Posts

Showing posts from October, 2019

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी यवतमाळकरांची एकता दौड

Image
v कलेक्टर एसपींसह नागरिकांचा सहभाग यवतमाळ, दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने एकता दौड आयोजित करण्यात आली. पोलिस मुख्यालयातून सुरू झालेल्या ‘रन फॉर युनिटी’ मध्ये जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांच्यासह अधिकारी, विद्यार्थी, युवक, युवती व नागरिकांनी सहभाग नोंदविला. सुरवातीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दीप प्रज्वलन करून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी जिल्हाधिका-यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. हिरवी झेंडी दाखविल्यानंतर उपस्थित सर्व अधिकारी व नागरीक एकता दौडमध्ये सहभागी झाले. पोलिस मुख्यालयातून निघालेली ही दौड बसस्टँड मार्गे एलआयसी चौक, पोलिस अधिक्षक कार्यालय, नगर परिषद मार्गाने गेल्यानंतर पोलिस मुख्यालयात समारोप करण्यात आला. एकता दौडमध्ये उपजिल्हाधिकारी सविता चौधर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, पोलिस उपअधिक्षक (गृह) एम.एम.बागवान, उपविभागीय पोलिस अधिक

जिल्हाधिका-यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

Image
v सुकळी, लोणबेहळ, कोसदनी, साकूर येथे भेट यवतमाळ, दि. 30 : अवकाळी पावसाचा फटका संपूर्ण राज्यासह जिल्ह्यालासुध्दा बसला आहे. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि कापसाचे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केली. आर्णी तालुक्यातील सुकळी, लोणबेहळ, कोसदनी आणि साकूर येथील शेतक-यांच्या शेतावर जाऊन जिल्हाधिका-यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. सुकळी येथील शेतकरी रामभाऊ मोरे, साकूर येथील प्रतिभा ठाकरे आणि लोणबेहळ येथील ज्ञानेश्वर टाले यांच्या शेतावर जिल्हाधिका-यांनी भेट दिली असता, शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संपूर्ण तालुक्यालाच अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे महसूल आणि कृषी विभागाने संयुक्तपणे सर्व्हे करून शेतक-यांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतक-यांनी जिल्हाधिका-यांकडे केली. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत येणा-या तसेच याव्यतिरिक्त ज्या पिकांचे नुकसान झाले आहे, या सर्वांचाच विचार करून संयुक्तपणे सर्व्हेक्षण करण्यात येईल. कृषी, ग्रामविकास

निवडणुकीच्या व्यस्ततेतून खर्च निरीक्षकांचे ‘व्यसनाधिनतेचे दुष्परिणाम’ बाबत व्याख्यान

Image
v वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन       यवतमाळ, दि. 18 : जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बाहेरच्या राज्यातील निरीक्षकांची नियुक्ती केली जाते. प्रशासनातर्फे करण्यात येणा-या निवडणुकीच्या कामावर त्यांचे बारकाईने लक्ष असते. याशिवाय मतदारसंघात दौरे, विविध बैठका, खर्चाचा आढावा, नागरिकांच्या तक्रारी आदी कामांमुळे निरीक्षकसुध्दा व्यस्त असतात. मात्र या व्यस्ततेतून थोडा वेळ काढून खर्च निरीक्षक ए. व्यंकदेश बाबु यांनी व्यसनाधिनतेच्या दुष्परिणामाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.             जिल्ह्यातील 81 – पुसद आणि 82 – उमरखेड विधानसभा मतदारसंघासाठी ए. व्यंकदेश बाबु यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2014 ते 2017 या कालावधीत त्यांनी चेन्नई येथील सेंट्रल ब्युरो ऑफ नारकोटिक्सच्या गुप्तवार्ता सेलचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. या कालावधीत त्यांनी अरुणाचल प्रदेशची चीन आणि म्यानमारला लागून असलेल्या सीमेवरील घनदाट जंगलातील नशीले पदार्थांच्या झाडांचे उत्पादन पूर्णपणे नष्ट केले होते. त

मतदानाचा दिवस व पूर्वीच्या दिवशी वृत्तपत्रातील राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित करून घेणे बंधनकारक

यवतमाळ, दि. 16 : मतदानाच्या दिवशी तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. दिनांक 20 व 21 ऑक्टोबर 2019 रोजी प्रकाशित होणा-या राजकीय जाहिरातींच्या प्रमाणीकरणासाठी जिल्हा माहिती कार्यालय, दगडी इमारत, तहसील चौक, यवतमाळ येथील माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडे संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. अफवा पसरवणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्वरुपाच्या राजकीय जाहिराती मतदानाच्या दिवशी व त्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध झाल्यास पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. असे प्रकार यापूर्वी झाल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. अशा जाहिराती प्रसिद्ध झाल्यास प्रतिपक्षाच्या उमेदवाराला स्पष्टीकरणाची संधीच मिळत नसून त्यामुळे त्याच्यावर एक प्रकारे अन्याय होऊ शकतो. या बाबींना आळा घालण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने संविधानाच्या कलम 324 नुसार आदेश काढले आहेत. त्यानुसार क

मतदारांना मतदानासाठी 11 कागदपत्रांचा पर्याय

Image
      यवतमाळ, दि. 16 :   मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त आता 11 प्रकारच्या कागदपत्रांचा पर्याय मतदाराला देण्यात आला आहे. मतदान करण्यासाठी मतदाराकडे या अकरा कागदपत्रांपैकी एक कागदपत्र असल्यास पुरावा म्हणून तो ग्राह्य धरण्यात येईल.             आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करतांना केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे नागरिक मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाही, अशा मतदारांनी ग्राह्य अकरापैकी एक ओळखपत्र सादर केले तरी त्या मतदाराला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. निवडणूक आयोगाने या कागदपत्रांमध्ये पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसंन्स), केंद्र / राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम / सार्वजनिक मर्या. कंपनीचे सर्व्हीस ओळखपत्र, बँक / पोस्टाद्वारे वितरीत छायाचित्र असलेले पासबुक, पॅनकार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडीया यांच्याद्वारे नॅशनल पाप्युलेशन रजिस्टर अंतर्गत दिलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित जॉब कार्ड, भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत निर्गमित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र,

दिग्रस व आर्णी मतदार संघात निवडणूक निरिक्षकांनी केली खर्चाची तपासणी

Image
यवतमाळ, दि. 15 : जिल्ह्यातील 79 –दिग्रस व 80 – आर्णी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरिक्षक मुकुंद कुमार यांनी पांढरकवडा येथील निवडणू‍क निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारांच्या खर्चाबाबत दुसरी तपासणी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. आर. जी. पुरी, तहसिलदार धीरज स्थुल, नायब तहसिलदार रविंद्र कापसीकर आदी उपस्थित होते. खर्च निरिक्षकांद्वारे मागील तपासणीदरम्यान ज्या उमेदवारांना नोटीस पाठविण्यात आल्या होत्या, त्या उमेदवारांचे खुलासे प्राप्त न झाल्यामुळे सदर उमेदवारांविरुध्द निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उचित कारवाई करावी, असे निर्देश खर्च निरिक्षकांनी दिले. फ्लाईंग्स स्कॉड, एसएसटी, एफएसटीने विविध परवान्यांबाबत सक्त पडताळणी करावी. तसेच गावागावात लावण्यात येणारे फ्लेक्स, होर्डिग्स इत्यादीबाबत उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व परवानग्या घ्याव्यात. वाहन प्रदुषणाचा त्रास सामान्य माणसांना होणार नाही याची काळजी उमेदवारांनी घ्यावी. जे उमेदवार आपला दैनंदिन खर्चाचा अहवाल निवडणूक विभागास सादर करणार नाही अशा उमेदवारांविरुध्द कलम – 171 (1) नुसार कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या तपास

लोकाभिमुख निवडणूक प्रक्रियेसाठी ‘डीजीटल ॲप’

Image
v सी-व्हिजील, पीडब्ल्यूडी, सुगम, सुविधा, समाधान आदींचा उपयोग यवतमाळ, दि. 13 : माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकच जण स्मार्ट फोन, संगणक, टॅब आदींसोबत जोडला गेला आहे. गतीमान युगात दैनंदिन कामकाम तसेच व्यवहार डीजीटल पध्दतीने होत असल्यामुळे नागरिकांची सुविधा झाली आहे. याचाच कित्ता गिरवत निवडणूक आयोगानेही निवडणूक प्रक्रियेसाठी डीजीटल ॲप उपयोगात आणले आहे.    निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी ‘सी-व्हिजील’           (c-Vigil) हे नवे मोबाईल ॲप गत लोकसभेपासून कार्यान्वित करण्यात आले आहे. ‘सुलभ निवडणूका’ या ब्रिद वाक्यानुसार दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी ‘पीडब्ल्यूडी’ हे ॲप तयार करण्यात आले आहे. यासोबतच सुगम, सुविधा आणि समाधानच्या या हेल्पलाईनच्या माध्यमातून प्रशासन, उमेदवार आणि मतदारांमध्ये समन्वय होण्यास मदत होत आहे. सी-व्हीजील : निवडणूक प्रक्रिया अधिक लोकाभिमुख होण्यासाठी आयोगाने ‘टेक्नोसॅव्ही’ उपाय अंमलात आणले आहेत. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास ‘सी-व्हिजील’ ॲपच्या माध्यमातून नागरिकांना थेट ऑनलाईन तक्रार क

उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर विविध पथकांचा ‘वॉच’

Image
v खर्च नियंत्रण पथकाद्वारे नोंदवही व बँक व्यवहारांची नियमित तपासणी यवतमाळ, दि. 12 : निवडणुकांमध्ये उमेदवारांकडून होणारा प्रचार आणि त्यासाठी येणारा खर्च हा आदर्श आचारसंहितेच्या नियमात असावा, यासाठी निवडणूक आयोगाने मर्यादा घालून दिली आहे. विधानसभा निवडणुकीत प्रत्येक उमदेवाराची खर्चाची मर्यादा 28 लक्ष रुपये आहे. या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात खर्च तपासणी पथक स्थापन करण्यात आले आहे. विविध पथके आणि खर्च तपासणी पथकाचा उमेदवारांच्या खर्चावर नियमित ‘वॉच’ असल्यामुळे उमेदवारांना कुठलाही खर्च लपविता येत नाही. प्रत्येक विधानसभा मतदार संघात उमेदवारांकडून होणारा खर्च प्रत्यक्ष फिल्डवर तपासून त्याची पडताळणी करण्यासाठी चार विशेष पथकांचे गठण करण्यात आले आहे. यात फ्लाईंग स्कॉड, व्हीडीओ पाहणी पथक, व्हीडीओ सर्व्हेक्षण टीम आणि स्थिर सर्वेक्षण पथकाचा समावेश आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात 4 फ्लाईंग स्कॉड (1 पथकप्रमुख, 1 व्हीडीओग्राफर, पोलिस अधिका-यासह इतर दोन कर्मचारी), 3 व्हीडीओ पाहणी पथक (1 अधिकारी व 2 कर्मचारी), 3 व्हीडीओ सर्व्हेक्षण पथक (1 अधिकारी व 1 कर्मच

खर्च विषयक बाबींबाबत पंधरा उमेदवारांना नोटीस

v यवतमाळचे पाच आणि राळेगावच्या दहा उमेदवारांचा समावेश       यवतमाळ दि. 11 : जिल्ह्यातील 77 – राळेगाव आणि 78 – यवतमाळ विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी पार पडली. या तपासणी दरम्यान दोन्ही मतदारसंघात अनुपस्थित असलेले 8 आणि त्रृटी आढळलेले 7 अशा एकूण 15 उमेदवारांना नोटीस देण्यात आली आहे. यात यवतमाळच्या पाच उमेदवारांचा तर राळेगावच्या दहा उमेदवारांचा समावेश आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमदेवारांना आपला दैनंदिन खर्चाचा अहवाल खर्च समितीसमोर सादर करणे बंधनकारक आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या खर्चाची तीन वेळा तपासणी करण्यात येते. 78 – यवतमाळ विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाची तपासणी गार्डन हॉल येथे करण्यात आली. या तपासणीदरम्यान अनुपस्थित असलेले उमेदवार संदीप देवकते, अशोक काळमोरे आणि मनोज गेडाम यांना तर खर्चाच्या अहवालात त्रृटी आढळलेले अनिल उर्फ बाळासाहेब मांगूळकर आणि मदन येरावार यांना नोटीस देण्यात आली आहे.               यावेळी 78 – यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे खर्च निरीक्षक राजीव कुमार, सहाय्यक खर्च निरीक्षक सुधीर भट, खर्च तपासणी प्

मतदार जनजागृतीसाठी कलेक्टर एसपी सायकलवर

Image
* इतरही अधिका-यांचा रॅलीत सहभाग यवतमाळ दि. 11 : निवडणुकीच्या कामात संपूर्ण प्रशासनासह पोलिस प्रशासनसुध्दा जोमाने कामाला लागले आहे. जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघाचा व्याप, निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार विविध कामे, कायदा व सुव्यवस्था आदींबाबत सर्व अधिकारी सतत व्यस्त असतात. मात्र असे असले तरी मतदानाची टक्केवारी वाढविणे ही जबाबदारीसुध्दा पार पाडायची आहे. याचीच जाणीव ठेवून नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक यांच्यासह इतर अधिका-यांनी सायकल रॅलीत सहभाग नोंदविला.   आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 11, 12 आणि 13 ऑक्टोबर या तीन दिवसात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. शहरातील मुख्य रस्ते तसेच नागरी वसाहतींमध्ये प्रत्येक दारापर्यंत मतदानाचा जागर पोहोचवावा, या उद्देशाने पोस्टल ग्राऊंड येथून सायकल रॅलीला सुरवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे आदी अधिका-यांनी सायकल रॅल

मतदार जनजागृतीबाबत जिल्हाधिका-यांनी घेतली आढावा बैठक

Image
11 ऑक्टोबर रोजी सायकल रॅलीचे आयोजन यवतमाळ दि. 10 : आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ग्रामीण आणि शहरी भागात जनजागृती करण्यात येत आहे. यात चित्ररथ, पथनाट्य, मतदारांना आवाहन, रॅली आदींचा समावेश आहे. याच अनुषंगाने 11 ऑक्टोबर रोजी यवतमाळ शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. तर जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघात 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी मतदार जनजागृतीकरीता सायकल रॅलीचे नियोजन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व सामाजिक संघटनांची बैठक घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, सहाय्यक आयुक्त किशोर भोयर, समाजकल्याण अधिकारी पियुष चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप वडगावकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, घटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण

निवडणूक निरीक्षकांनी घेतली नोडल अधिका-यांची बैठक

Image
v आयोगाच्या सुचनांवर अंमल करण्याचे निर्देश यवतमाळ दि. 9 : विधानसभेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी निवडणुकीच्या कामकाजासंदर्भात नोडल अधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीला निवडणूक निरीक्षक सुशीलकुमार मौर्य, पी. विजयन, आशिष सक्सेना आणि जे. आर. डोडीया उपस्थित होते. निवडणुकीच्या कामाकरीता सेवा घेण्यात आलेल्या कर्मचा-यांना आठ ते दहा तास काम द्यावे. शिफ्टनुसार त्यांच्याकडून काम करून घेऊन एकाच व्यक्तीवर जास्त ताण येणार नाही, यादी दक्षता घ्या, असे आशिष सक्सेना यांनी सांगितले. पुढ बोलतांना ते म्हणाले, विविध पथकांद्वारे तपासणी नाक्यांवर कारव्यतिरिक्त मोठ्या ट्रकचीसुध्दा तपासणी करा. आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या प्रकरणांसाठी विधानसभा क्षेत्रनिहाय एक वेगळी टीम गठीत करा. निवडणुकीची टक्केवारी वाढविण्यासाठी ध्येय निश्चित करून त्याचे सुक्ष्म नियोजन करा. महिला, पुरुष, तरुण – तरुणी, कामगार, शेतकरी आदी घटकांमध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी बुथ जनजागृती ग्रुप तयार करा. जे दिव्यांग मतदार घरातून बाहेर पडू शकत नाही, त्यांच्यापर्यंत पोहचणे प्रशासनाचे काम आहे. अशा

केंद्रीय निरीक्षकांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा

Image
v मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे निर्देश v निवडणूक आयोगाच्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन यवतमाळ दि. 6 : जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेल्या केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी जिल्हा प्रशासनासह संपूर्ण निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला. नियोजन भवनात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वणी आणि राळेगाव विधानसभा मतदारसंघासाठी असलेले निवडणूक निरीक्षक आशिष सक्सेना, यवतमाळ आणि दिग्रस विधानसभा मतदारसंघासाठी असलेले निरीक्षक जे.आर. डोडीया, आर्णि, पुसद आणि उमरखेड विधानसभा मतदारसंघासाठी असलेले निरीक्षक सुशीलकुमार मौर्य तसेच कायदा व सुव्यवस्थाकरीता असलेले निवडणूक निरीक्षक पी. विजयन, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधिक्षक नुरुल हसन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक के. विजयन म्हणाले, निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कालावधीतच दसरा आणि नवरात्र हे धार्मिक सण साजरे होत आहे. दुर्गादेवी विसर्जन सर्वत्र शांततेत पार पडेल, याकडे सर्वांनी गांभिर्याने लक्ष द्यावे. अवैधरित्या

स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळेअंतर्गत अधिका-यांनी दिले विद्यार्थ्यांना धडे

Image
यवतमाळ, दि. 05 : यवतमाळ शहरामध्ये नव्याने निर्माण झालेल्या डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अभ्यास केंद्रात जिल्हा प्रशासन व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने तर मुख्य मार्गदर्शक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक नुरुल हसन, निवासी जिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने उपस्थित होते. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, ध्येय निश्चित असेल तसेच मेहनत व अभ्यासामध्ये सातत्य असेल तर स्पर्धा परिक्षांमध्ये यश संपादन करता येते. आहे त्या साधनांचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी अभ्यास केंद्राचासुध्दा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. नुरुल हसन म्हणाले की, मी एका सामान्य कुटूंबातून आलो आहे. प्राथमिक शिक्षण खेडे गावातील जि.प.शाळेतून झाले. परंतु जिद्द असेल, मेहनत करण्याची तयारी असेल तर आपणही यश संपादन करू शकतो, असे त्यांनी सांगितले. जलज शर्मा मार्गदर्शन करतांना म्हणाले, स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ