ ५०२ महिला रुग्ण २६१ २०४ २२८ २३७ लहान मुले १९. २१ १९ १८

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी