उमेदवारांच्या खर्चावर बारीक लक्ष द्या



v खर्च निरीक्षक मुकुंदकुमार यांचे अधिका-यांना निर्देश
यवतमाळ, दि. 01 : आगामी विधानसभा निवडणुकीत भरारी पथक, सहाय्यक खर्च निरीक्षक, व्हीडीओ सर्व्हिलंस पथक तसेच आदी पथकातील अधिका-यांनी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. तसेच उमेदवारांच्या खर्चावर बारीक लक्ष द्यावे, असे निर्देश दिग्रस आणि आर्णि विधानसभा मतदारसंघासाठी असलेले खर्च निरीक्षक मुकुंदकुमार यांनी दिले.
दिग्रस आणि आर्णि विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी तथा सर्व पथक प्रमुखांची बैठक त्यांनी नुकतीच घेतली. यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. पुढे मुकुंदकुमार म्हणाले, सर्व अधिका-यांनी आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. विविध पथकांनी निवडणूक काळात अवैधरित्या होणारी पैसे आणि दारूची वाहतूक आदीवर लक्ष ठेवावे. सी-व्हीजील ॲपवर येणा-या तक्रारींचा त्वरीत निपटारा करावा. वाहनांची तपासणी करतांना नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. याशिवाय त्यांनी पोलिस विभाग, उत्पादन शुल्क विभाग, मिडीया सेंटर यांचा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेतला. तसेच दिग्रस आणि आर्णि विधानसभा क्षेत्रातील विविध तपासणी पथकांना भेटी देऊन कामाची पाहणी केली.
बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक खर्च निरीक्षक, व्हीडीओ सर्व्हिलंस पथक, भरारी पथक, खर्च पडताळणी पथक आणि पोलिस अधिकारी उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी